Petrol-Diesel Price esakal
अर्थविश्व

Petrol-Diesel Price: पेट्रोल-डिझेलचे आजचे दर जाहीर, जाणून घ्या आजचे दर

गेल्या महिनाभराहून अधिक काळापासून तेलाचे दर स्थिर आहेत.

सकाळ डिजिटल टीम

Petrol-Diesel Price Today, IOCL Update 13 May: सरकारी तेल कंपन्यांनी शुक्रवारी पेट्रोल आणि डिझेलचे दर जाहीर केले. आज पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. गेल्या महिनाभराहून अधिक काळापासून तेलाचे दर स्थिर आहेत. देशाची राजधानी दिल्लीत पेट्रोल 105.41 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 96.67 रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे.

IOCL च्या ताज्या अपडेटनुसार, मुंबईत एक लिटर पेट्रोलची किंमत 120.51 रुपये, डिझेलची किंमत 104.77 रुपये आहे. त्याचबरोबर कोलकात्यात पेट्रोल 115.12 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 99.83 रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे. याशिवाय चेन्नईमध्ये एक लिटर पेट्रोल 110.85 रुपयांना मिळत आहे, तर डिझेलची किंमत 100.94 रुपयांवर स्थिर आहे.

महानगरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर-

शहराचे नाव पेट्रोल डिझेल

दिल्ली- 105.41/ 96.67

मुंबई- 120.51/ 104.77

कोलकाता- 115.12/ 99.83

चेन्नई- 110.85/ 100.94

22 मार्चपासून पुढील 16 दिवसांत पेट्रोल आणि डिझेलच्या दरात अनेक वेळा वाढ करण्यात आली होती. त्या काळात पेट्रोल आणि डिझेल सुमारे १० रुपये प्रतिलिटर दराने महागले होते. मात्र, रशिया आणि युक्रेनमधील युद्धामुळे महागलेले कच्चे तेल हे त्यामागचे प्रमुख कारण असल्याचे सांगण्यात आले. त्याचबरोबर तेलाच्या किमती एका महिन्याहून अधिक काळ स्थिर आहेत.

या राज्यांमध्ये पेट्रोलचा दर १०० रुपयांच्या पुढे-

मध्य प्रदेश, राजस्थान, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, ओडिशा, जम्मू-काश्मीर आणि लडाखमध्ये पेट्रोलची किंमत 100 रुपयांच्या वर आहे. मुंबईत पेट्रोलचे दर सर्वाधिक आहेत.

अशा प्रकारे घरबसल्या तेलाच्या किंमती तपासा-

या वेबसाइटवर क्लिक करा https://iocl.com/petrol-diesel-price किंवा Google च्या प्ले स्टोअरवरून IOC चे अ‍ॅप डाउनलोड करा. तसेच 9224992249 वर एसएमएस करा. यासाठी RSP-स्पेस-पेट्रोल पंप डीलरचा कोड लिहून 9224992249 या क्रमांकावर एसएमएस करावा लागेल. अशा पद्धतीने तुम्ही पेट्रोल डिझेलच्या किमती तपासू शकता

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US-Israel-Iran War: इस्राईलचं सैन्य लेबनॉनमध्ये घुसलं! ‘हिज्बुल्लाह’ विरोधात आक्रमक भूमिका; नागरिकांना स्थलांतराचे आवाहन

Pune News : भांडार विभाग साहित्य खरेदी प्रकरणातील आठ अधिकाऱ्यांकडून खुलासा करण्यास टाळाटाळ

Iran america Israel war : इराण-अमेरिका-इस्त्राईल संघर्ष तिव्र होण्याची शक्यता; मध्यपूर्वेतील युद्धाचा भडका उडण्याची चिन्हे

Iran-Israel war: 'आता ती वेळ आलीच...', शहबाज-मुनीर यांच्याविरोधात पाकिस्तानमध्ये जनक्षोभ, २६ जणांचा मृत्यू

होळीच्या रंगांवर काळी सावली; नागपूरमध्ये किरकोळ वादातून तरुणाचा मृत्यू, गाडी साईडने चालव म्हणणं जीवावर बेतलं

SCROLL FOR NEXT