IPO Sakal media
अर्थविश्व

Paytm IPO: पेटीएमचा आयपीओ येणार; काय असेल किंमत? जाणून घ्या

पेटीएमचा आयपीओ यशस्वी झाला तर हा भारतातील आतापर्यंतचा सर्वात मोठा आयपीओ असेल.

सुधीर काकडे

- शिल्पा गुजर

पेटीएमचा आयपीओ (Paytm IPO) यशस्वी झाला तर हा भारतातील आतापर्यंतचा सर्वात मोठा आयपीओ (India's Biggest IPO) असेल. आतापर्यंत हा विक्रम कोल इंडियाच्या (Coal India) नावावर आहे.

पेटीएम (Paytm) देशातील सर्वात मोठा आयपीओ (IPO) आणणार आहे. त्याचा आयपीओ 8 नोव्हेंबरला सुरु होईल आणि 10 नोव्हेंबर रोजी बंद होईल. इश्यू प्राईस 2,080 ते 2,150 रुपये प्रति शेअर ठेवण्यात आली आहे. पेटीएमने आपला आयपीओ 18,300 कोटी रुपयांपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे,याआधी तो 16,600 कोटी रुपये इतका होता.

18 नोव्हेंबरला शेअर्स लिस्ट होतील
कंपनी 18 नोव्हेंबरला शेअर्स लिस्ट करणार आहे. आयपीओमध्ये 8,300 कोटींचे नवीन इक्विटी शेअर्स असतील. त्याचवेळी, विद्यमान भागधारकांद्वारे (Current Shareholders) ऑफर फॉर सेल (OFS) 1,700 कोटी रुपयांनी वाढवून 10,000 कोटी रुपयांपर्यंत केला आहे. कंपनीचे सर्वात मोठे शेअरहोल्डर अलीबाबा ग्रुपच्या अँट फायनान्शियल आणि सॉफ्टबँकसह विद्यमान गुंतवणूकदारांनी कंपनीतील त्यांची हिस्सेदारी विकण्याचा निर्णय घेतला आहे.

व्यवसाय झपाट्याने वाढवत आहेत विजय शेखर
पेटीएमचे संस्थापक आणि सीईओ विजय शेखर शर्मा गेल्या एक वर्षापासून महसूल वाढवण्यात आणि पेटीएमच्या सर्व्हिसना मॉनिटाइज करण्यात गुंतले आहेत. स्टार्टअपने आपला व्यवसाय डिजिटल पेमेंटच्या पलीकडे बँकिंग, क्रेडिट कार्ड, वित्तीय सेवा, संपत्ती व्यवस्थापन आणि डिजिटल वॉलेटमध्ये विस्तारला आहे. पेटीएमने फोनपे (PhonePe), गुगल पे (Google Pay), ऍमेझॉन पे (Amazon Pay) आणि व्हॉट्सऍप पेच्या (WhatsApp Pay)आव्हानाचा यशस्वीपणे सामना केला आहे. देशातील व्यापारी पेमेंटमध्ये त्याचा सर्वात मोठा बाजार हिस्सा आहे. कंपनीच्या अलीकडील ब्लॉग पोस्टनुसार, पेटीएमचे 2 कोटीपेक्षा अधिक व्यापारी भागीदार आहेत आणि त्याचे वापरकर्ते (Users) दरमहा 1.4 अब्जाचा व्यवहार करतात. या वर्षातील पहिले तीन महिने पेटीएमसाठी सर्वोत्तम ठरल्याचे शर्मा म्हणाले. दरम्यान, कोविडमुळे डिजिटल पेमेंटला सर्वोत्तम गती आल्याचेही ते म्हणाले.

पेटीएमचा आयपीओ यशस्वी झाला तर हा देशातील आतापर्यंतचा सर्वात मोठा आयपीओ असेल. आतापर्यंत हा विक्रम कोल इंडियाच्या नावावर आहे, ज्याने 2010 मध्ये आयपीओद्वारे 15,000 कोटी रुपयांहून अधिक कमाई केली होती. पेटीएमचा आयपीओ आयोजित करण्यासाठी शॉर्टलिस्ट केलेल्या बँकांमध्ये मॉर्गन स्टॅनले (Morgan Stanley), सिटीग्रुप इंक (Citigroup Inc.) यांचा समावेश आहे. आणि जेपी मॉर्गन चेस अँड कं. (JPMorgan Chase & Co) समाविष्ट आहेत. त्यापैकी मॉर्गन स्टॅन्लेचा (Morgan Stanley )दावा सर्वात मजबूत दिसत आहे.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्यप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Politics: तीन महिन्यांत ५ भेटी… ठाकरे बंधुंची युती पक्की की अजूनही चर्चा? पाहा सर्वात चर्चेत असलेली राजकीय भेटीची टाइमलाइन

Kojagiri Pournima 2025: कोजागिरी पौर्णिमेनिमित्त तुळजापूर मार्ग मंगळवारपर्यंत बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग

Dhule Traffic : धुळे वाहतूक कोंडी सुटली! गडकरींच्या निर्देशानंतर फागणे-धुळे वळण रस्त्याची एक बाजू १५ ऑक्टोबरपर्यंत खुली होणार

District Judge Dismissed: माेठी बातमी!'सातारा जिल्हा न्यायाधीश बडतर्फ'; तीन ऑक्टोबरपासून पदमुक्त, नेमकं काय कारण?

Irani Cup 2025: विदर्भाने पटकावला विजेतेपदाचा मान; इशान किशन, पाटिदार, ऋतुराजसारखे स्टार खेळाडू असलेल्या संघाला केलं पराभूत

SCROLL FOR NEXT