Nirmala Sitharaman sakal
अर्थविश्व

Budget 2023 : सरकारी बँकांबाबत मोठा निर्णय, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली घोषणा!

केंद्र सरकारकडून बँकांसाठी वेळोवेळी अनेक मोठे निर्णय घेतले गेले आहेत.

सकाळ डिजिटल टीम

FM Nirmala Sitharaman on Banks : केंद्र सरकारकडून बँकांसाठी वेळोवेळी अनेक मोठे निर्णय घेतले गेले आहेत. बँकांच्या खाजगीकरणानंतर सरकारने असा निर्णय घेतला आहे, ज्यामुळे तुम्हाला धक्का बसेल.

सरकारच्या अर्थसंकल्पाला काही दिवस उरले आहेत. दरम्यान, सरकारने या अर्थसंकल्पात बँकांमध्ये भांडवल टाकणार नसल्याचे म्हटले आहे.

सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या चांगल्या आर्थिक स्थितीमुळे पुढील आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पात सरकारकडून नव्या भांडवलाची घोषणा होण्याची शक्यता कमी दिसत आहे.

सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या भांडवल पर्याप्ततेचे प्रमाण जास्त होत आहे आणि सध्या ते 14 टक्के ते 20 टक्क्यांच्या श्रेणीत आहे.

या बँका आपली संसाधने वाढवण्यासाठी बाजारातून निधी उभारत आहेत. याशिवाय ते त्यांची नॉन-कोअर मालमत्ता विकण्याची पद्धतही अवलंबत आहेत.

सरकारने 2021-22 या आर्थिक वर्षात सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये शेवटचे भांडवल गुंतवले होते. पुरवणी मागणी अनुदानाद्वारे बँकेच्या पुनर्भांडवलीकरणासाठी 20,000 कोटी रुपये राखून ठेवले होते.

हेही वाचा : प्राप्तिकर उत्पन्न सवलत मर्यादा वाढणार?

गेल्या 5 वर्षात किती भांडवल जमा झाले?

गेल्या पाच आर्थिक वर्षांमध्ये म्हणजे 2016-17 ते 2020-21 या काळात, सरकारने सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये 3,10,997 कोटी रुपयांचे भांडवल गुंतवले आहे.

यापैकी 34,997 कोटी रुपये अर्थसंकल्पीय वाटपाद्वारे तर 2.76 लाख कोटी रुपये या बँकांना पुनर्भांडवलीकरण आणि रोखे जारी करून उभारण्यात आले.

अर्थमंत्री निर्मला सीतारामन 1 फेब्रुवारी रोजी 2023-24 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. पुढील वर्षी सार्वत्रिक निवडणुका होणार असल्याने नरेंद्र मोदी सरकारच्या चालू कार्यकाळातील हा शेवटचा पूर्ण अर्थसंकल्प असेल.

12 बँकांना 15,306 कोटींचा नफा :

सर्व 12 सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत एकूण 15,306 कोटी रुपयांचा नफा कमावला आहे.

दुसऱ्या तिमाहीत ही रक्कम वाढून 25,685 कोटी रुपये झाली. वर्षभरापूर्वीच्या तुलनेत या बँकांच्या नफ्यात पहिल्या तिमाहीत नऊ टक्क्यांनी तर दुसऱ्या तिमाहीत 50 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

SBI ला 13,265 कोटींचा नफा :

देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने दुसऱ्या तिमाहीत आतापर्यंतचा सर्वाधिक 13,265 कोटी रुपयांचा नफा कमावला आहे. वर्षभरापूर्वीच्या याच तिमाहीच्या तुलनेत ही वाढ 74 टक्के होती.

बँकांच्या एकूण नफ्यात 32 टक्क्यांनी झाली वाढ :

चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचा एकूण नफा 32 टक्क्यांनी वाढून 40,991 कोटी रुपयांवर पोहोचला आहे.

यापूर्वी, 2021-22 या आर्थिक वर्षात, कोविड महामारीच्या आव्हानांना न जुमानता, या बँकांचा एकूण नफा दुपटीने वाढून 66,539 कोटी रुपयांवर पोहोचला होता.

सार्वजनिक क्षेत्रातील अनेक बँकांनी गेल्या आर्थिक वर्षात लाभांश जाहीर केला होता. एकूण नऊ सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी भागधारकांना लाभांश म्हणून 7,867 कोटी रुपये वितरित केले होते.

वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी अलीकडेच सांगितले होते की, बुडीत कर्जाची समस्या दूर करण्यासाठी घेतलेल्या प्रयत्नांचे परिणाम मिळू लागले आहेत आणि सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचा नफा वाढू लागला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

गणेशोत्सवासाठी धावणार चिपळूण-पनवेल मेमू, मडगाव-लोकमान्य टिळक टर्मिनस गाडीचीही घोषणा; पाहा वेळापत्रक

Sindhudurg Teacher Recruitment: सिंधुदुर्गात शिक्षक भरतीचा फज्जा? २८२ पदांची जाहिरात, मिळणार फक्त १६९ शिक्षक; पुन्हा २२५ पदे रिक्त

Mumbai Crime: मुंबईत हायप्रोफाइल वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश, २६ वर्षीय मॉडेलचा सौदा; प्रसिद्ध हॉटेलच्या रूमवर कंडोमचा बॉक्स अन्...

Marathi News Live Updates : सोलापुरात मराठा आंदोलकांचा रास्ता रोको, पुणे-हैदराबाद महामार्गावर वाहतूक ठप्प

७०,००,००,०००! सचिन तेंडुलकरने 'मुंबई-पुणे'जवळ खरेदी केला भूखंड, ३.९ एकरावर उभारणार सेकंड होम; नेमकी ही जागा कुठे?

SCROLL FOR NEXT