Petrol-Diesel Price Today esakal
अर्थविश्व

इंधन दरवाढ सुरूच; आज पुन्हा पेट्रोल-डिझेल 84 पैशांनी महागलं

सकाळ डिजिटल टीम

तेल कंपन्यांनी आज पुन्हा पेट्रोल-डिझेलचे दर जाहीर केले आहेत.

Petrol-Diesel Price Today : सरकारी तेल कंपन्यांनी आज (गुरुवार) पेट्रोल आणि डिझेलचे (Petrol Diesel Hike Today) दर पुन्हा जाहीर केले आहेत. त्यामुळं पूर्वीप्रमाणंच आजही तेलाच्या किमती वाढल्या आहेत. आज दर प्रतिलिटर 84 पैशांपर्यंत वाढला आहे. गेल्या दहा दिवसांत नवव्यांदा पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढल्याची माहिती आहे.

तेल कंपनी IOCL च्या ताज्या दरानुसार, राष्ट्रीय राजधानी दिल्लीत (Delhi) पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 80 पैशांनी वाढ झालीय. यानंतर राजधानीत एक लिटर पेट्रोलचा दर 93.07 रुपये आणि डिझेलचा दर 93.07 रुपये प्रति लिटरवर पोहोचलाय. त्याचबरोबर मुंबईत (Mumbai) पेट्रोल आणि डिझेलचे दर 84 पैशांनी वाढले आहेत. इथं पेट्रोल 116.72 रुपये, तर डिझेल 100.94 रुपये झालं आहे.

याशिवाय, इतर महानगरांबद्दल बोलायचं झालं तर चेन्नईत आज एक लिटर पेट्रोलवर 76 पैशांची वाढ नोंदवण्यात आलीय. यानंतर पेट्रोल 107.45 रुपये प्रतिलिटर दरानं विकलं जात आहे. त्याचवेळी डिझेल 97.52 रुपयांना विकलं जात होतं. कोलकात्याबद्दल बोलायचं झालं तर, पेट्रोलमध्ये 83 पैसे आणि डिझेलमध्ये 80 पैशांनी वाढ झालीय. त्यानंतर पेट्रोलचा दर 111.35 रुपये आणि डिझेलचा दर 96.22 रुपये झालाय. तसेच मध्य प्रदेशातील बालाघाटमध्ये पेट्रोल 0.87 पैसे आणि डिझेल 0.82 पैशांनी वाढलं असून पेट्रोलचे दर केवळ 115 रुपयांवरच नाही तर त्याहूनही वर पोहोचले आहेत. ही महागाई रोज कमावणाऱ्या आणि छोटा व्यवसायांसाठी अडचणीची ठरलीय. आज पेट्रोल 116.52 प्रतिलिटर झालं असून डिझेल 99. 59 रुपये प्रतिलिटर झालंय.

आज महानगरांमध्ये पेट्रोल-डिझेलचे दर किती?

शहर पेट्रोल डिझेल

दिल्ली 101.81 93.07

मुंबई 116.72 100.94

चेन्नई 107.45 97.52

कोलकाता 111.35 96.22

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Updates: भारत पाक क्रिकेट सामन्याला विरोध शिवसेना महिला आघाडीच्या वतीने निदर्शने

Leopard Terror: 'आंबेगाव तालुक्याच्या आदिवासी डोंगरी भागात बिबट्याचा सलग तीन दिवसांचा वावर': परिसरात भीतीचे वातावरण

Solapur Rain update: 'साेलापूर शहरातील रस्त्यावरुन वाहू लागल्या नद्या'; शनिवारी शहरात ३२.६ मिमी पाऊस; तीन दिवसांपासून ड्रेनेज तुंबलेलेच

Northeast India Earthquake: ईशान्य भारत भूकंपाने हादरला, बंगालपासून भूतानपर्यंतही जाणवले धक्के

IND vs AUS, ODI: स्मृती मानधनासह दोघींची अर्धशतकं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध इतिहासात पहिल्यांदाच घडला 'असा' पराक्रम

SCROLL FOR NEXT