PAN Card Esakal
अर्थविश्व

Pan Card : घरबसल्या अवघ्या काही तासांत मिळणार पॅनकार्ड; 'या' बँकेने सुरु केली सेवा

तुम्ही अजून पॅन कार्ड काढले नसेल, तर तुम्हाला आता काळजी करण्याची गरज नाही.

सकाळ डिजिटल टीम

तुम्ही अजून पॅन कार्ड काढले नसेल, तर तुम्हाला आता काळजी करण्याची गरज नाही. आता डिजिटल माध्यमातून पॅनकार्ड काही तासांत सहज उपलब्ध होणार आहे. यासाठी तुम्हाला काही महिने वाट पाहण्याची गरज नाही. ज्या प्रकारे आपण आधार कार्ड ऑनलाइन काढतो. त्याचप्रमाणे पॅन कार्ड देखील आता ऑनलाइन उपलब्ध आहे. तुम्ही पॅन कार्ड अगदी सहज डाउनलोड करू शकता. यासाठी फिनो पेमेंट्स बँकेने ही सेवा सुरू केली आहे. या सेवेमुळे तुमचे डिजिटल पॅन कार्ड काही तासांत बनवता येते.

हेही वाचा : किस्से बँकेच्या लाॅकररुममध्ये घडलेले...एका बँक अधिकाऱ्याच्याच तोंडून

फिनो पेमेंट्स बँकेने ही सेवा सुरू केली आहे. या नवीन सेवेमुळे ग्राहक काही तासांतच आधार कार्डच्या मदतीने नवीन पॅनकार्ड तयार करू शकतात. देशातील विशेषत: ग्रामीण भागात बँकेत पॅन कार्ड देण्याची सेवा आहे. त्या सेवेचा विस्तार करण्यासाठी त्यांनी Proteus eGov Technologies शी करार केला आहे.

यासाठी तुम्हाला कोणतेही कागदपत्र द्यावे लागणार नाही. यासाठी फिनो बँक सेंटरच्या मदतीने पॅन कार्ड बनवणे सोपे झाले आहे. ज्यांचे फिनो पेमेंट्स बँकेत खाते आहे त्या खातेधारकांना कोणतेही कागदपत्र द्यावे लागणार नाही. बँकेची ही सेवा फक्त डिजिटल स्वरुपाची असल्याचे फिनो बँकेकडून सांगण्यात आले आहे. पॅन कार्ड काही तासांतच वापरकर्त्यांच्या मेल आयडीवर पाठवले जाईल. असे बँकेकडून सांगण्यात आले आहे.

तुमचे ई पॅन कार्ड 4 ते 5 दिवसांत घरी पोहोचेल. तुम्ही हे ई-पॅन कार्ड प्रत्यक्ष पॅन कार्डप्रमाणे कुठेही वापरू शकता. तुम्हाला फिजिकल पॅन कार्ड हवे असल्यास तुम्ही फिनो बँकेची सेवा वापरू शकता. त्या सेवेच्या मदतीने तुम्ही ते घेऊ शकता.

तुम्हाला पॅन कार्डची हार्ड कॉपी मागवायची असेल, तर इन्कम टॅक्सच्या अधिकृत वेबसाइट https://www.onlineservices.nsdl.com/paam/ReprintEPan.html ला भेट द्या. येथे तपशील भरल्यानंतर, तुम्ही तुमच्या नोंदणीकृत पत्त्यावर पॅन कार्डची हार्ड कॉपी मिळवू शकता. देशात पॅन कार्ड ऑर्डर करण्यासाठी 93 रुपये + 18% जीएसटी शुल्क 110 रुपये द्यावे लागतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अमरावतीच्या रामपुरी कॅम्पमध्ये शिरला बिबट; चार तासांनंतर वनविभागाने घेतले ताब्यात, नागरिकांची मोठी गर्दी

Music Composer Harsh Raut : लोकसंगीत कॉन्सर्टद्वारे उंचीवर नेण्याचा प्रयत्न; मोशीत शुक्रवारी ‘द फोक आख्यान’ कार्यक्रमाचे आयोजन

RCB vs GT Qualifier 1 : RCB चा विक्रम! IPL इतिहासातील प्ले ऑफमधील सर्वोच्च धावसंख्या... रजत, विराट, कृणाल, देवदत्त यांचे वादळ

Shegaon News : वाहनधारकांना मेलोडी चॉकलेट वाटून केंद्र सरकारचा निषेध; शेगावात काँग्रेसचे आंदोलन

Vidhan Parishad Election : पुण्याच्या जागेसाठी भाजप आमदारांचे फडणवीसांना साकडे

SCROLL FOR NEXT