stock market sakal
अर्थविश्व

Best Stock : मल्टीबॅगर ठरलेला 'हा' शेअर विक्री करण्याचा शेअर बाजार तज्ज्ञांचा सल्ला

या शेअर्सनी गुंतवणुकदारांना कायमच दमदार परतावा दिला आहे.

सकाळ डिजिटल टीम

सध्या शेअर बाजारावर कोरोनाचा परिणाम दिसून येत आहे. त्यामुळे बाजारावर विक्रीचा ताण आहे. अशात शेअर बाजार तज्ज्ञांनी काही स्टॉक विक्री करण्याचा सल्ला दिला आहे. असाच एक स्टॉक जेएसडब्ल्यू स्टीलचा (JSW Steel) आहे.

खरंतर  जेएसडब्ल्यू स्टीच्या शेअर्सनी गुंतवणुकदारांना कायमच दमदार परतावा दिला आहे. त्यांनी केवळ 66,000 रुपयांच्या गुंतवणुकीवर गुंतवणूकदारांना कोट्यधीश बनवले आहे. पण, हा शेअर सध्याच्या किंमतीपेक्षा सुमारे 24 टक्के कमी होऊ शकतो असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. (Multi Bagger Share : Best Stock to buy share market )

देशांतर्गत ब्रोकरेज फर्म आयसीआयसीआय सिक्युरिटीजने यामध्ये गुंतवणूक करण्यासाठी 550 रुपयांचे टारगेट निश्चित केले आहे, जे सध्याच्या किंमतीपेक्षा 24% कमी आहे. त्याचे शेअर्स शुक्रवारी 1.33 टक्क्यांनी घसरून 727.55 रुपयांवर बंद झाले.

14 डिसेंबर 2001 रोजी जेएसडब्ल्यू स्टीलचे शेअर्स 4.77 रुपयांवर मिळत होते. आता ते 153 पट वाढून 727.55 रुपयांवर पोहोचले आहेत. म्हणजे त्यावेळी केवळ 66 हजार रुपयांच्या गुंतवणुकीवर आणि 21 वर्षांत त्या 1 लाखाचे 1 कोटी झाले.

या वर्षी, 19 एप्रिल 2022 रोजी त्याचे शेअर्स 789.95 रुपयांच्या विक्रमी उच्चांकावर पोहोचले होते, पण पुढच्याच महिन्यात 26 मे पर्यंत 34 टक्क्यांनी घसरून 520.10 रुपयांच्या एका वर्षातील नीचांकी पातळीवर पोहोचले. त्यानंतर खरेदीचा कल दिसून आला आणि आत्तापर्यंत तो 40% वसूल झाला असला तरी येत्या काळात हवी तशी रिकव्हरी दिसत नसल्याचे तज्ज्ञ सांगत आहेत.

जेएसडब्ल्यू स्टील महाराष्ट्रातील डोलवी प्लांटद्वारे आपला व्यवसाय वाढवत आहे आणि डिजिटलायझेशनवर भर देत आहे. याशिवाय कंपनीचे लक्ष डोलवी प्लांटच्या माध्यमातून सस्टेनिबिलिटीवर आहे. या सर्व सकारात्मक बाबी असूनही ब्रोकरेज फर्म आयसीआयसीआय सिक्युरिटीजच्या विश्लेषकांनी जेएसडब्ल्यूचे शेअर्स विक्री करण्याचा सल्ला दिला आहे.

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

दहावीत शिकणाऱ्या १६ वर्षीय मुलीने १५व्या मजल्यावरून मारली उडी, घटनास्थळी सापडली चिट्ठी

Shiv Sena Symbol Dispute : शिंदे गटाने ठाकरेंचे दावे खोडले मूळ पक्षाचा प्रतिनिधी गट ठरविण्याचा निवडणूक आयोगाला अधिकार

UPI Transaction Charges : UPI वर ०.४ टक्के शुल्क; १० हजार, १ लाख, १० लाखांच्या व्यवहारावर किती रुपये? जाणून घ्या

Marathi News Live Updates : नागपुरात भरधाव कारचा भीषण अपघात, ७ जणांना उडवलं

Helicopter Crash : भीषण अपघात! हेलिकॉप्टर पार्किंगमध्ये कोसळलं, ३ जणांचा जागीच मृत्यू, पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT