Multibaggers
Multibaggers Team eSakal
अर्थविश्व

Multibagger Stock : APL अपोलो ट्युब्सने वर्भरात दिला २५० टक्के परतावा

सुधीर काकडे

- शिल्पा गुजर

एपीएल अपोलो ट्यूब (APL Apollo Tubes) ही देशातील आघाडीच्या स्टील ट्यूब उत्पादक कंपन्यांपैकी एक आहे, ज्याची वार्षिक उत्पादन क्षमता 26 लाख टन आहे. शेअर बाजारातही एपीएल अपोलो ट्युब्सचे शेअर्स मल्टीबॅगर ठरलेत. म्हणजेच या शेअर्सने गुंतवणूकदारांना अनेक पटींनी परतावा दिला आहे. गेल्या एका वर्षात कंपनीच्या शेअर्समध्ये 250 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे, तर यावर्षी आतापर्यंत त्याचे शेअर्स 115 टक्क्यांहून अधिक वाढले आहेत.

सप्टेंबर 2020 मध्ये एपीएल अपोलो ट्यूब्सच्या शेअरची किंमत 420 रुपये होती, जी आता 1,875 रुपयांवर व्यवहार करत आहे. कंपनीचा बाजार हिस्सा (Market Share) आर्थिक वर्ष 2021 मध्ये वाढून 50% झाला जो 2016 मध्ये 27% होता. कंपनीचे मजबूत वितरण नेटवर्क, ब्रँडिंग, उत्कृष्ट उत्पादन ऑफर आणि उत्पादन क्षमता वाढल्यामुळे हा शेअर इतका वाढत असल्याचे ब्रोकरेज फर्म एचडीएफसी सिक्युरिटीजने सांगितले.

50% बाजार हिस्सा (Market Share), नवीन तंत्रज्ञान स्वीकारणे आणि मजबूत ब्रँडमुळे एपीएल अपोलो ट्यूब त्याच्या क्षेत्रातील इतर कंपन्यांच्या तुलनेत चांगल्या स्थितीत असल्याचे ब्रोकरेज फर्मने आपल्या अहवालात म्हटले आहे. नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा वापरामुळे एपीएल ग्राहकांना कस्टमाईज उत्पादने देतं, ज्यामुळे कंपनी आणखी मजबूत होते असे एचडीएफसी सिक्युरिटीजचे म्हणणे आहे. कंपनी येत्या काळात बाजारात आपली पकड कायम ठेवेल असा विश्वासही एचडीएफसी सिक्युरिटीजने व्यक्त केला.

ब्रोकरेज फर्मने एपीएल अपोलो ट्यूब्सला खरेदी रेटिंगसह (Buy Rating) कव्हर करायला सुरवात केली आहे. त्याचप्रमाणे याच्या स्टॉकसाठी 2,226 रुपये टार्गेट दिले आहे. APL चा महसूल आणि निव्वळ नफा आर्थिक वर्ष 21-2024 दरम्यान अनुक्रमे 20% आणि 24% च्या वार्षिक वाढीच्या दराने वाढेल असा विश्वास ब्रोकरेज फर्मने वर्तवला आहे. कंपनीच्या विक्रीत वाढ, चांगले मार्जिन, कमी कार्यशील भांडवल आणि कर्ज कमी केल्याने ही वाढ झाल्याचे एचडीएफसी सिक्युरिटीजने म्हटले आहे.

एपीएल अपोलो ट्यूब्सने (APL) फॅब्रिकेटर्स आणि आर्किटेक्ट्सवर आपली छाप पाडल्याचे ब्रोकरेज फर्मने आपल्या अहवालात म्हटले आहे. त्यामुळे स्टील ट्यूबच्या वापरासाठी ही त्यांची पहिली पसंती बनली आहे. कंपनीने नवीन उत्पादने आणि ऑफर्सच्या व्यतिरिक्त टीव्ही जाहिराती, क्रीडा कार्यक्रमांचे प्रायोजकत्व आणि ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून प्रसिद्ध सेलिब्रिटीज निवडल्याने याचा खूप फायदा झाला. ज्यामुळे एपीएलची एक मजबूत ब्रँड प्रतिमा तयार झाली आहे. या सर्वांमुळे कंपनीला ग्रामीण भागातही व्यवसाय करण्यास मदत झाली आहे, ज्यामुळे त्यांना चांगला फायदा झाला आहे.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्यप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Major Accident: भरधाव कारच्या धडकेत मजुरी करण्याऱ्या आईसह दोन चिमुकले ठार!

IPL 2024 DC vs RR : दिल्लीचा राजस्थानला दणका, घरच्या मैदानात मिळवला दणदणीत विजय; संजू सॅमसनचे अर्धशतक व्यर्थ

Virtual Touch: बालकांना 'व्हर्च्युअल स्पर्शा'च्या धोक्याची जाणीवही करुन देणं गरजेच - हायकोर्ट

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

SCROLL FOR NEXT