Paytm sakal
अर्थविश्व

Paytm Share Crash: Paytm च्या शेअर्समध्ये 10% घसरण, 1700 कोटी रुपयांचा नुकसान कारण...

ब्लॉक डीलनंतर पेटीएमच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली आहे

सकाळ डिजिटल टीम

Paytm Share Crash : पेटीएम ब्लॉक डीलमध्ये मोठ्या प्रमाणात विक्री होत आहे. सुरुवातीच्या व्यवहारात या शेअर्सवर10 टक्क्यांपर्यंत मोठी घसरण दिसून येत आहे. अहवालानुसार, पेटीएमच्या 4.9 टक्के इक्विटी हस्तांतरित झाल्या आहेत. हा करार 1,789 कोटींमध्ये झाला आहे. शेअरची सरासरी किंमत रु.562 आहे. सॉफ्ट बँकेने आपला हिस्सा विकल्याचे मानले जात आहे. सध्या पेटीएमचा शेअर 520 रुपयांच्या पातळीवर आहे. 52 आठवड्यांचा नीचांक रु. 510 आहे तर 52 आठवड्यांचा उच्चांक रु. 1955 आहे.

पेटीएमच्या शेअर्सवर बऱ्याच दिवसांपासून दबाव आहे. पेटीएमचे शेअर्स गेल्या आठवड्यात 12.75 टक्क्यांनी घसरले आहेत. एका महिन्यात 18.54 टक्के, तीन महिन्यांत 30 टक्के आणि यावर्षी आतापर्यंत सुमारे 60 टक्के घट झाली आहे.

हेही वाचा : Gautami Patil Lavani: गौतमीची लावणी कुठे चुकतेय?

पेटीएमचे सीईओ विजय शेखर शर्मा यांनी बुधवारीच ऑक्टोबर महिन्यातील कामगिरीचा डेटा ट्विट केला. गेल्या महिन्यात पेटीएमने 3.4 दशलक्ष कर्ज वितरित केले. त्यात वार्षिक आधारावर 161 टक्क्यांनी वाढ झाली आहे. कर्जाचे मूल्य 3056 कोटी होते. वार्षिक आधारावर व्यापारी पेमेंट व्हॉल्यूममध्ये 42 टक्क्यांनी वाढ झाली आहे. मासिक व्यवहार करणाऱ्या वापरकर्त्यांमध्ये 33 टक्क्यांनी वाढ झाली असून ती 84 दशलक्ष झाली आहे.

दीर्घकालीन 130% पेक्षा जास्त रिटर्नचे लक्ष्य

पेटीएममध्ये दीर्घकालीन गुंतवणूकदारांसाठी चांगली ऑफर असू शकते. ब्रोकरेज फर्म ICICI सिक्युरिटीजने सप्टेंबर तिमाहीच्या निकालानंतर या स्टॉकवर खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. यासाठी किंमत 1,285 रुपये ठेवण्यात आली आहे. सध्याच्या पातळीच्या तुलनेत हे प्रमाण 130 टक्क्यांहून अधिक आहे.

शेअरहोल्डिंग पॅटर्नबद्दल बोलताना, सप्टेंबर तिमाहीच्या शेवटी, संस्थात्मक गुंतवणूकदारांकडे 78.6 टक्के, तर इतरांकडे 21.4 टक्के हिस्सा होता. संस्थात्मक गुंतवणूकदारांबद्दल बोलायचे तर म्युच्युअल फंडचे 1.3 टक्के, एफआयआयचे 5.8 टक्के, एफडीआयचे 71.5 टक्के शेअर्स आहेत.

 त्रैमासिक कामगिरीबद्दल बोलायचे झाले तर कंपनीचा महसूल आणि मार्जिन सातत्याने सुधारत आहे. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत कंपनीचा तोटा 6,500 कोटी होता, तो दुसऱ्या तिमाहीत 5,700 कोटींवर आला आहे. कर्ज देण्याच्या व्यवसायात वेगाने सुधारणा होत आहे. असे पेटीएमचे सीईओ विजय शेखर शर्मा यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BCCI statement on India vs Pakistan match: मोठी बातमी! भारत-पाकिस्तान मॅचबद्दल अखेर 'BCCI'ने स्पष्ट केली भूमिका

Sanjay Raut : आरक्षणावरून राज्यात अराजक; मुख्यमंत्र्यांनी भूमिका स्पष्ट करावी

PM Modi AI video: पंतप्रधान मोदी अन् त्यांच्या आईंचा 'AI' व्हिडिओ प्रकरणी, आता काँग्रेस 'IT' सेलच्या नेत्यांविरुद्ध 'FIR' दाखल!

Umarga News : आरक्षण मिळावे या मागणीसाठी बंजारा समाजातील तरुणाने संपविले जीवन

Heavy Rain : शेलगाव (ज.) मध्ये ढगफुटी सदृश्य पावसाने धुमाकूळ; लोकांच्या घरात शिरले पाणी

SCROLL FOR NEXT