HPCL Recruitment 2022 esakal
अर्थविश्व

Petrol-Diesel Price: सलग अठराव्या दिवशी पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर; जाणून घ्या आजची किंमत

7 एप्रिलपासून राष्ट्रीय बाजारात पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर आहेत.

सकाळ डिजिटल टीम

Petrol-Diesel Prices Today 24 April 2022: भारतीय पेट्रोलियम कंपन्यांनी आज, 24 एप्रिल 2022 रोजी सलग 18 व्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढवल्या किंवा बदलल्या नाहीत. अशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीमुळे हैराण झालेल्या जनतेला काहीसा दिलासा मिळाला आहे. 7 एप्रिलपासून राष्ट्रीय बाजारात पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर आहेत. यापूर्वी 6 एप्रिल रोजी पेट्रोल आणि डिझेल प्रतिलिटर 80 पैशांनी महागले होते.

भारतीय पेट्रोलियम विपणन कंपनी इंडियन ऑइल कॉर्पोरेशनच्या (IOCL) अपडेट्सनुसार, रविवार, 24 एप्रिल 2022 रोजी, देशाची राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोल 105.41 रुपये प्रति लिटर आहे तर डिझेल 96.67 रुपये प्रति लिटर आहे. त्याचबरोबर देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत पेट्रोल 120.51 रुपये आणि डिझेल 104.77 रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे.

देशातील प्रमुख महानगरांमधील पेट्रोल-डिझेलचे दर-

शहराचे नाव- पेट्रोल/ डिझेल

दिल्ली- 105.41/ 96.67

मुंबई- 120.51/ 104.77

कोलकाता- 115.12/ 99.83

चेन्नई- 110.85/ 100.94

या राज्यांमध्ये पेट्रोलचा दर १०० रुपयांच्या पुढे-

मध्य प्रदेश, राजस्थान, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, ओडिशा, जम्मू-काश्मीर आणि लडाखमध्ये पेट्रोलची किंमत 100 रुपयांच्या वर आहे. मुंबईत पेट्रोलचे दर सर्वाधिक आहेत.

अशा प्रकारे घरबसल्या तेलाच्या किंमती तपासा-

या वेबसाइटवर क्लिक करा https://iocl.com/petrol-diesel-price किंवा Google च्या प्ले स्टोअरवरून IOC चे अ‍ॅप डाउनलोड करा. तसेच 9224992249 वर एसएमएस करा. यासाठी RSP-स्पेस-पेट्रोल पंप डीलरचा कोड लिहून 9224992249 या क्रमांकावर एसएमएस करावा लागेल. अशा पद्धतीने तुम्ही पेट्रोल डिझेलच्या किमती तपासू शकता

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

Samarth Movie Review: मनाचे श्लोक, अध्यात्म अन् बाप-लेकाचा संघर्ष; विचार करायला लावणारा 'समर्थ'; कसा आहे चित्रपट?

SCROLL FOR NEXT