Mutual Fund Sakal
अर्थविश्व

Mutual Fund: टॅक्स सेव्हिंगसह बंपर रिटर्न स्कीम; फक्त 5 वर्षात एक लाखाचे 3 लाख

शिल्पा गुजर

Mutual Fund ELSS : म्युच्युअल फंडातील गुंतवणूकदारांना टॅक्स सेव्हिंगसह मजबूत परतावा मिळवता येतो. म्युच्युअल फंडांच्या इक्विटी लिंक्ड सेव्हिंग्ज स्कीम्समधील (ELSS) गुंतवणूक कलम 80C अंतर्गत 1.50 लाखांपर्यंत रक्कम कर कपातीसाठी पात्र आहेत. ELSS मधील कर कपातीसह मिळणार्‍या परताव्यामुळे या योजनेत गुंतवणूकदारांचा इंटेरेस्ट वाढतोय. तुम्ही ELSS स्कीमच्या परताव्याच्या चार्टवर नजर टाकली तर, टॉप 5 फंडांनी सरासरी 20 ते 25 टक्के वार्षिक परतावा दिला आहे. यातील एका स्कीममध्ये तर 1 लाख रुपयांच्या गुंतवणुकीचे 5 वर्षांत 3 लाख रुपये झाले.

ELSS मध्ये वाढता कल

असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडिया (AMFI) च्या आकडेवारीनुसार, डिसेंबर 2021 मध्ये ELSS द्वारे इक्विटी योजनांमध्ये 567.04 कोटी रुपये गुंतवले गेले. तर नोव्हेंबरमध्ये ELSS मध्ये 174 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली. त्याच वेळी, ऑक्टोबरमध्ये या योजनांमधून 488 कोटी रुपयांचा आउटफ्लो दिसून आला. डबल लाभामुळे, ही स्कीम लोकप्रिय झाली आहे. त्याला 3 वर्षांचा लॉक इन कालावधी आहे. म्हणजेच त्यात तुमची गुंतवणूक किमान 3 वर्ष ठेवणे आवश्यक आहे.

टॅक्‍स सेव्हिंगसह सगळ्यात कमी लॉक-इन

इक्विटी लिंक्ड सेव्हिंग्ज स्कीम्स (ELSS) मधील इन्कम टॅक्सच्या कलम 80C अंतर्गत गुंतवणूक केल्यास 1.50 लाख रुपयांपर्यंत कर कपात मिळते अशी माहिती BPN Fincap चे संचालक AK निगम यांनी दिली. टॅक्स सेव्हिंगच्या दृष्टीने 3 वर्षांचा सर्वात कमी लॉक-इन कालावधी असलेले हे प्रॉडक्ट आहे. म्हणजेच तुम्ही गुंतवणूक केल्यापासून तीन वर्षांनी तुम्ही पैसे काढू शकता. तुम्ही इतर कर बचत पर्याय पाहिल्यास, त्यांचा लॉक-इन कालावधी जास्त आहे. उदाहरणार्थ, बँक एफडीमध्ये 5 वर्ष, पीपीएफमध्ये 15 वर्षे, त्यामुळे ही सर्वात कमी कालावधीची स्कीम असल्याने सध्या अतिशय लोकप्रिय आहे. ELSS मधील गुंतवणूक एकरकमी आणि मासिक अर्थात एसआयपीद्वारे (SIP) केली जाऊ शकते.

पाच वर्षांत तिप्पट परतावा

तुम्ही ईएलएसएस कॅटेगरीतील सर्वात जास्त परतावा देणारी योजना ही क्वांट टॅक्स स्कीम आहे. गेल्या 5 वर्षातील क्वांट टॅक्स योजनेचा वार्षिक परतावा सरासरी 25.50 टक्के आहे. या योजनेत किमान एकरकमी 500 रुपयांची गुंतवणूक करता येईल. त्याच वेळी, किमान 500 रुपयांच्या एसआयपीसह गुंतवणूक करता येते. 31 डिसेंबर 2021 पर्यंत त्याची एसेट्स 658 कोटी रुपये होती. त्याच वेळी, या योजनेतील खर्चाचे प्रमाण 0.57 टक्के आहे.

याशिवाय, इतर टॉप टॅक्स सेव्हिंग म्युच्युअल फंड देणार्‍या योजना म्हणजे मिराए अॅसेट टॅक्स सेव्हर फंड (5 वर्षांत सरासरी 21.57 टक्के) आणि BOI AXA टॅक्स अॅडव्हांटेज फंड (5 वर्षांत सरासरी 20.75 टक्के) रिटर्न मिळाला आहे.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT