Post Office High Return Scheme 
अर्थविश्व

Post Office Scheme : पोस्टाच्या 'या' योजनेत मिळतो FD पेक्षा जास्त परतावा

घरबसल्या करा मोठी कमाई, पोस्ट ऑफिस देत आहे संधी

सकाळ डिजिटल टीम

Post Office Scheme : बँक एफडीवर (FD) मिळणाऱ्या कमी व्याजदरामुळे लोक इतर गुंतवणुकीचे पर्याय शोधत आहे, पण, आर्थिक अस्थिरतेच्या काळात लोक सुरक्षित गुंतवणुकीच्या शोधात असतात. अशावेळी पोस्ट ऑफिसच्या योजना कामी येऊ शकतात. येथे गुंतवणूक सुरक्षित आणि जास्त परतावा देखील मिळतो आहे. अशाच काही पोस्ट ऑफिसच्या योजनांबाबत जाणून घेऊ या.(Post Office Scheme Post's scheme offers higher returns than FD)

नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट (National Saving Certificate)

  • तुम्हाला NSC मधील गुंतवणुकीवर वार्षिक ८% व्याज मिळते.

  • वार्षिक आधारावर व्याज मोजले जाते. परंतु कालावधी संपल्यानंतर तुम्हाला ही रक्कम मिळते.

  • तुम्ही किमान रु.1000 पासून गुंतवणूक करू शकता. गुंतवणुकीची कमाल मर्यादा नाही.

  • अल्पवयीन व्यक्तीच्या नावाने NSC खाते आणि 3 प्रौढांच्या नावाने संयुक्त खाते उघडता येते.

  • विशेष म्हणजे 10 वर्षांपेक्षा जास्त वयाची मुले देखील पालकांच्या देखरेखीखाली हे खाते उघडू शकतात.

  • या योजनेअंतर्गत आयकर कलम 80C अंतर्गत तुम्ही 5 लाख रु. पर्यंत कर वाचवू शकता.

  • मंथली इनकम स्कीम (Monthly Income Scheme)

  • या योजनेअंतर्गत, गुंतवणूकदारांना मासिक ठराविक रक्कम कमावण्याची संधी मिळते.

  • या योजनेत तुम्हाला एकरकमी रक्कम एकल किंवा संयुक्त (Single & joint account) खात्यात जमा करावी लागेल. त्यानंतर ही रक्कम दर महिन्याला तुमच्या खात्यात जमा होते.

  • एकल खाते असेल तर येथे तुम्ही जास्तीत जास्त 5 लाख, रुपये जमा करू शकता. संयुक्त खाते असल्यास कमाल रु. 9 लाख जमा करता येतील.

  • या योजनेतील मॅच्युरिटी कालावधी ५ वर्षांचा आहे.

  • या योजनेअंतर्गत ६.६ टक्के वार्षिक व्याजदर दिला जात आहे.

किसान विकास पत्र

  • KVP: या योजनेत गुंतवणूकीची किमान रक्कम रु. 1000 आहे.

  • गुंतवणुकीसाठी वय १८ वर्षे असणे आवश्यक आहे. अल्पवयीन मुले गुंतवणूक करू शकतात परंतु पालकांच्या देखरेखीखाली.

  • या योजनेवर सध्या ९ टक्के व्याज मिळत आहे.

  • एकल खाते आणि संयुक्त खाते सुविधा.

  • लॉक इन कालावधी अडीच वर्षे आहे पण, गुंतवणुकीची रक्कम काढण्यासाठी तुम्हाला ५ वर्षे वाट पाहावी लागेल.

  • आयकरात कलम 80C अंतर्गतही सवलत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup 2025: श्रेयस अय्यरला डावलून शुभमन गिलला संधी; मांजरेकर बसरले, 'हा अन्याय आहे...'

Viral: पतीने गर्भनिरोधक गोळी खरेदी केली, ऑनलाइन पैसे दिले, पण एक छोटी चूक अन् पत्नीसमोर अनैतिक संबंधाचे बिंग फुटले!

Latest Marathi News Updates : ठाणे महानगरपालिकेची प्रभाग रचना जाहीर

BCCI चा मोठा निर्णय! एकदिवसीय क्रिकेटला नवा आकार; प्लेट ग्रुप सिस्टीम लागू, नेमका बदल काय होणार?

Shirur Crime : मेडिकल चालकाची डॉक्टरला शिवीगाळ करीत पट्ट्याने मारहाण; डॉक्टर जखमी

SCROLL FOR NEXT