Shares
Shares File Photo
अर्थविश्व

फार्मा सेक्टरचा हा शेअर तुमच्याकडे आहे का?

शिल्पा गुजर

जागतिक बाजारातूनही चांगले संकेत मिळत आहेत.

शेअर बाजार (Share Market) तज्ज्ञ विकास सेठी यांनी तुमच्यासाठी फार्मा क्षेत्रातील मजबूत स्टॉक निवडला आहे. कॅश मार्केटच्या या शेअरमध्ये गुंतवणूक करुन चांगला फायदा मिळेल असा विश्वास त्यांना आहे. सेठी फिनमार्टचे एमडी आणि शेअर बाजार तज्ज्ञ विकास सेठी यांनी एरिस लाइफसायन्सेसच्या (Eris Lifesciences) शेअर्सबाबत विश्वास व्यक्त केला आहे. बाजारातील अस्थिरता थोडी कमी झाली आहे. जागतिक बाजारातूनही चांगले संकेत मिळत आहेत. विशेष म्हणजे रशियन बाजारही सकारात्मक असल्याचे ते म्हणाले.

एरिस लाइफसायन्सेसच (Eris Lifesciences) का ?

Eris Lifesciences ही अतिशय दर्जेदार फार्मा कंपनी आहे. कंपनीचे डिसेंबर तिमाहीचे निकाल खूप चांगले होते. त्याचा पीएटी (करानंतरचा Profit After Tax) 100 कोटी रुपये होता. तर गेल्या वर्षी याच तिमाहीत त्याचा पीएटी 90 कोटी होता. त्याचा रिटर्न ऑन इक्विटी (RoE) 23 टक्के आहे आणि रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉइड (ROCE) 24 टक्के आहे. विशेष बाब म्हणजे एरिस लाइफसायन्सेसवर कोणतेही कर्ज नाही. त्याच वेळी, त्याचे ऑपरेटिंग प्रॉफिट मार्जिन (OPM) 32 टक्के आहे.

स्टॉकमध्ये करेक्शन

एरिस लाइफसायन्सेस (Eris Lifesciences) हाय लेव्हलवर जाऊन करेक्ट झाला आहे. करेक्शननंतर तो 700 च्या पातळीवर व्यवहार करत आहे. कंपनीत FII आणि DII ची हिस्सेदारी सुमारे 22 टक्के आहे. बाजार सावरल्यानंतर हा शेअर चांगली कामगिरी करेल असा विश्वास विकास सेठी यांनी व्यक्त केला आहे.

एरिस लाइफसायन्सेस (Eris Lifesciences)

- सीएमपी (CMP) - 702.50 रुपये

- टारगेट (Target) - 725 रुपये

- स्टॉप लॉस (Stop Loss) - 690 रुपये

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Israel Hamas War : रमजानमध्ये संदेशवाहक पाठवून युद्ध थांबले, इस्राईल-हमास युद्धावर पंतप्रधान मोदींचं मोठं वक्तव्य

Latest Marathi News Live Update : उद्या जर बिभव स्वतः आले नाहीत तर...स्वाती मालीवाल प्रकरणात महिला आयोग आक्रमक!

खासदारांच्या दिलदार मित्रानेच चंद्रहार पाटलांचा बळी दिला; विशाल पाटलांनी कोणावर केला गंभीर आरोप

Dry Day: मायानगरीचा विकेंड कोरडाच! मुंबई आणि परिसरात 3 दिवस ड्राय डे, काय आहे कारण?

नळातून किंवा शॉवरमधून पाणी येत नसेल तर घरच्या घरी 'असे' करा दुरुस्त

SCROLL FOR NEXT