on national girl child day starts your daughter Insurance
on national girl child day starts your daughter Insurance  
अर्थविश्व

#NationalGirlChildDay मुलींच्या उज्ज्वल भविष्यासाठी करा आजच तरतूद!

सकाळ डिजिटल टीम

केंद्र सरकारने मुलींसाठी ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ आंदोलन हाती घेतले. त्याअंतर्गत मुलीच्या शिक्षणाची सोय व तिच्या लग्नासाठी तरतूद करण्यासाठी, 'सुकन्या समृद्धी' योजना देखील सुरु केली. सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत मुलीच्या अठराव्या वर्षी 50 टक्के  रक्कम तिच्या शिक्षणासाठी काढता येते व बाकी रक्कम 21 वर्षांनंतर किंवा लग्नाच्या वेळेस (18 ते 21 वर्षांदरम्यान) काढता येते. 

अशी आहे सुकन्या समृद्धी योजना 
योजनेत पालक कन्येच्या नावाने जवळच्या कोणत्याही टपाल कार्यालयात खाते उघडू शकतात. एक पालक किंवा कायदेशीर पालक जास्तीत जास्त दोन मुलींसाठी खाती उघडू शकतो.  दुसऱ्या जुळ्या मुलींसाठी किंवा तिळ्यांसाठी नियमांत शिथिलता आहे. गुंतवणुकीसाठी मुलीचे वय 10 वर्षांच्या आत हवे. मुलीचा जन्माचा दाखला व पालकाची केवायसी कागदपत्रे खाते उघडण्यासाठी आवश्‍यक आहेत; मात्र या खात्यामध्ये वारस नेमण्याची सुविधा नाही. 250 रुपये भरून खाते उघडता येते. त्यानंतर 100 च्या पटीत एका आर्थिक वर्षात जास्तीत जास्त दीड लाख रुपये जमा करता येतात. या खात्यात वर्षात कमीत कमी एक हजार रुपये भरणे आवश्‍यक आहे. न भरल्यास खाते खंडित होईल व पुनरुज्जीवित करण्यासाठी 50 रुपये दंड आकारण्यात येतो. यामध्ये मुलीचे वय 18 झाल्यास किंवा त्यापुढे असल्यास 50 टक्‍क्‍यांपर्यंत रक्कम काढता येते. मुलीचे वय 21 झाल्यावर खाते बंद करता येईल. 18 व्या वर्षीच लग्न झाल्यास मुदतपूर्वसुद्धा बंद करता येते. व्याजाचा दर तिमाहीमध्ये ठरविला जातो.  तसेच, व्याज चक्रवाढ पद्धतीने दिले जाते. पोस्ट ऑफिस किंवा सरकारी बँकाच्या कोणत्याही शाखेत हे खाते उघडता येते.

कर बचत:
पालकांना 80 सी कलमाअंतर्गत गुंतवलेल्या रकमेवर प्राप्तिकरांतून वजावट मिळते. योजनेतून व्याज लाभ करमुक्त आहे. साधारणपणे मुलांचे उत्पन्न वडिलांच्या उत्पन्नात मिळवून त्यावर वडिलांना प्राप्तिकर भरावा लागतो. परंतु या योजनेत गुंतवलेली रक्कम व व्याज वयाची 18 वष्रे पूर्ण झाल्याखेरीज मुलीला मिळणार नाही. त्यामुळे मुलगी सज्ञान झाल्यावर एकत्रित उत्पन्नावर कर आकारण्याचा प्रश्न उद्भवत नाही.

'डबल' फायदा:
पालकांनी मुलांच्या नावावर सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (पीपीएफ) खाते उघडल्यास पालक व पाल्य दोघांच्या खात्यांत मिळून कमाल रू. 1,50,000/-  गुंतवणूक करता येते. या उलट पालक आपल्या पीपीएफ खात्यात रू.1,50,000/- गुंतवून सुकन्या समृद्धी खात्यात जास्तीचे रु.1,50,000/-  गुंतवू शकतात. या खात्यास पीपीएफपेक्षा व्याज थोडे  जास्त आहे. 

'सकाळ मनी'चा खास उपक्रम 
आपल्या मुला-मुलींच्या उज्ज्वल भविष्यासाठी जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे आर्थिक तरतूद करणे, हे प्रत्येक पालकाचे स्वप्न असते. यासाठी योग्य वेळी गुंतवणुकीला सुरवात करणे खूप महत्त्वाचे असते. नेमकी हीच बाब लक्षात घेऊन सकाळ मनीने पालकांसाठी ‘एसआयपी डे’आयोजित केला आहे. पालकांना आपल्या मुला-मुलींच्या नावे म्युच्युअल फंडात ‘सिस्टेमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन’(एसआयपी) सुरू करण्याची एक उत्तम संधी यामुळे मिळणार आहे.

‘एसआयपी डे’चे पुन्हा आयोजन
याआधीच्या उपक्रमाला मिळालेला उत्साहवर्धक प्रतिसाद लक्षात घेऊन येत्या शनिवारी (ता. 25 जानेवारी) पालकांसाठी अशाच प्रकारचा उपक्रम पुन्हा राबविण्यात येणार असल्याचे ‘सकाळ मनी’चे बिझनेस हेड रोशन थापा यांनी सांगितले. लहान मुला-मुलींच्या पालकांसाठी या खास ‘एसआयपी डे’चे आयोजन केले जाणार आहे. दरमहा अगदी किमान 500 रुपयांपासून ‘एसआयपी’ला  सुरवात करता येते. आघाडीच्या तब्बल 30 म्युच्युअल फंड कंपन्यांमधून चांगल्या योजना निवडता येणार आहेत. तेव्हा ‘सकाळ मनी’ची टीमच्या मदतीने या सुवर्णसंधीचा पालकांनी अवश्‍य लाभ घ्यायला हवा.  

'मुलांसाठी एसआयपी' या उपक्रमात सहभागी होण्यासाठी नावनोंदणी करणे आवश्‍यक आहे.

वार व तारीख - शनिवार,  25 जानेवारी 2020
वेळ - सकाळी 11.00 ते संध्या. 5.00  
स्थळ - ‘सकाळ’ कार्यालय, 595 बुधवार पेठ, शनिवारवाड्याजवळ, पुणे
नावनोंदणीसाठी फक्त मिस्ड कॉल द्यावा.  त्यासाठीचा क्रमांक - 7447450123

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : लोकसभा मतदानाचा तिसरा टप्पा; १२ राज्यांमधील ९३ जागांवर आज पार पडणार मतदान

Loksabha Election 2024 : मतदानाचा आज तिसरा टप्पा; राज्यातील ११ मतदारसंघांमध्ये तयारी पूर्ण

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

SCROLL FOR NEXT