Pakistan Economic Crisis  Sakal
अर्थविश्व

Pakistan Economic Crisis : पाकिस्तान आर्थिक संकटात; सिलेंडरची किंमत 10 हजारांच्या पार

पाकिस्तानची आर्थिक स्थिती बिकट होत चालली आहे.

सकाळ डिजिटल टीम

Pakistan Economic Crisis :  पाकिस्तानची आर्थिक स्थिती बिकट होत चालली आहे. लोक दैनंदिन खाद्यपदार्थांसाठी देखील रांगेत उभे आहेत. लोकांना पीठ, दूध, तांदूळ यासारख्या वस्तूही मिळत नाहीत.

जागतिक बँकेने पाकिस्तानच्या विकास दरात मोठी घसरण होण्याचा अंदाज वर्तवला आहे. चालू वर्षात (2022-23) पाकिस्तानचा आर्थिक विकास दर दोन टक्क्यांपर्यंत खाली येण्याचा अंदाज जागतिक बँकेने व्यक्त केला आहे.

जून 2022च्या अंदाजापेक्षा विकास दर दोन टक्के कमी आहे. जागतिक बँकेच्या ग्लोबल इकॉनॉमिक आऊटलूक अहवालात म्हटले आहे की, भीषण पूर आणि जागतिक विकास दरातील घसरणीमुळे पाकिस्तानचा विकास दर पूर्वीच्या अंदाजापेक्षा कमी असेल.

पाकिस्तानच्या 'डॉन' या वृत्तपत्राने बुधवारी दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, जागतिक बँकेचा हा अहवाल दीर्घकाळ चालणारी मंदी दर्शवतो. या वर्षी जागतिक विकास दर 1.3 टक्के राहील, असे अहवालात म्हटले आहे. जूनमध्ये जागतिक विकास दर तीन टक्के राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता.

हेही वाचा : या महामार्गामुळं खरंच येईल 'समृद्धी'?

महागाई 24.5 टक्क्यांवर

जागतिक बँक समूहाच्या एका अग्रगण्य प्रकाशनाने प्रसिद्ध केलेल्या अहवालात म्हटले आहे की, उच्च चलनवाढ, उच्च व्याजदर, गुंतवणुकीचा अभाव आणि युक्रेन-रशिया युद्धामुळे निर्माण झालेल्या व्यत्ययामुळे जागतिक वाढ झपाट्याने खाली येत आहे. यासह पाकिस्तानमधील महागाई 24.5 टक्क्यांवर पोहोचली आहे.

एक किलो पिठाची किंमत 150 रुपये

पाकिस्तानमध्ये पिठाची किंमत 150 रुपये प्रति किलोच्या पातळीवर पोहोचली आहे. येथे 15 किलो पिठाची पोती 2250 रुपयांना विकली जात आहे. यासोबतच लाहोरमध्ये पिठाची किंमतही 145 रुपये प्रति किलोवर पोहोचली आहे.

व्यावसायिक गॅस सिलिंडर 10, 000 पाकिस्तानी रुपयांना उपलब्ध आहे, वाढत्या किमतीच्या चिंतेमुळे लोकांना एलपीजी गॅस प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये साठवावा लागत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shaktipeeth Highway : नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्गाला बांदावासियांचा तीव्र विरोध! 214 एकर जमीन बाधित होणार, ग्रामसभेत एकमुखी ठराव मंजूर

Sparrow Chick Rescue : घरट्यातून पिल्लू खाली पडलं अन्...; चिमणीची लेकरासाठी जीवाचा आकांत करणारी धडपड पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले, हॉस्पिटलबाहेरील 'तो' प्रसंग नक्की काय?

Vastu Shastra: झाडू ठेवण्याचीही असते योग्य दिशा? वास्तुशास्त्रातील ‘हा’ नियम जाणून घ्या

Latest Marathi News Live Update : चाकणच्या सर्वांगीण विकासासाठी विविध यंत्रणांनी समन्वयाने काम करावे- सुनेत्रा पवार

Raksha Bandhan 2026: पीरियड्समध्ये भावाला राखी बांधता येते का? जाणून घ्या सत्य काय अन् परंपरा काय

SCROLL FOR NEXT