Petrol Diesel Rate  esakal
अर्थविश्व

Petrol-Diesel Price: ग्राहकांना दिलासा! जाणून घ्या पेट्रोल-डिझेलचे आजचे दर

सरकारी तेल कंपन्यांनी शनिवारी पेट्रोल आणि डिझेलचे दर जाहीर केले.

सकाळ डिजिटल टीम

Petrol-Diesel Price Today: सरकारी तेल कंपन्यांनी शनिवारी पेट्रोल आणि डिझेलचे दर जाहीर केले. गेल्या अनेक दिवसांप्रमाणे आजही जनतेला दिलासा मिळाला आहे. तेलाच्या दरात कोणतीही वाढ झालेली नाही. देशाची राजधानी दिल्लीत पेट्रोलचा दर 105.41 रुपये आणि डिझेलचा दर 96.67 रुपये प्रतिलिटर आहे. गेल्या महिन्याच्या अखेरीपासून या महिन्याच्या सुरुवातीपर्यंत तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात जवळपास 10 रुपयांची वाढ केली होती. मात्र, त्यानंतर कोणतीही वाढ झाली नाही.

IOCL च्या ताज्या अपडेटनुसार, देशाची आर्थिक राजधानी मुंबईत एक लिटर पेट्रोल 120.51 रुपये, डिझेल 104.77 रुपये दराने विकले जात आहे. पश्चिम बंगालची राजधानी कोलकातामध्ये एक लिटर पेट्रोलची किंमत 115.12 रुपये आहे. त्याचवेळी डिझेल 99.83 रुपये प्रतिलिटर दराने विकले जात आहे. चेन्नईबद्दल बोलायचे तर, इथेही पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. एक लिटर पेट्रोल 110.85 रुपयांना तर एक लिटर डिझेल 100.94 रुपयांना विकले जात आहे.

देशातील चार प्रमुख महानगरांमधील पेट्रोल आणि डिझेलचे दर-

शहराचे नाव -पेट्रोल/ डिझेल

दिल्ली- 105.41/ 96.67

मुंबई- 120.51/ 104.77

कोलकाता- 115.12/ 99.83

चेन्नई- 110.85 100.94

या राज्यांमध्ये पेट्रोलचा दर १०० रुपयांच्या पुढे-

मध्य प्रदेश, राजस्थान, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, ओडिशा, जम्मू-काश्मीर आणि लडाखमध्ये पेट्रोलची किंमत 100 रुपयांच्या वर आहे. मुंबईत पेट्रोलचे दर सर्वाधिक आहेत.

अशा प्रकारे घरबसल्या तेलाच्या किंमती तपासा-

या वेबसाइटवर क्लिक करा https://iocl.com/petrol-diesel-price किंवा Google च्या प्ले स्टोअरवरून IOC चे अ‍ॅप डाउनलोड करा. तसेच 9224992249 वर एसएमएस करा. यासाठी RSP-स्पेस-पेट्रोल पंप डीलरचा कोड लिहून 9224992249 या क्रमांकावर एसएमएस करावा लागेल. अशा पद्धतीने तुम्ही पेट्रोल डिझेलच्या किमती तपासू शकता

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hockey World Cup: पेनल्टी कॉर्नर ठरले भारताचे अस्त्र! स्वातंत्र्यदिनी वेल्सला हरवत विजयी सुरुवात

Crime: एका संशयाने नात्याला काळिमा! सासू आणि पत्नीच्या वादातून संताप अनावर; जावयाने उचललं टोकाचं पाऊल, काय घडलं?

Marathi News Live Updates : स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला भोर तालुक्यात होणारा संभाव्य अनर्थ भोर पोलिसांनी टाळला

IND vs SL: देवदत्त पडिक्कलचे स्वातंत्र्यदिनी ऐतिहासिक शतक, ८० वर्षात कोणालाही न जमलेला केला पराक्रम! पहिल्या दिवशी भारताचे वर्चस्व

Skincare Tips: चेहऱ्यासाठी प्रत्येक वेळी घरगुती उपाय नसतात फायदेशीर! जाणून घ्या त्वचातज्ज्ञांचा महत्त्वाचा सल्ला...

SCROLL FOR NEXT