People reactions to the budget 2023 transport sector nirmala sitharaman
People reactions to the budget 2023 transport sector nirmala sitharaman Sakal
अर्थविश्व

Budget 2023 : अर्थसंकल्पाच्या परिवहन क्षेत्रातील लोकांच्या प्रतिक्रीया

सकाळ वृत्तसेवा

व्यावसायीक वाहनांना स्क्रॅप करायचे आहे. त्या 15 वर्ष झालेल्या वाहनांना स्क्रॅप करता येणार आहे. मात्र, त्या एकूणच स्क्रॅप पाॅलिसीमधून सर्वसामान्य वाहतुकदारांना काय मिळणार अद्याप याबद्दल स्पष्टता नाही. देशातील काही राज्य सरकारने त्याच्या राज्यातील 15 वर्षांची वाहने स्क्रॅप करून त्यांना इलेक्ट्रिक करण्याचा निर्णय घेतला आहे.

मात्र, महाराष्ट्रात याबद्दल कोणतीही स्पष्टता नाही. वाहन उद्योगात सुमारे 20 कोटी लोक जुळले आहे. तर लाखो वाहनांना स्क्रॅप करायचे आहे. त्यासाठी केंद्र सरकारच्या घोषणेत कोणतीही स्पष्टता नाही. सर्वसामान्य वाहतुकदार यामूळे अडचणीत येणार आहे. एक-दोन वाहनांच्या भरवश्यावर अनेक वाहतुकदारांचा परिवार चालतो ते अडचणीत येणार आहे.

- बल मलकित सिंह, अध्यक्ष, आॅल इंडिया मोटार ट्रान्सपोर्ट काँग्रेस

या निर्णयाचा आम्ही राज्यातील वाहतूकदार स्वागत करतो, परंतु आमची मागणी केंद्र सरकारकडे असे आहे की सध्या नवनवीन तंत्रज्ञान जगात येत असून प्रदूषण केवळ वाहनाचे इंजन मुळे होत असते, आता बरेच नवीन पर्याय, फ्लेक्स फ्युएल, हायड्रोजन वर चालणारी वाहने इंजिन, डिझेल वाहनांना सीएनजी मध्ये अल्टरेशन, असे अनेक पर्याय उपलब्ध होत आहेत.

देशातील ग्रामीण तालुका भागात चालणारे अनेक वाहने ही जवळच्या अंतरासाठी वापरली त्यामुळे प्रदूषणाचा प्रश्न निर्माण होत नाही , त्या वाहतूकदारांना नवीन तटपुंजी सरकारकडून मिळणारी मदत यावर नवीन गाडी खरेदी करू शकत नाही, त्यामुळे अनेक देशातील रिक्षा टॅक्सी बस, ट्रक वाहन मालक बेरोजगार होतील.

- बाबा शिंदे, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य प्रवासी व मालवाहतूक संघटना

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RTE Admission : आरटीईनुसार २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेशाचे अर्ज भरण्याची प्रक्रिया तात्पुरती बंद

SRH vs LSG Live Score : संथ खेळपट्टीवर लखनौ सुस्तावली; अर्धशतकासाठी उजाडलं 9 वं षटक

Sakal Vidya : स्पर्धा परीक्षा व करिअर अभ्यासक्रमाबाबत चिंचवडमध्ये येत्या रविवारी तज्ज्ञांचे मार्गदर्शन

BG Kolse Patil : ‘पंतप्रधानांना ३०० कोटींचा हिशोब द्यावा लागेल’; माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील यांची टीका

Country Cricket : भांडण बीसीसीआय अन् पीसीबीचं; तिकडं इंग्लंड क्रिकेट बोर्डाचे ह्रदयाचे ठोके का वाढले?

SCROLL FOR NEXT