Fuel price hike
Fuel price hike  
अर्थविश्व

इंधन दरवाढीचा भडका; इथं पेट्रोल प्रतिलीटर 102 रुपये

नामदेव कुंभार

Petrol Diesel Price Today 6th May 2021 : लागोपाठ तिसऱ्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीमध्ये (Petrol-Diesel Price) वाढ झाली आहे. पेट्रोलच्या किंमतीमध्ये प्रतिलीटर सरासरी 35 ते 44 पैसे आणि डिझेलच्या दरांत प्रतिलीटर सरासरी 45 ते 51 पैशांची वाढ झाली आहे. राजधानी दिल्लीपासून मुंबई, चेन्नई, जयपूर सर्व ठिकामी पेट्रोलच्या किंमतीमध्ये वाढ झाली आहे. राजस्थान (Rajasthan) येथील श्रीगंगानगरमध्ये पेट्रोल प्रतिलीटर 101.85 रुपये आणि डिझेल 94.05 रुपये प्रतिलीटरवर पोहचलं आहे. पाहा देशातील प्रमुख शहरांतील पेट्रोल-डिझेलचे दर........

शहराचं नाव पेट्रोल डिझेल

दिल्ली 90.99 81.42

मुंबई 97.34 88.49

कोलकाता 91.14 84.26

चेन्नई 92.9 86.35

(petrol price latest petrol near rs 102 liter oil price continues to rise)

आपल्या शहरात काय आहेत भाव?

पेट्रोल-डिझेलच्या किंमती (Petrol-Diesel Price) आपण SMS च्या द्वारे देखील जाणून घेऊ शकता. इंडियन ऑईलच्या वेबसाईटनुसार, आपल्याला RSP आणि आपल्या शहराचा कोड लिहून 9224992249 नंबर वर SMS पाठवायचा आहे. प्रत्येक शहराचा कोड वेगवेगळा आहे. हा कोड आपल्याला IOCL च्या वेबसाईटवरुन मिळेल.

दररोज सकाळी सहा वाजता बदलतात किंमती

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किंमती दररोज बदलत असतात. त्यानुसार दररोज सकाळी सहा वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या (Petrol-Diesel Price) किंमतींमध्ये बदल होतात. सकाळी सहा वाजल्यापासून नव्या किंमती लागू केल्या जातात. पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये एक्साइज ड्यूटी, डीलर कमीशन आणि इतर गोष्टींसह या पेट्रोलचे भाव जवळपास दुप्पट होतात. परकीय चलनांसहित आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड ऑईलच्या किंमती काय आहेत या आधारावर दररोज पेट्रोल आणि डिझेलच्या (Petrol-Diesel Price) किंमतींमध्ये बदल होतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election: पुन्हा सूरत पॅटर्न! शेवटच्या दिवशी काँग्रेस उमेदवाराने अर्ज मागे घेत केला भाजप प्रवेश..काय आहे प्रकरण?

Latest Marathi News Live Update: ठाणे लोकसभा उमेदवार राजन विचारे यांच्या प्रचारार्थ आदित्य ठाकरे घेणार सभा

Champions Trophy 2025 : जागा ठरली! पाकिस्तानने केली मोठी घोषणा; PCBच्या निर्णयानंतर BCCI उचलणार मोठं पाऊल?

Kansas Bizarre : आधी बायकोची केली हत्या, मग विम्याच्या पैशातून खरेदी केली चक्क 'सेक्स डॉल'.. पोलीसही झाले हैराण!

Health Care : अवकाळी पावसानंतर सावधगिरी बाळगा; सर्दीसह दमा, श्वसन विकारात होते वाढ

SCROLL FOR NEXT