petrol sakal
अर्थविश्व

इंधन दरवाढीचा भडका! पेट्रोल-डिझेल पुन्हा महागलं

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : पेट्रोल-डिझेलच्या किंमतींमध्ये आज पुन्हा एकदा वाढ झाल्याचं पहायला मिळतंय. काल बुधवारी इंधनाचे दर स्थिर राहिले होते, त्यामुळे आता पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर राहतील अशी आशा वाटत असतानाच आज पुन्हा एकदा भाव वाढवण्यात आले आहेत. भारतीय तेल कंपन्यांनी इंधनांचे नवे दर जाहीर केले आहेत. त्यानुसार, आज राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोलचे भाव 35 पैश्यांनी वाढले आहेत, तर डिझेल देखील 35 पैश्यांनी वाढलं आहे. सातत्याने वाढणाऱ्या किंमतींमुळे इंधनांचे भाव रेकॉर्ड स्तरावर पोहोचले असून आतापर्यंतचे सर्वांत जास्त भाव पहायला मिळत आहेत. देशातल्या वेगवेगळ्या शहरात सध्या वेगवेगळे भाव आहेत.

दिल्लीमध्ये पेट्रोलच्या दरात 35 पैश्यांनी वाढ झाल्यानंतर पेट्रोलचा दर 104.79 रुपये प्रति लीटर झाला आहे. तर डिझेल 93.52 रुपये प्रति लीटर दराने विकलं जात आहे. मुंबईमध्ये देखील पेट्रोलच्या किंमतींमध्ये 35 पैश्यांनी वाढ झाली आहे. यानंतर मुंबईमध्ये पेट्रोलचा नवा दर 110.75 रुपये प्रति लीटर झालं आहे. तर डिझेलदेखील 73 पैश्यांनी महागलं असून 101.40 रुपये प्रति लीटरने विकलं जात आहे.

देशातील प्रमुख शहरातील पेट्रोल-डिझेलचे दर

शहर पेट्रोल (रुपये/लीटर) डिझेल (रुपये/लीटर)

नवी दिल्‍ली 104.79 93.52

मुंबई 110.75 101.40

कोलकाता 105.43 96.63

चेन्‍नई 102.10 97.93

पुणे 110.50 99.60

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सोशल मीडियापासून आंदोलनापर्यंत... जेन-झी 'Vasteguna Huiya'च का म्हणतायत? हा ट्रेंड नेमका सुरू कसा झाला? वाचा Inside Story...

Mumbai News: आता मुंबईकरांना नो टेन्शन! १० टक्के पाणीकपातीचं संकट दूर होणार, कधीपासून? तारीख आली समोर

Raigad Flood: भेरव अंबा नदीचा पूल पाण्याखाली; रायगडमधील आदिवासी गावांचा संपर्क तुटला, वाहतूक ठप्प

Yoga Benefits: योगामुळे तंबाखू सोडण्याची शक्यता ५० टक्क्यांनी वाढली; एम्सच्या संशोधनातून मोठा खुलासा!

MPSC Paper Leak: 'तो' पेपर फुटलाच नव्हता? तक्रारच बनावट? तक्रारदाराने 'ई-मेल'मध्ये काय म्हटलंय?

SCROLL FOR NEXT