Petrol-Diesel Prices Reduced in Maharashtra esakal
अर्थविश्व

Petrol-Diesel Price: खुशखबर! पेट्रोल-डिझेल आणखी स्वस्त; जाणून घ्या आजचे दर

राज्य सरकारने पेट्रोल डिझेलच्या दरावरील मूल्यवर्धित कर (VAT) कमी केल्याने पेट्रोल 2.8 रुपये तर डिझेल 1.44 रुपये प्रती लिटर स्वस्त झालं आहे.

सकाळ डिजिटल टीम

Petrol-Diesel Price: गेल्या अनेक दिवसांपासून महागाईने त्रस्त असलेल्या जनतेला दिलासा मिळाला आहे. केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या अबकारी शुल्कात मोठी कपात केली असून, त्यानंतर पेट्रोलचे दर साधारणपणे 9.5 तर डिझेलचे दर 7 रुपयांनी खाली आले आहेत. दरम्यान महाराष्ट्र सरकारने पेट्रोल डिझेलच्या दरावरील मूल्यवर्धित कर (VAT) कमी केल्याने पेट्रोल 2 रुपये 8 पैसे आणि 1 रुपया 44 पैसे प्रती लिटर कपात केली आहे. यामुळे वार्षिक सुमारे 2500 कोटी रुपये राज्याच्या तिजोरीवर भार पडणार आहे. परंतु यामुळे ग्राहकांना मात्र दिलासा मिळाला आहे. मात्र, कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतींमुळे बाजारातील विश्लेषकांनी प्रश्न उपस्थित करण्यास सुरुवात केली आहे. जागतिक बाजारपेठेत पेट्रोलियम कंपन्या पुन्हा पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढवणार आहेत.

वास्तविक, जागतिक बाजारात ब्रेंट क्रूडची किंमत आज प्रति बॅरल 113 डॉलरच्या जवळ पोहोचली आहे. मुख्य आर्थिक सल्लागारांनी आधीच सांगितले आहे की जर कच्चे तेल 110 डॉलरच्या वर राहिले तर कंपन्यांना पुन्हा पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढवण्यास भाग पाडले जाईल. आतापर्यंत सरकारवर दबाव होता, कारण त्यामुळे महागाई आणखी अनियंत्रित होऊ शकली असती. पण, केंद्राकडून अबकारी शुल्क आणि राज्यांनी व्हॅट कमी केल्याने किमती कमी झाल्या असून, पेट्रोलियम कंपन्यांना आता पुन्हा दर वाढवण्याची संधी मिळू शकते. सध्या दिल्लीत पेट्रोल 96.72 रुपये आणि मुंबईत 109.27 रुपये दराने विकले जात आहे कारण महाराष्ट्र सरकारनेही पेट्रोलवरील व्हॅट 2.08 रुपये आणि डिझेल 1.44 रुपये प्रति लिटरने कमी केला आहे.

चारही महानगरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर-

दिल्ली पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर

मुंबई पेट्रोल 109.27 रुपये आणि डिझेल 95.84 रुपये प्रति लिटर

चेन्नई पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर

कोलकाता पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर

अशा प्रकारे घरबसल्या तेलाच्या किंमती तपासा-

या वेबसाइटवर क्लिक करा https://iocl.com/petrol-diesel-price किंवा Google च्या प्ले स्टोअरवरून IOC चे अ‍ॅप डाउनलोड करा. तसेच 9224992249 वर एसएमएस करा. यासाठी RSP-स्पेस-पेट्रोल पंप डीलरचा कोड लिहून 9224992249 या क्रमांकावर एसएमएस करावा लागेल. अशा पद्धतीने तुम्ही पेट्रोल डिझेलच्या किमती तपासू शकता

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lalbaghcha Raja Look: लालबागचा राजा २०२५ चा पहिला लूक समोर, प्रथम दर्शनातून दिसली पहिली झलक, पाहा व्हिडिओ

Rahul Gandhi: राहुल गांधींना किस केलं, सुरक्षा रक्षकानं तरुणाला पकडलं अन्...; बाईक रॅलीतील व्हिडिओ व्हायरल

AUS vs SA, ODI: दक्षिण आफ्रिकेचा वनडेतील सर्वात मोठा पराभव, तरी जिंकली ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिका; पाहा काय झाले रेकॉर्ड

Latest Marathi News Updates : अंधेरी पूर्व विधानसभा मतदार संघात मनसेकडून कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी करण्यात आली सोय

Nagpur Fraud;'बेटिंग ॲप’द्वारे किराणा व्यापाऱ्याची २६ लाखांची फसवणूक; सायबर पोलिसांकडून चौघांविरोधात गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT