hardeep puri 
अर्थविश्व

Petrol Price : परदेशात ५०-५५ टक्के दरवाढ, भारतात... - केंद्रीय मंत्री

सकाळ डिजिटल टीम

केंद्रीय पेट्रोलियम मंत्री म्हणाले की,'पंतप्रधानांनी ५ नोव्हेंबर २०२१ रोजी दरामध्ये कपात करून काही पावले उचलली. आता काही निर्णय घेण्यासाठी आम्ही तयार आहे.'

देशातील पेट्रोल डिझेलच्या किंमती गेल्या चार महिन्यांपासून स्थिर आहेत. आता त्या वाढवल्या जातील अशी चर्चा सुरु आहे. तर दुसरीकडे केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी सोमवारी संसदेत पेट्रोल-डिझेलच्या किंमतीबाबत माहिती दिली. हरदीप सिंह पुरी म्हणाले की, माझ्याकडे अमेरिकेसह इतर देशांचा डेटा आहे. त्या देशांमध्ये गेल्या काही दिवसात मोठ्या प्रमाणावर पेट्रोलच्या दरात वाढ झाली. त्या तुलनेत भारतात हे प्रमाण कमी आहे.

हरदीप पुरी यांनी राज्यसभेत बोलताना सांगितलं की, अमेरिका, कॅनडा, जर्मनी, युके, फ्रान्स, स्पेन, श्रीलंका या देशांच्या पेट्रोल-डिझेलच्या दराचा डेटा माझ्याकडे आहे. या सर्व देशात अनुक्रमे ५० टक्के, ५५ टक्के, ५८ टक्के आणि ५५ टक्के इतकी दरवाढ गेल्या काही काळात झाली आहे. तर भारतात मात्र फक्त ५ टक्केच दर वाढले.

पेट्रोल दरवाढीवर केंद्रीय मंत्री एचएस पुरी यांनी सांगितले की, जेव्हा आम्हाला दिसून आलं की ग्राहकांना दिलासा देण्याची गरज आहे तेव्हा पंतप्रधानांनी ५ नोव्हेंबर २०२१ रोजी दरामध्ये कपात केली. आम्ही काही पावले उचलली आहेत, तसंच काही निर्णय घेण्यासाठी तयार आहे. मात्र ९ राज्यांनी असं केलेलं नाही. टॅक्सेशन फक्त एक बाजू आहे, आपल्याला ग्राहकांना दिलासा द्यायचा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: दिल्लीच्या आंदोलनात पुन्हा हिंसा! तरुणांकडून दगडफेक; पोलिसांकडून लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या

Devala News : विवाहितेने दोन लहान मुलींसह गावाबाहेरच्या विहिरीत उडी टाकून संपविले जीवन

Sonam Wangchuk: रुग्णालयातून सोनम वांगचुक यांचा पहिला व्हिडिओ, सरकारला दिला 'असा' प्रस्ताव, भावनिक प्रतिक्रिया समोर

Pune Mechanical Parking Demolition: संभाजी उद्यानातील अडीच कोटींचे मेकॅनिकल पार्किंग जमीनदोस्त; महापालिकेचा लोखंडी सांगडा हटविण्याचा प्रस्ताव स्थायी समितीपुढे

Mahagaon Bribe Case : अंगणवाडी मदतनीस नियुक्तीसाठी लाचेची मागणी; महिला व बाल विकास प्रकल्प अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT