Petrol Pump  sakal
अर्थविश्व

कच्चे तेल सात वर्षांत पहिल्यांदा 90 डॉलर पार, पेट्रोल डिझेलचे दर स्थिर

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पेट्रोल आणि डिझेलच्या किमती 84 दिवस स्थिर राहिल्या आहेत

सकाळ डिजिटल टीम

तेल कंपन्यांनी शुक्रवारी 28 जानेवारीला पेट्रोल आणि डिझेलचे दर जाहीर केले आहे. जवळपास 84 दिवसांनंतरही देशात इंधन तेलाच्या (Crud Oil Price) किमतीत बदल झालेला नाही. पाच राज्यांतील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पेट्रोल आणि डिझेलच्या (Petrol -Disel Price) किमती 84 दिवस स्थिर राहिल्या आहेत, तर आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती सात वर्षांत पहिल्यांदा 90 डॉलर प्रति बॅरलवर पोहोचल्या आहेत. (Check Today's Petrol Diesel Price Updates)

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाची किंमत 2014 नंतर सर्वाधिक आहे. मात्र, पेट्रोल - डिझेलच्या देशांतर्गत किमतींवर त्याचा परिणाम झालेला नाही. किंमत स्थिर होण्याच्या दृष्टीने हा आतापर्यंतचा सर्वात मोठा कालावधी आहे. यापूर्वी 2020 मध्ये, सलग 82 दिवस किंमतींमध्ये कोणताही बदल झालेला नव्हता. दिल्लीत (Delhi) पेट्रोलची किंमत 95.41 रुपये तर डिझेलची किंमत 86.67 रुपये प्रति लिटर आहे. मुंबईत (Mumbai) पेट्रोलचा दर 109.98 रुपये तर डिझेलचा दर 94.14 रुपये प्रतिलिटर आहे. पुण्यामध्ये (Pune) पेट्रोलचे दर 109.72 रुपये प्रति लीटरवर आहेत, तर डिझेल 92.50 रुपये प्रति लीटरवर आहे. जाणून घेऊयात महाराष्ट्रातील इतर शहरामधील इंधनाचा दर काय आहे.(Check Today's Petrol Diesel Price Updates in Maharashtra)

शहराचे नाव... पेट्रोल ... डिझेल

दिल्ली- 95.41- 86.67 रुपये

मुंबई 109.98- 94.14 रुपये

- पुणे- 109.72- 92.50 रुपये

नागपूर- 110.10- 92.90 रुपये

- अहमदनगर- 110.12- 92.90 रुपये

- नाशिक- 109.79-92.57 रुपये

- रत्नागिरी- 110.97-93.68 रुपये

- रायगड- 109.48- 92.25 रुपये

- गडचिरोली- 110.53-93.32 रुपये

- अमरावती- 111.14- 93.90 रूपये

- औरंगाबाद- 110.38-93.14 रुपये

- सातारा- 110.03-93.88 रुपये

- सांगली-109.65-92.83 रुपये

- वाशिम- 110.71-93.49 रुपये

- कोल्हापूर- 110.09-92.89 रुपये

- सोलापूर- 110.57-93.34 रुपये

- परभणी- 112.49-95.17 रुपये

- पालघर- 109.75-92.51 रुपये

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Free Education: JEE-NEET साठी आता मोफत कोचिंग! घरबसल्या IIT प्रोफेसर्सकडून फ्रीमध्ये शिका; जाणून घ्या कुठे?

नाशिकमध्ये नवं कांड! तुरुंगात मदतीसाठी 'ओली पार्टी', ३ अधिकाऱ्यांनी आरोपींसोबत ढोसली दारू; तोतया IPSने आयोजन केल्याचा संशय

IPL 2026, MI vs RR: रोहित शर्मानंतर फक्त 'सूर्या'! मुंबई इंडियन्ससाठी 'असा' विक्रम फक्त दोघांच्याच नावावर

'मृणालने अमेरिकेत बाळाचा एकटीनं सांभाळ केला' काव्याने सांगितला नंदिनीच्या खऱ्या आयुष्यातील गरोदरपणातील अनुभव, म्हणाली...

Latest Marathi News Live Update : इंदापूर तालुक्यातील प्रश्न पेटला, कृषिमंत्री निघून गेल्यानंतरही शेतकऱ्यांचे आंदोलन सुरूच

SCROLL FOR NEXT