post office esakal
अर्थविश्व

पोस्ट ऑफिसच्या या योजनेत एकरकमी 15 लाख जमा करा, 5 वर्षानंतर मिळतील 20.55 लाख...

पोस्ट ऑफिसच्या लहान बचत योजना हा नेहमीच चांगला गुंतवणुकीचा पर्याय आहे.

शिल्पा गुजर

Post Office Senior Citizen Saving Scheme: पोस्ट ऑफिसच्या लहान बचत योजना हा नेहमीच चांगला गुंतवणुकीचा पर्याय आहे. यातील सर्वात चांगली गोष्ट म्हणजे सुरक्षितता.या गुंतवणुकीवर बाजारातील चढउतारांचा परिणाम होत नाही. प्रत्येक वयोगटाच्या गरजा लक्षात घेऊन पोस्ट ऑफिस योजनांमध्ये गुंतवणूक करण्याचा पर्याय आहे. यापैकी एक योजना पोस्ट ऑफिसची ज्येष्ठ नागरिक बचत योजना (SCSS) आहे. SCSS अर्थात सीनियर सिटीझन सेविंग्स स्कीम, 60 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाची व्यक्ती यात अकाउंट सुरु करु शकते. या योजनेतील मॅच्युरिटी कालावधी 5 वर्षांचा आहे.

15 लाख डिपॉझिटवर 20.55 लाख रुपये
ज्येष्ठ नागरिकांनी या योजनेत 15 लाख रुपयांची एकरकमी गुंतवणूक केली, तर एकूण रक्कम 5 वर्षांनंतर म्हणजेच मॅच्युरिटीनंतर 20.55 लाख रुपये प्रतिवर्षी 7.4 टक्के व्याजदराने (चक्रवाढ) मिळेल. 5 वर्षात 5.55 लाख रुपयांचे व्याज मिळेल. अशा प्रकारे, प्रत्येक तिमाहीचे व्याज 27,750 हजार मिळेल.

कोण खाते उघडू शकते?
SCSS अंतर्गत, 60 वर्ष किंवा त्याहून अधिक वयाची व्यक्ती अकाउंट उघडू शकते. जर एखाद्याचे वय 55 वर्ष किंवा त्याहून अधिक परंतु 60 वर्षांपेक्षा कमी असेल आणि त्याने VRS घेतले असेल तर ती व्यक्तीही SCSS मध्ये खाते उघडू शकते. पण अट अशी आहे की सेवानिवृत्तीचे लाभ मिळाल्यापासून एक महिन्याच्या आत त्यांनी हे खाते उघडले पाहिजे आणि त्यात जमा केलेली रक्कम निवृत्तीवेळी मिळालेल्या रकमेपेक्षा जास्त नसावी.

SCSS च्या मॅच्युरिटीनंतर खाते आणखी तीन वर्षांसाठी वाढवले जाऊ शकते. यासाठी मुदतपूर्तीच्या (Maturity) तारखेपासून एक वर्षाच्या आत अर्ज करावा लागेल. या अकाउंटमधील रकमेवर कर कपात (Tax Deduction) उपलब्ध आहे. या योजनेतील गुंतवणुकीला आयकर कायद्याच्या कलम 80C अंतर्गत सूट देण्यात आली आहे.

SCSS ची विशेष वैशिष्ट्ये-
- SCSS अंतर्गत, ठेवीदार त्याच्या/तिच्या जोडीदारासोबत वैयक्तिकरित्या किंवा संयुक्तपणे एकापेक्षा जास्त खाती ठेवू शकतो. पण एकूणच, कमाल गुंतवणुकीची मर्यादा 15 लाखांपेक्षा जास्त असू शकत नाही.
- 1 लाखापेक्षा कमी रकमेत खाते उघडता येते पण त्यापेक्षा जास्त रकमेसाठी चेक वापरावे लागतात.
- ज्येष्ठ नागरिक बचत योजनांमध्ये खाते उघडताना आणि बंद करताना नामांकन सुविधा उपलब्ध आहे.
- हे खाते एका पोस्ट ऑफिसमधून दुसऱ्या पोस्ट ऑफिसमध्ये ट्रान्सफर करता येते.
- अकाउंट मुदतपूर्व बंद करू शकतात. पण पोस्ट ऑफिस खाते उघडल्यानंतर 1 वर्षानंतर खाते बंद केल्यावर ठेवीतील 1.5 टक्के कपात करेल, तर 2 वर्षानंतर ठेवीतील 1 टक्के कपात केली जाईल.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Assembly election results 2026 Live Update : सुनेत्रा पवार यांची जोरदार घोडदौड कायम, एकविसाव्या फेरीत किती मते मिळाली?

Thalapathy Vijay Victory : 40 वर्षांचा अनुभव अन् अचूक टायमिंग! कोण आहेत ज्योतिषी राधन पंडित? ज्यांनी 'थलपती'च्या विजयाचं केलं होतं भाकीत?

Thermos Linked to Eye Injury Risk: थर्मास ठरतोय डोळ्यांसाठी धोकादायक? नव्या समस्येमुळे जगभरात ८ दशलक्षांहून अधिक प्रोडक्ट्सचा रीकॉल

'तुझा नेता हरतोय...' तरुणाने अफवांवर विश्वास ठेवला; थलपती विजयच्या चाहत्याने निकालाआधीच टोकाचा निर्णय घेतला

West Bengal Election Results : पश्चिम बंगालमध्ये ममतांचा गेम कसा पलटला? भाजपच्या ५ डावांनी बदललं संपूर्ण राजकारण!

SCROLL FOR NEXT