petrol petrol
अर्थविश्व

Petrol prices: पेट्रोलपाठोपाठ डिझेलही शंभरीच्या उंबरठ्यावर

गेल्या महिन्यात पेट्रोलने ऐतिहासिक टप्पा ओलांडला होता. प्रतिलिटर १०० रुपयांपेक्षा जास्तीची भाववाढ झाल्याने अनेकांना आर्थिक फटका सहन करावा लागला

सकाळ वृत्तसेवा

उस्मानाबाद: जिल्ह्यात पेट्रोल पाठोपाठ आता डिझेलही शंभरीच्या उंबरठ्यावर आले आहे. केवळ एका चौकाराची गरज असून, लवकरच शंभरी पार करणार असल्याचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे महागाईचा आलेख शिखराकडे निघाला असून, यात अनेकांची आर्थिक घडी विस्कटत आहे. जिल्ह्यात कोनोनाच्या संसर्गाने संकटात सापडलेल्या नागरिकांना आता इंधन दरवाढीचा ‘शॉक’ बसला आहे. कोरोना संपताच पेट्रोल पाठोपाठ डिझेलचेही भाव गगनाला भिडत आहेत.

गेल्या महिन्यात पेट्रोलने ऐतिहासिक टप्पा ओलांडला होता. प्रतिलिटर १०० रुपयांपेक्षा जास्तीची भाववाढ झाल्याने अनेकांना आर्थिक फटका सहन करावा लागला. त्याशिवाय घरगुती वापराचा गॅसही महागल्याने महिला वर्गाचे गणित चांगलेच कोलमडले. एकाच वेळी तब्बल २५ रुपयांची वाढ करण्यात आल्याने सामान्य नागरिकांना दरवाढीचा ‘शॉक’ बसला आहे. जिल्ह्यात आता डिझेलचीही मोठी भाववाढ होत आहे. सध्या डिझेल ९६ रुपये एक पैसा या दराने विकले जात आहे. हेच गेल्या महिन्यात ९० पेक्षाही कमी होते. महिन्यातच तब्बल १० रुपयांच्या पुढे दर सरकले आहेत. त्यामुळे डिझेलही दरवाढीचा ऐतिहासिक टप्पा ओलांडणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

डिझेल दरवाढीचा सर्वाधिक फटका-
डिझेलवर चालणाऱ्या वाहनांची संख्या मोठी आहे. एस.टी. बससेवा, ट्रॅक्सी या डिझेलवर चालतात. त्यामुळे यामध्ये थोडीही दरवाढ झाली तरीही त्याचा फटका सामान्य नागरिकांना बसतो. भाजीपाला, किराणामाल आदी साहित्य तत्काळ महागते. परिणामी, सामान्य वर्गाचा खिसा कापला जातो. त्यामुळे डिझेल दरवाढही महागाईचे संकेत असल्याचे बोलले जात आहे.

डिझेलचे दर वाढल्याने तेल, शेंगदाणे, प्रवास खर्च, चहा अशा किराणा साहित्याचे दर वाढले आहेत. एकूणच सर्वच दरवाढ झाली आहे. याचा फटका आम्हाला बसत आहे. ही दरवाढ मागे घेण्यात यावी.
- अनिल देशमुख, उस्मानाबाद.

डिझेल दरवाढीमुळे आमच्या व्यवसायावर मोठा परिणाम झाला आहे. आमचे फूटवेअरचे दुकान आहे. यापूर्वी मालवाहतूकीस लागणारा खर्च कमी होता. आता तो डबल झाल्याने ग्राहकांकडून तसा प्रतिसाद मिळत नाही. परिणामी, व्यवसायात तूट आली आहे.
- नीलेश वाघमारे, उस्मानाबाद.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rupali Thombare : राष्ट्रवादीच्या रुपाली पाटील-ठोंबरे यांच्यावर मारहाणीचा आरोप करणाऱ्या महिलेचा यू-टर्न, म्हणाली- यामध्ये कोणीही...

५० रुपयांच्या लाचप्रकरणाचा तब्बल ३७ वर्षांनी निकाल; न्याय मिळाला, पण आयुष्य संपलं, सर्वोच्च न्यायालयाने नेमकं काय म्हटलं?

Latest Marathi News Live Update : बार्शी तालुक्यातील ग्रामीण भागात कोयता घेऊन दहशत माजवल्याचा प्रयत्न, पोलिसांनी काढली आरोपीची धिंड

POCSO Crime : नात्याला काळिमा फासणारं कृत्य! चुलत भावाने १७ वर्षांच्या बहिणीवर केला लैंगिक अत्याचार, ती झोपली असतानाच त्यानं...

Uday Samant vs Narayan Rane : उदय सामंत आणि नारायण राणेंमध्ये कलगीतुरा; भाजप, शिवसेना कोकणात स्वबळावर लढणार?

SCROLL FOR NEXT