Petrol Diesel Price Sakal
अर्थविश्व

Petrol Diesel Price: पेट्रोल-डिझेल दराबाबत सर्वसामान्यांना दिलासा; जाणून घ्या आजची किंमत

आज सलग 19 व्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींत कोणतीही वाढ झाली नाही.

सकाळ डिजिटल टीम

Petrol Diesel Price Today: भारतीय पेट्रोलियम कंपन्यांनी आज, 25 एप्रिल 2022 रोजी सलग 19 व्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींत कोणतीही वाढ केली नाही. त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीमुळे हैराण झालेल्या जनतेला काहीसा दिलासा मिळाला आहे. यापूर्वी 6 एप्रिल रोजी पेट्रोल आणि डिझेलमध्ये प्रतिलिटर 80 पैशांची दरवाढ झाली होती. त्यानंतर 7 एप्रिलपासून राष्ट्रीय बाजारात पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर आहेत.

भारतीय पेट्रोलियम विपणन कंपनी इंडियन ऑइल कॉर्पोरेशनच्या (IOCL) अपडेट्सनुसार, आजही तेल कंपन्यांकडून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणतीही वाढ झालेली नाही. दिल्लीत एक लिटर पेट्रोल 105.41 रुपये प्रति लिटर तर डिझेल 96.67 रुपये प्रतिलिटर मिळत आहे. मुंबईत पेट्रोलचा दर 120.51 रुपये आणि डिझेलचा दर 104.77 रुपये प्रतिलिटर आहे.

प्रमुख महानगरांमधील पेट्रोल-डिझेलचे दरः

शहरातील डिझेल/ पेट्रोल

दिल्ली- 96.67/105.41

मुंबई- 104.77/ 120.51

कोलकाता- 99.83/ 115.12

चेन्नई- 100.94/ 110.85

(पेट्रोल-डिझेलची किंमत रु. प्रतिलिटर आहे.)

या राज्यांमध्ये पेट्रोलचा दर १०० रुपयांच्या पुढे-

मध्य प्रदेश, राजस्थान, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, ओडिशा, जम्मू-काश्मीर आणि लडाखमध्ये पेट्रोलची किंमत 100 रुपयांच्या वर आहे. मुंबईत पेट्रोलचे दर सर्वाधिक आहेत.

अशा प्रकारे घरबसल्या तेलाच्या किंमती तपासा-

या वेबसाइटवर क्लिक करा https://iocl.com/petrol-diesel-price किंवा Google च्या प्ले स्टोअरवरून IOC चे अ‍ॅप डाउनलोड करा. तसेच 9224992249 वर एसएमएस करा. यासाठी RSP-स्पेस-पेट्रोल पंप डीलरचा कोड लिहून 9224992249 या क्रमांकावर एसएमएस करावा लागेल. अशा पद्धतीने तुम्ही पेट्रोल डिझेलच्या किमती तपासू शकता

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs PAK: भारतीय खेळाडूंना पाकिस्तानविरुद्ध जबरदस्तीने खेळावं लागलं, BCCI...; दिग्गज खेळाडूचा खळबळजनक दावा

Akola News : बंजारा व लभाण समाजाला अनुसूचित जमातीचा दर्जा देवू नका; अकोल्यात बिरसा क्रांती दलतर्फे जिल्हा कचेरीवर भव्य मोर्चा

Latest Marathi News Updates : "हा तकलादू जीआर सुप्रीम कोर्टात टिकणार नाही"- सुजात आंबेडकर

Kej Heavy Rain : केज तालुक्यात पावसाचा हाहाकार! नदी-नाल्यांच्या पाण्याने केले उग्र स्वरूप धारण, केकाणवाडी पाझर तलाव फुटला

Supreme Court warn Election Commission : बिहार 'SIR'वरून सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला दिला इशारा अन् म्हटलं...

SCROLL FOR NEXT