Petrol Diesel Price esakal
अर्थविश्व

Petrol-Diesel Price: घाऊक बाजारात डिझेल महागलं; जाणून घ्या पेट्रोल-डिझेलचे दर आजचे दर

Petrol-Diesel Price: घाऊक बाजारात डिझेल महागलं असलं तरी पेट्रोल पंपांवर डिझेलच्या किरकोळ किमतीत कोणताही बदल झालेला नाही.

सकाळ डिजिटल टीम

Today Petrol-Diesel Prices Updates: आंतरराष्ट्रीय बाजारात गेल्या काही दिवसांपासून कच्च्या तेलाच्या (Crude oil Price) किमतीत घसरण होत आहे. मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात ब्रेंट तेलाची किंमत प्रति बॅरल 130 डॉलरच्या वर गेली होती, ती आता मोठ्या घसरणीसह 100 डॉलर प्रति बॅरलवर आली आहे. कच्च्या तेलाच्या किमती नरमल्याने भारतीय बाजारपेठेत पेट्रोल-डिझेलचे दर मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता कमी झाली आहे.

भारतीय तेल कंपन्यांनी आज (सोमवार) म्हणजे 21 मार्चलाही पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल केलेला नाही. त्याच वेळी, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती घसरल्याने किरकोळ तेल कंपन्यांवरील मार्जिनचा दबाव कमी झाला आहे. त्यामुळे आता पेट्रोल आणि डिझेलच्या दरात दिलासा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कच्च्या तेलाच्या किमतीत विक्रमी वाढ झाल्यानंतरही भारतीय तेल कंपन्यांनी नोव्हेंबर २०२१ पासून म्हणजेच गेल्या वर्षी दिवाळीपासून पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत वाढ केलेली नाही.

घाऊक ग्राहकांसाठी डिझेल महागले-

घाऊक ग्राहकांसाठी डिझेलच्या दरात प्रतिलिटर 25 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. मात्र, पेट्रोल पंपांवर जनतेला विकल्या जाणाऱ्या डिझेलच्या किरकोळ किमतीत कोणताही बदल झालेला नाही.

प्रमुख शहरांमध्ये आजची किंमत-

शहराचे नाव पेट्रोल डिझेल

दिल्ली ९५.४१ / ८६.६७

मुंबई 109.98 / 94.14

चेन्नई 101.40 / 91.43

कोलकाता 104.67 / 89.79

अशा प्रकारे घरबसल्या तेलाच्या किंमती तपासा-

या वेबसाइटवर क्लिक करा https://iocl.com/petrol-diesel-price किंवा Google च्या प्ले स्टोअरवरून IOC चे अॅप डाउनलोड करा. तसेच 9224992249 वर एसएमएस करा. यासाठी RSP-स्पेस-पेट्रोल पंप डीलरचा कोड लिहून 9224992249 या क्रमांकावर एसएमएस करावा लागेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : विजय मेळाव्यासाठी जोशात निघाले शिवसैनिक आणि मनसैनिक, कोळी बँडच्या तालावर मुंबई थरारली!

Kondhwa Case कुरिअर बॉय बनून नेहमी फ्लॅटवर यायचा, शरीरसंबंधावरून बिनसलं अन् तरुणीने पोलीस ठाणं गाठलं; तरुणाला माहितीच नाही आपण....

'या' चित्रपटाआधी भारतात नव्हतं संतोषी माताचं मंदिर, सिनेमा आला अन् सुरु झाले व्रत-उपास! चित्रपट पाहण्यासाठी चप्पल काढून जायचे प्रेक्षक

D Gukesh: ज्या कार्लसनने 'कमजोर' म्हणून हिणवलं, त्याच्याच नाकावर टिच्चून गुकेशनं 'रॅपिड' स्पर्धेचं जेतेपद जिंकलं

Nagpur News: ऐकावं ते नवलच! मृत व्यक्तीला दिलं रहिवासी प्रमाणपत्र; वाडी नगरपरिषदेच्या कारभारावर गंभीर प्रश्न

SCROLL FOR NEXT