petrol diesel hike sakal
अर्थविश्व

Petrol Diesel Price: पेट्रोल-डिझेल दर उच्चांकी पातळीवर; जाणून घ्या आजची किंमत

गेल्या काही दिवसांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरात मोठी वाढ झाल्यानंतर सरकारी तेल कंपन्यांनी शुक्रवारी दिलासा दिला आहे.

सकाळ डिजिटल टीम

Petrol Diesel Price Update: गेल्या काही दिवसांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरात मोठी वाढ झाल्यानंतर सरकारी तेल कंपन्यांनी शुक्रवारी दिलासा दिला आहे. आज दिल्ली-मुंबईसह देशातील चारही महानगरे आणि प्रमुख शहरांमध्ये तेलाच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. तेल कंपन्यांनी गेल्या 10 दिवसांत पेट्रोलच्या दरात 6.40 रुपयांनी वाढ केली आहे, तर डिझेलच्या दरातही जवळपास तेवढीच वाढ झाली आहे. दिल्लीत पेट्रोलचा दर 102 रुपये प्रतिलीटरच्या आसपास पोहोचला आहे, तर मुंबईत पेट्रोल 117 रुपयांच्या आसपास पोहोचलं आहे. डिझेलच्या दराने इतिहासात पहिल्यांदाच शंभरी ओलांडली आहे.

चारही महानगरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर-

दिल्लीः पेट्रोल 101.81 रुपये आणि डिझेल 93.07 रुपये प्रतिलीटर

मुंबईः पेट्रोल 116.72 रुपये आणि डिझेल 100.94 रुपये प्रतिलीटर

चेन्नईः पेट्रोल 107.45 रुपये आणि डिझेल 97.52 रुपये प्रतिलीटर

कोलकाताः पेट्रोल 111.35 रुपये आणि डिझेल 96.22 रुपये प्रतिलीटर

अशा प्रकारे घरबसल्या तेलाच्या किंमती तपासा-

या वेबसाइटवर क्लिक करा https://iocl.com/petrol-diesel-price किंवा Google च्या प्ले स्टोअरवरून IOC चे अ‍ॅप डाउनलोड करा. तसेच 9224992249 वर एसएमएस करा. यासाठी RSP-स्पेस-पेट्रोल पंप डीलरचा कोड लिहून 9224992249 या क्रमांकावर एसएमएस करावा लागेल. अशा पद्धतीने तुम्ही पेट्रोल डिझेलच्या किमती तपासू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Opening: शेअर बाजाराची लाल रंगात सुरुवात; सेन्सेक्स-निफ्टी घसरले, कोणते शेअर्स वाढले?

Tilak Varma Diagnosed with Rhabdomyolysis: हातातून बॅट सुटली असती! तिलक वर्माने उघड केले 'ऱ्हॅब्डोमायोलिसिस'चे गुपित; काय आहे हा जीवघेणा स्नायूंचा आजार?

क्रृर नजर, बदल्याची आग! सिद्धार्थ जाधवचा 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' सिनेमातील आक्राळ विक्राळ लूक व्हायरल

Weather IMD Alert : राज्यासाठी पुढचे दोन दिवस महत्त्वाचे! मुंबईसह 'या' २६ जिल्ह्यांना पावसाचा इशारा, कसं असणार हवामान?

Gold & Silver Prices : दिवाळीनंतर सोने आणि चांदीच्या किमतींमध्ये मोठी घसरण, पण पुन्हा सोन्याचे दर वाढणार

SCROLL FOR NEXT