petrol, diesel, diesel prices, petrol prices, fuel price hike
petrol, diesel, diesel prices, petrol prices, fuel price hike  Sakal
अर्थविश्व

Petrol Diesel: पाकिस्तानमध्ये इंधनदराचा भडका; अचानक ३० रुपयांची वाढ

सकाळ डिजिटल टीम

Petrol Diesel : देशात केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील दर कमी करून दिलासा दिला होता. त्यानंतर राज्यानेही दिलासा देत पेट्रोल वरील व्हॅट कमी केला होता. त्यानंतर केंद्र आणि राज्य सरकारपैकी कुणीही भाव कमी केलेले नाहीत. आज पेट्रोल आणि डिझेल चे भाव स्थिर आहेत. राज्याने पेट्रोल आणि डिझेलवरील व्हॅट कमी केल्यानंतर आज सलग पाचव्या दिवशी दर स्थिर आहेत.

(Petrol Diesel Rate Update)

दरम्यान पाकिस्तानमध्ये आज पेट्रोल आणि डिझेलचे दर प्रतीलिटर ३० रुपयांनी वाढले आहेत. अचानक झालेल्या या वाढीमुळे पाकिस्तानातील लोकांना मोठा त्रास सहन करावा लागणार आहे. या वाढीसहित पाकिस्तानातील इस्लामाबादमध्ये पेट्रोल १७९.८५ तर डिझेल १७४.१५ रुपये प्रतीलिटर इतके झाले आहे. ही वाढ अचानक झाल्याने ग्राहकांच्या खिशाला कात्री लागणार आहे.

दरम्यान भारतात आज दरात कोणतीही वाढ झालेली दिसत नाही. मागील पाच दिवसांपासून पेट्रोल डिझेलचे दर स्थिर असून दिल्लीत पेट्रोल ९६.३२ तर डिझेल ८९.६२ रुपये प्रतीलिटर इतके दर आहेत.

मुंबईत पेट्रोलचे दर १११.३५ रुपये तर डिझेल ९७.२८ रुपये प्रतीलिटर एवढे आहेत. तर दिल्लीत पेट्रोल ९६.७२ तर डिझेल ८९.८२ रुपये प्रतीलिटर इतके आहेत. दरम्यान २१ मे रोजी केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेल वरील उत्पादन शुल्क हटवल्याने प्रत्येकी ८ आणि ६ रुपये प्रतीलिटरने भाव कमी करण्यात आले होते. त्यानंतर आजपर्यंत केंद्राकडून कोणतीही वाढ अथवा भाव कमी करण्यात आले नाही.

दरम्यान पुणे शहरात पेट्रोल १११.९३ तर डिझेल ९६.३८ रुपये प्रतीलिटर इतके झाले आहेत. नाशिकमध्ये पेट्रोल १११.२५ तर डिझेल ९५.७३ प्रतीलिटर आणि नागपूरमध्ये १११.४१ रुपये प्रतीलिटर तर ९५.९२ रुपये प्रतीलिटर डिझेल आणि कोल्हापूरात प्रत्येकी १११.०२ आणि ९५.५२ रुपये प्रतीलिटर पेट्रोल आणि डिझेलचे दर आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chhagan Bhujbal: "काँग्रेस मला मुख्यमंत्रीपद देण्यास तयार होती, मात्र मी..."; भुजबळांची शरद पवारांच्या गौप्यस्फोटावर प्रतिक्रिया

SRH vs PBKS Live Score : हैदराबादचा डोळा दुसऱ्या क्रमांकावर; पंजाबचा नवा कर्णधार शेवट गोड करण्यासाठी उत्सुक

Anil Kapoor : "सहजीवनाची 51 वर्षं..."; लग्नाच्या वाढदिवसाला अनिल यांची पत्नीसाठी इमोशनल पोस्ट

Soni Razdan: आलिया भट्टच्या आईसोबत फसवणुकीचा प्रयत्न; म्हणाल्या, "त्यांनी मला फोन केला आणि..."

RCB vs CSK : आरसीबीपाठोपाठ जिओ सिनेमाचीही बल्ले-बल्ले, मिळाली छप्पर फाड के व्ह्युवरशिप; सगळे रेकॉर्ड ब्रेक

SCROLL FOR NEXT