NSDC sakal media
अर्थविश्व

देशभरातील अॅप्रेंटिसशिप मेळाव्यात; एक लाख उमेदवारांना रोजगार

कृष्ण जोशी

मुंबई : स्किल इंडिया व नॅशनल स्किल डेव्‍हलपमेंट कॉर्पोरेशन (NSDC) यांच्‍यातर्फे सोमवारी (ता. 4) देशभरातील 400 हून अधिक ठिकाणी अप्रेन्टिसशीप (apprenticeship) मेळाव्याचे आयोजन केले आहे. या उपक्रमात जवळपास एक लाख प्रशिक्षणार्थींना (one lac trainee) नियुक्‍त्या मिळू शकतील.

या मेळाव्यात इव्‍हेण्‍टला ऊर्जा, रिटेल, दूरसंचार, आयटी, इलेक्‍ट्रॉनिक्‍स, ऑटोमोटिव्‍ह अशा तीसहून अधिक प्रकारच्या दोन हजारांहून जास्त कंपन्‍यांचा सहभाग असेल. यात वेल्‍डर, इलेक्‍ट्रीशियन, हाऊसकिपर, ब्‍युटिशियन, मेकॅनिक अशा पाचशेहून अधिक प्रकारच्या नोकऱ्या व त्यांचे प्रशिक्षण संबंधितांना मिळू शकेल.

5 वी ते 12 वी उत्तीर्ण विद्यार्थी, कौशल्‍य प्रशिक्षण प्रमाणपत्रधारक, आयटीआय विद्यार्थी, डिप्‍लोमाधारक व पदवधीर अप्रेन्टिसशीप या मेळाव्‍यामध्‍ये नोकरीसाठी अर्ज करू शकतील. संभाव्‍य अर्जदारांना अप्रेन्टिसशीप मेळाव्‍यात त्‍याच ठिकाणी अप्रेन्टिसशीप मिळण्‍याची आणि थेट उद्योग कार्यसंचालनाचा अनुभव मिळण्‍याची संधी आहे. त्‍यांना नवीन कौशल्‍ये विकसित करण्‍यासाठी सरकारी मानकांनुसार मासिक वेतन मिळेल.

उमेदवारांना नॅशनल कॉन्सिल फॉर वोकेशनल एज्‍युकेशन अॅण्‍ड ट्रेनिंग ची प्रमाणपत्रे मिळतील. त्यामुळे प्रशिक्षणानंतर त्‍यांना इतरत्र रोजगार मिळू शकेल. उमेदवारांनी अर्जाच्या व आपल्या माहितीच्या तीन प्रती, सर्व गुणपत्रिका व प्रमाणपत्रांच्‍या तीन प्रती ओळखपत्र (आधार कार्ड / ड्रायव्हिंग लायसन्‍स) आणि तीन पासपोर्ट आकाराचे फोटो आणावेत. मेळाव्‍याची ठिकाणे तसेच इतर माहितीसाठी लिंक https://dgt.gov.in/appmela/

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Surendra Koli : निठारी प्रकरणात निर्दोष मुक्त सुरेंद्र कोलीने जीवन संपवले; २१ वर्षांच्या तुरुंगवासानंतर पुन्हा सुरू केले होते सामान्य आयुष्य

६ वर्षांपासून क्लार्क, पण टायपिंग टेस्टमध्ये तीनदा फेल; जिल्हाधिकाऱ्यांनी डिमोशन करत शिपाई बनवलं

Pune Bus Blaze: शिवाजीनगर चौकात पीएमपी बसला अचानक आग; अग्निशामक जवानाच्या सतर्कतेने प्रवाशांचे प्राण वाचले

Pune Illegal PG Hostels : लोहगावमध्ये ११ बेकायदेशीर पीजी हॉस्टेल सील; विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालणाऱ्या जागामालकांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश

Gambling Raid : गंगापूरमध्ये रम्मी जुगार अड्ड्यावर धाड; १.९२ लाखांचा मुद्देमाल जप्त, तिघांसह चौघांवर गुन्हा

SCROLL FOR NEXT