Petrol Price Diesel Rate Today 26 March 2022 esakal
अर्थविश्व

पाच दिवसांत पेट्रोल-डिझेल 3.20 रुपयांनी महागलं

सकाळ डिजिटल टीम

देशात पेट्रोल-डिझेलचे दर गगनाला भिडत आहेत.

Petrol Price Diesel Rate Today 26 March 2022 : देशात पेट्रोल आणि डिझेलचे दर (Petrol Diesel Price Hike Today) गगनाला भिडत आहेत. भारतीय तेल कंपन्यांनी आज (शनिवार) 26 मार्च रोजी पुन्हा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ केलीय. या आठवड्यातील पाच दिवसांत चौथ्यांदा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ करण्यात आलीय. इंडियन ऑइल मार्केटिंग कंपन्यांनी (Indian Oil Marketing Companies) पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रति लिटर 80 पैशांनी वाढ केलीय. अशाप्रकारे पाच दिवसांत पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 3.20 रुपयांनी वाढ झालीय.

भारतीय पेट्रोलियम मार्केटिंग कंपनी इंडियन ऑइल कॉर्पोरेशनच्या (Indian Oil Corporation, IOCL) ताज्या अपडेटनुसार, आज (शनिवार) राष्ट्रीय राजधानीत पेट्रोलची किंमत 98.61 रुपये प्रति लीटर तर डिझेलची किंमत 89.87 रुपये प्रति लिटरवर पोहोचलीय. देशाची आर्थिक राजधानी मुंबईत 26 मार्च 2022 रोजी पेट्रोलचा दर प्रति लिटर 112.51 रुपये वरून 113.35 रुपये प्रति लिटर झालाय. तर डिझेलचा दर आता 96.70 रुपयांवरून 97.55 रुपये प्रति लिटर झाला आहे. दिल्लीशिवाय इतर सर्व महानगरांमध्ये पेट्रोल 100 रुपयांच्या पुढं विकलं जात आहे.

शहराचे नाव पेट्रोल डिझेल

दिल्ली 98.61 89.87

मुंबई 113.35 97.55

कोलकाता 108.02 93.01

चेन्नई 104.43 94.47

5 दिवसांत किंमत 4 पट वाढली

एका आठवड्यात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती 5 दिवसांत 4 वेळा वाढल्या आहेत. 22 मार्च रोजी देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर 80 पैशांनी वाढ करण्यात आली होती. यानंतर 23 मार्च रोजी दोन्ही इंधनांच्या किमती 80-80 पैशांनी वाढल्या होत्या. त्याच वेळी, 25 आणि 26 मार्च रोजी देखील तेल कंपन्यांनी राष्ट्रीय स्तरावर पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 80 पैशांनी वाढ केलीय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT