Post Office  sakal
अर्थविश्व

Post Office Scheme : दररोज 95 रुपये गुंतवा, मॅच्युरिटीवर मिळतील14 लाख; कसं ते घ्या जाणून

देशातील करोडो लोकांनी पोस्ट ऑफिस योजनांमध्ये गुंतवणूक केली आहे.

सकाळ डिजिटल टीम

Post Office Scheme : प्रत्येकाला आपले भविष्य आर्थिकदृष्ट्या सुरक्षित करायचे असते. म्हणूनच लोक वेगवेगळ्या प्रकारच्या बचत योजनांमध्ये गुंतवणूक करतात. पोस्ट ऑफिस देखील अनेक प्रकारच्या बचत योजना चालवते. देशातील करोडो लोकांनी पोस्ट ऑफिस योजनांमध्ये गुंतवणूक केली आहे.

कारण त्यात गुंतवलेली रक्कम सुरक्षित राहते असा समज आहे. पोस्ट ऑफिसच्या अनेक लोकप्रिय योजना आहेत, त्यापैकी एक सुमंगल ग्रामीण पोस्टल जीवन विमा योजना (Sumangal Rural Postal Life Insurance) आहे. ही योजना विशेषतः ग्रामीण भागासाठी आहे.

10 लाख रुपयांपर्यंतचा विमा :

19 ते 45 वर्षे वयोगटातील कोणतीही व्यक्ती सुमंगल ग्रामीण पोस्टल लाइफ इन्शुरन्स योजनेचा लाभ घेऊ शकते. या योजनेत 10 लाख रुपयांपर्यंतचा विमा उपलब्ध आहे. या योजनेत दोन मॅच्युरिटी कालावधी आहेत. पॉलिसीधारक 15 वर्षे किंवा 20 वर्षांचा मॅच्युरिटी कालावधी निवडू शकतो.

हेही वाचा : Love Jihad: प्रेमाला धर्म आहे...?

15 वर्षांच्या मॅच्युरिटी कालावधी अंतर्गत, 6,9 आणि 12 वर्षे पूर्ण झाल्यावर विम्याच्या रकमेच्या 20-20 टक्के रक्कम परत मिळेल. तर, 20 वर्षांच्या मॅच्युरिटीवर, विमाधारकाला 8, 12, 16 वर्षे पूर्ण झाल्यावर पैसे परत मिळतात. उर्वरित 40 टक्के रक्कम मॅच्युरिटीवर बोनस उपलब्ध आहे.

25 वर्षांच्या व्यक्तीने 7 लाख रुपयांच्या विमा रकमेसह 20 वर्षांची पॉलिसी घेतल्यास, त्याला दररोज 95 रुपये प्रीमियम भरावा लागेल. एका महिन्यात 2,850 रुपये आणि 6 महिन्यांत 17,100 रुपये होतात. मॅच्युरिटी झाल्यावर ही रक्कम 14 लाख रुपये होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Selection : रिषभ पंतला वन डे संघात स्थान नाही, पण मिळाले कर्णधारपद; Asian Games साठीच्या संघातही दोन बदल, भन्नाट टीम्स

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Censor Board: केंद्राकडून सेन्सॉर बोर्डाची फेररचना! १८ सदस्यांची निवड; निशिगंधा वाड, वामन केंद्रे, मनोज जोशींचा समावेश

SCROLL FOR NEXT