mukesh ambani 
अर्थविश्व

मुकेश अंबानी यांना दुसरा धक्का; श्रीमंतीला लागले ग्रहण

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली - रिलायन्स उद्योग समुहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती होते पण आता त्यांना मागे टाकून जुंग शानशान हे पहिल्या क्रमांकावर पोहोचले आहेत. अंबानी आता आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती नाहीत आणि त्यासोबतच जगातील टॉप 10 अब्जाधींशांच्या यादीतही त्यांचे नाव नाही.

बाटलीबंद पाणी आणि व्हॅक्सिन तयार करणाऱ्या चिनी कंपनीचे मालक जुंग शानशान हे मुकेश अंबानी यांना मागे टाकून आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत.  फोर्ब्सच्या रिअल टाइम बिलेनिअर रँकिंगमध्ये जुंग शानशान जगातील टॉप 10 श्रीमंतांच्या यादीत सहाव्या नंबरवर पोहोचले आहेत. तर अंबानींची 12 व्या स्थानी घसरण झाली आहे.

याआधी ते दहाव्या स्थानावर होते. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत एलन मस्क दुसऱ्या स्थानावर असून अमेझॉनचे संस्थापक जेफ बेजोस हे पहिल्या स्थानी आहेत. जगातील वेगवेगळ्या भागातील शेअर बाजार उघडल्यानंतर दर पाच मिनिटांनी फोर्ब्सच्या रिअल टाइम बिलेनिअर रँकिंगमध्ये बदल होतो. ज्या व्यक्तींची संपत्ती खासगी कंपनींशी संबधित आहे त्यांची एकूण संपत्ती दिवसातून एकदा अपडेट होते. 

मुकेश अंबानी यांना हा गेल्या आठवड्याभरात दुसरा धक्का आहे. याआधी ते जगातील टॉप 10 श्रीमंतांच्या यादीतून बाहेर झाले आणि आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून जुंग शानशान यांनी बाजी मारली. जानेवारीतच ते आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले होते. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India Pakistan Cricket Match: भारत-पाकिस्तान क्रिकेट सामना; पहलगाम दहशतवादी हल्ल्यात पती गमावलेल्या 'त्या' नववधुने केलं मोठं विधान!

Asia Cup 2025: बीसीसीआय भारत-पाकिस्तान सामना रद्द करू शकतं का? नेमका नियम काय आहे? वाचा...

Asia Cup 2025, IND vs PAK: पाकिस्तान सामन्याबाबत भारतीय संघाचा विचार काय? प्रशिक्षकांनी स्पष्टच सांगितलं

PM Narendra Modi: मणिपूरमधून पंतप्रधान मोदींच्या सुशीला कार्कींना शुभेच्छा; स्पष्ट शब्दात म्हणाले...

Latest Marathi News Updates : मोदींच्या एआय व्हिडीओमुळे पुण्यात भाजपचं आंदोलन

SCROLL FOR NEXT