अनेक नामांकित आणि बलाढ्य संस्था/कंपन्यांच्या कामांशी निगडित ‘एमटारटेक’ ही ५,१८,२९९ लाख रुपयांचे मार्केट कॅपिटल असलेली हैदराबाद येथील कंपनी १९७० मध्ये सुरू होऊन ती ‘इंडियन सिव्हील न्युक्लिअर प्रोग्राम, ‘इंडियन डिफेन्स’, ग्लोबल डिफेन्स’ तसेच ‘ग्लोबल क्लीन एनर्जी सेक्टर’ आदींसाठी मोठे योगदान देत आहे. कंपनीना ISRO, DRDO, RAFAEL आदी ग्राहकांचे पाठबळ असून, कंपनीला तिच्या कार्यक्षेत्रामध्ये प्रतिस्पर्धा जवळजवळ नगण्य आहे.
हा शेअर १५ मार्च २०२२ रोजी नॅशनल स्टॉक एक्स्चेंजवर रु. १०४५ वर सर्वप्रथम उघडला. त्यानंतर तो सलग चढत्या कलाने (Rising Trend) २०२१ अखेरीस रु. २५५८ पातळीपर्यंत वाढला. नंतर मोठे करेक्शन होऊन उतरत्या कलाने तो जुलै २०२२ मध्ये रु. १२०५ पातळीपर्यंत खाली आला. पुढे ऑगस्ट २०२२ मध्ये त्याने रु. १४०० ची पातळी गाठली. तेव्हापासून आजपर्यंत रु. १५०० आणि रु. १७६० या दोन पातळ्यांदरम्यान बंदिस्त आहे. थोडक्यात, सध्या तो ‘कन्सॉलिडेशन स्टेट’मध्ये आहे.
ही कन्सॉलिडेशनची स्थिती चालू असेपर्यंत रु. १४०० वर स्ट्रिक्ट स्टॉपलॉस लावून शेअरखरेदी चालू ठेवावी. रु. १७६० पातळीला जेव्हा मोठ्या उलाढालीसह ब्रेकआऊट मिळेल, तेव्हाच मोठी खरेदी करावी. येत्या काही आठवड्यांमध्ये या शेअरमध्ये मोठी रॅली येण्याची शक्यता आहे. शॉर्ट टर्मसाठी या शेअरचे लक्ष्य रु. २६०० असून, मीडियम टर्मसाठी ते रु. २८०० ते रु. ३२०० असेल.
खरेदीसाठी रिस्कःरिवॉर्ड रेशो १ः३ असून, तो खरेदीस पूरक असाच आहे.
टीपः ब्रेकआऊटनंतर खरेदी करतेवेळी ट्रेलिंग स्टॉपलॉसचा वापर करण्यास विसरू नये.
(लेखक किरण जाधव अँड असोसिएट्स् येथे तांत्रिक विश्लेषक आहेत.)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.