Pension
Pension Sakal
अर्थविश्व

EPS 95 Pensioner: पेन्शन महिन्याच्या या दिवशी होणार खात्यात जमा, नियमात बदल

सकाळ डिजिटल टीम

EPS 95 पेन्शनधारकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण आता पेन्शन त्यांच्या बँक खात्यात (Bank Account) महिन्याच्या शेवटच्या दिवशी जमा होणार आहे. पेन्शन वितरण करणार्‍या बँकांसोबतच्या सध्याचा बँक करारानुसार, पेन्शन (Pension) त्या महिन्याच्या पहिल्या दिवशी किंवा पाचव्या दिवशी जमा करावे. मात्र, पेन्शनधारकांच्या पेन्शनचे पेमेंट देयक त्या तारखेला खात्यात जमा केले जात नाही,असे निदर्शनास आले. त्यामुळे ईपीएस पेन्शनधारकांना अडचणी येतात. पेन्शन विभागाकडून याबाबतचा आढावा घेण्यात आला आहे. आरबीआयच्या (Rbi) निर्देशानुसार, सर्व क्षेत्रीय कार्यालये मासिक विवरणपत्र बँकांना अशा प्रकारे पाठवू शकतील की, महिन्याच्या शेवटच्या दिवशी किंवा त्यापूर्वी पेन्शनधारकांच्या खात्यात पेन्शन जमा होईल. यात मार्च महिना वगळला आहे. (1 एप्रिल रोजी किंवा नंतर पेन्शन जमा होईल.)

पेन्शनधारकांच्या खात्यात जमा होण्याच्या दोन दिवस आधी पेन्शन वितरण करणाऱ्या बँकांना पाठवले जाते, त्याची एकाच वेळी खात्री केली जाऊ शकते EPFO ने पेन्शनधारकांना पेन्शन जमा करण्यासाठी अनेक पेन्शन वितरण बँकांशी करार केले आहेत. तर, RBI नियमितपणे पेन्शन वितरण संस्थांना बँकांद्वारे पेन्शन जमा करण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे आणि निर्देश देते. EPFO द्वारे पेन्शन वितरणावरील तरतुदी वेळोवेळी दिलेल्या आरबीआयच्या परिपत्रकांवर आधारित आहेत.

family pension

डिजिटल जीवन प्रमाणपत्र सादर करणे गरजेचे

कर्मचारी पेन्शन योजना 1995 (EPS'95) च्या सर्व पेन्शनधारकांनी पेन्शन काढणे सुरू ठेवण्यासाठी दरवर्षी जीवन सन्मान पत्र (JPP) किंवा डिजिटल जीवन प्रमाणपत्र (DLC) सादर करणे आवश्यक आहे. एम्प्लॉइज प्रॉव्हिडंट फंड ऑर्गनायझेशन (EPFO) ने आधीच EPS पेन्शनधारकांना त्यांचे DLC सबमिट करण्यासाठी अनेक पर्याय दिले आहेत. नवीन मार्गदर्शक तत्त्वांनुसार, EPS पेन्शनधारक आता सोयीनुसार वर्षभरात कधीही DLC सबमिट करू शकतात. जीवन प्रमाणपत्र DLC सादर केल्याच्या तारखेपासून एक वर्षासाठी वैध राहील.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कर्तव्यनिष्ठ CJI चंद्रचूड! ब्राझीलरुन परतताना विमानात तयार केला निर्णयाचा मसुदा, असा केला इंटरनेटचा जुगाड

Uddhav Thackeray : महाराष्ट्र तुम्हाला मातीत गाडेल;उद्धव ठाकरे यांचा मोदी-शहा यांना ‘इंडिया’च्या सभेत इशारा

One Chip Challenge: अति मसालेदार चिप्स खाल्ल्याने हृदयविकाराचा झटका; तरुणाने गमावला जीव

Hardik Pandya Banned : T20 वर्ल्ड कपपूर्वी BCCIने हार्दिक पांड्यावर घातली बंदी! 'या' चुकीची मोजावी लागली किंमत

Loksabha News: मोदींनी घेतली नाही ठाकरेंच्या मागण्यांची दखल, नागरिकांमध्ये रंगल्या चर्चा

SCROLL FOR NEXT