Petrol-diesel prices rising
Petrol-diesel prices rising sakal
अर्थविश्व

Petrol Diesel Price: पेट्रोल-डिझेल आतापर्यंत 10 रुपयांनी महागले, जाणून घ्या आजची किंमत

सकाळ डिजिटल टीम

Petrol Diesel Price Today 9th April 2022: भारतीय तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचे आजचे दर जाहीर केले आहेत. राष्ट्रीय बाजारात आज (शनिवार), 9 एप्रिल 2022 रोजी सलग तिसऱ्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये कोणताही बदल झालेला नाही. एप्रिल महिन्यातील हा तिसरा दिवस आहे, जेव्हा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. अशा परिस्थितीत पेट्रोल आणि डिझेलच्या महागाईने हैराण झालेल्या जनतेला दर स्थिर राहिल्याने काहीसा दिलासा मिळाला आहे. मात्र, 22 मार्चपासून लिटरमागे 10 रुपयांनी वाढ झाली आहे.

गेल्या तीन दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर असले तरी दर विक्रमी पातळीवरच आहेत. याआधी बुधवारी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर 80 पैशांनी वाढ करण्यात आली होती.

भारतीय पेट्रोलियम मार्केटिंग कंपनी इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (IOCL) च्या ताज्या अपडेटनुसार, 9 एप्रिल 2022 रोजी, देशाची राजधानी दिल्लीत पेट्रोल 105.41 रुपये प्रति लिटर तर डिझेल 96.67 रुपये प्रति लिटर विकले जात आहे. . त्याचबरोबर देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत पेट्रोल 120.51 रुपये आणि डिझेल 104.77 रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे.

महानगरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर-

शहराचे नाव पेट्रोल / डिझेल

दिल्ली 105.41 / 96.67

मुंबई 120.51 / 104.77

कोलकाता 115.12 / 99.83

चेन्नई 110.85 / 100.94

पेट्रोल-डिझेल आतापर्यंत 10 रुपयांनी महागले-

तेल कंपन्यांनी 19 दिवसांत 14 वेळा पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ केली आहे. त्यानंतर 22 मार्च ते 6 एप्रिल या कालावधीत पेट्रोल अनुक्रमे 80, 80, 80, 80, 50, 30, 80, 80, 80, 80, 80, 40, 80 आणि 80 पैशांनी प्रतिलिटर महागले आहे. 7, 8 आणि 9 एप्रिल रोजी दर स्थिर आहेत. आतापर्यंत पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर 10 रुपयांनी वाढ झाली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vidhanparishad Election : शिवसेना ठाकरे गटाकडून परब, अभ्यंकर

NASA : भारतीय अंतराळवीरांना आता ‘नासा’चे धडे; गार्सेटी यांची घोषणा

Loksabha Election 2024 : लोकांनी द्वेषाला धुडकावले; राहुल गांधी यांचे प्रतिपादन

Loksabha Election 2024 : ‘साखरेचा वाडगा’ काँग्रेससाठी कडू! देवरियात ओबीसी मतांवर भाजपची भिस्त

Narendra Modi : मतपेढीसाठी ‘इंडिया’चा मुजरा; मोदींची विरोधकांवर टीका

SCROLL FOR NEXT