दिवाळीच्या फेस्टिव्ह सीजनमध्ये कित्येकजण मोठी खरेदी करतात. नेहमी मोठ्या सामनाची खरेदी ही EMI वर केली जाते. आजकाल बाजारात कित्येक ऑप्शन उपलब्ध आहेत, यापैकी Buy Now Pay Later हा सध्या नवा पर्याय आहे. तुम्ही जर हा ऑप्शन निवडण्याचा विचार करता आहात तर तुम्हाला काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात घ्यायला हव्यात
काय आहे Buy Now Pay Later? -
कित्येत फिनटेक आणि फायनान्स कंपन्या आपल्या ग्राहतांना Buy Now Pay Later ही सुविधा देतात. हे एक प्रकारचे लोन असते जे ग्राहकांना कोणत्याही खरेदीसाठी दिली जाते. आणि यामध्ये ग्राहक ठराविक काळापर्यंत EMI पे करण्याचा ऑप्शन निविडतात. अशी सुविधा देणाऱ्या कंपन्या बँकासोबत टायअप करतात आणि ग्राहकांना कमी काळासाठी किंवा कमी रक्कमेसाठी लोक देते.
कोण घेते Buy Now Pay Later लोन -
सर्वसाधरणपणे फेस्टिव्ह सीजनमध्ये खरेदीसाठी क्रेडिट कार्डवर EMI चा पर्याय निवडतात. मोठा सेल आणि भरघोस डिस्काउंटचा लाभ घेण्यासाठी लोक या पर्यायांची निवड करतात. पण हे ऑप्शन त्या लोकांसाठी गरजेचा आहे ज्यांची क्रेडिट हिस्ट्री चांगली आहे. पण ज्यांची क्रेडिट हिस्ट्री नसते किंवा ज्यांच्याकडे जास्तीचे लोन घेण्याचा पर्याय नसतो
Buy Now Pay Later पर्याय निवडू शकतो. Buy Now Pay Later मध्ये कसे होते पेमेंट?
जेव्हा कोणताही ग्राहक Buy Now Pay Later ऑप्शन निवडतो तेव्हा मध्यस्थी मर्चेंट प्लेअर असतो. ही कोणतीही फिनटेक कंपनी असू शकते. हा ऑप्शन वापरून खरेदी करण्यासाठी हा मर्चंट समोरच्या पार्टीला पेमेंट करतो आणि आपल्याकडून दरमहिन्याला हफ्त्यांमध्ये ते पेमेंट घेतात. सर्वसाधारण पणे या पेमेंटला No Cost EMI मानले जाते
या कंपन्या देतात Buy Now Pay Later सुविधा
आता भारतात जवळपास सर्व मोठ्या फिनेटेक कंपन्या आपल्या ग्राहकांना Buy Now Pay Later ही सुविधा देतात. त्यापैकी MobiKwik Zip, Paytm Postpaid, Zest Money, Early Salary, LazyPay, Simpl, Amazon Pay Later आणि Flipkart Pay Later हे ऑप्शन उपलब्ध आहेत.
छोट्या रक्क्मेसाठी Buy Now Pay Later
बाय नाऊ आणि पे लॅटर ही फॅसिलिटी देणाऱ्या कंपन्या लेझी पे आणि सिंपल सारख्या कंपन्या थेट तुमचे बिल पेमेंट करते आणि एका ठराविक काळानंतर तुम्हाला ते पेमेंट करावे लागते. जिथे खरेदीची रक्कम छोटी आहे अशा कंपन्या नेहमी Swiggy किंवा Big Basket सारख्या मर्चंटसोबत टायप करतात Buy Now Pay Later मध्ये मिळते मोठे लोन
काही कंपन्या Buy Now Pay Later ही सुविधा देणाऱ्या कंपन्या लोकांना मोठ्या रक्कमेचेही लोन देतात. त्यामध्ये Capital Float, Zest Money आणि Early Salary सारख्या कंपन्याचा समावेश आहे. अशा कंपन्या EMI वर 1 ते 3 लाख रुपयांपर्यंत देतात पण,Buy Now Pay Later लोने घेणे फायदेशी आणि सुरक्षित आहे का?
Buy Now Pay Later चे व्याज
जर तुम्ही Buy Now Pay Later हा पर्याय निवडला असेल तर सर्वात आधी तुम्ही लोनवर लावण्यात येणारे व्याजबाबत माहिती घ्या. कित्येक वेळा हे लोन झिरो कॉस्टवर मिळते पण, फिनटेक कंपनियां कोणत्याही सामानाची खरेदीमुळे मिळणारे मार्जिन मर्चंटसोबत शेअर करते. पण अशावेळी व्याज फ्री लोनचा कालावधी 15 ते 30 दिवस असतो त्यानंतर मात्र तुम्हाला EMI मध्ये पेमेंट करावे लागते.
Buy Now Pay Laterमध्ये लोन डिफॉल्ट झाले तर
कित्येकदा असे होते के जेव्हा आपल्या मासिक हप्ता पे करू शकत नाही. जेव्हा बँकेकडन लोक घेतल्यावर असे होते तेव्हा जास्त व्याज आणि दंड भरावा लागतो. Buy Now Pay Later सुविधेमध्ये जर तुम्ही वेळेत हफ्ते परत करू शकला नाही तर तुम्हाला 500 ते 1000 रुपयांपर्यंत दंड आकारण्यासोबत 2.5 टक्क्यांपर्यत मासिक व्याज द्यावे लागते.
Buy Now Pay Laterवर रिफंड मिळतो का?
कित्येकदा असे होते की आपण काहीतरी खरेदी करतो पण नंतर ती गोष्ट आपल्याला आवडतं नाही. अशावेळी जर तुम्ही पेमेंट Buy Now Pay Later ऑप्शनने केले असेल तर कित्येकदा रिफंड मिळविण्यात अडचण येऊ शकते. ही समस्या तेव्हा उद्भवते जेव्हा ग्राहक लोनच्या अटी नीट समजून घेत नाही किंवा त्यामध्ये पारदर्शकता नसते. त्यामुळे ग्राहकांानी अशा प्रकारच्या कर्ज घेण्यापूर्वी आधी पूर्णपणे खात्री करून घ्या.Buy Now Pay Later मुळे खराब होते CIBIL!
कोणत्याही व्यक्तीला मोठे कर्ज घेण्यासाठी CIBIL च्या क्रेडिट स्कोरची गरज पडते. नेहमी लोक गरज नसताना Buy Now Pay Later हा पर्याय निवडतात. अशावेळी या सुविधेअंर्तगत जी रक्कम तुम्हाला मिळते ती खर तर तुमच्या क्रेडिट लाईनचा भाग असते. जर तुम्ही ती वापरली नाही तर त्यामुळे तुमची क्रेडीट लाईन कमकूवत बनवते आणि त्याचा थेट परिणाम तुमच्या CIBIL Score वर पडतो. सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.