Pradhan Mantri Vaya Vandana Yojana Sakal
अर्थविश्व

प्रधानमंत्री वय वंदन योजनेतून ज्येष्ठ नागरिकांना मिळणार पेन्शनचा लाभ; जाणून घ्या

प्रधानमंत्री वय वंदन योजना भारत सरकारने सुरू केली आहे, पण ती LIC द्वारे चालवली जात आहे.

शिल्पा गुजर

Pradhan Mantri Vaya Vandana Yojana: प्रधानमंत्री वय वंदन योजनेंतर्गत, 60 वर्ष किंवा त्याहून अधिक वयाच्या नागरिकांनी मासिक पेन्शनचा पर्याय निवडल्यास त्यांना 10 वर्षांसाठी 8% व्याज मिळेल, तर वार्षिक पेन्शन निवडल्यास त्यांना 10 वर्षांसाठी 8.3% व्याज मिळेल. या योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या गुंतवणुकीवर चांगले व्याज मिळते. ही योजना सोशल सिक्युरिटी स्कीम आणि पेन्शन प्लॅन आहे. ही योजना भारत सरकारने सुरू केली आहे, पण ती LIC द्वारे चालवली जात आहे. या योजनेंतर्गत कमाल गुंतवणुकीची मर्यादा 15 लाख रुपये निश्चित करण्यात आली आहे.

अशी गुंतवणूक करा-

प्रधानमंत्री वय वंदन योजनेत गुंतवणूक करण्यासाठी, ग्राहक ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही अर्ज करू शकतात. तुम्हाला ऑनलाइन अर्ज करायचा असेल, तर तुम्ही एलआयसीच्या अधिकृत वेबसाइटवरून करू शकता. ऑफलाइन अर्ज करण्यासाठी, तुम्ही LIC च्या शाखेत जाऊन प्रधानमंत्री वय वंदना योजनेचा लाभ घेऊ शकता.

प्रधानमंत्री वय वंदन योजनेचे फायदे-

1. या योजनेत करसवलत नाही, ही फक्त गुंतवणूक योजना आहे.

2. 60 वर्षांवरील लोक जास्तीत जास्त 15 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करू शकतात. यासाठी तुम्हाला 31 मार्च 2023 पूर्वी अर्ज करावा लागेल.

3. सामान्य विमा योजना आणि मुदत विमा योजनांवर 18% GST आकारला जातो. मात्र या योजनेत जीएसटीवर सूट आहे.

4. गुंतवणुकीच्या आधारावर नागरिकांना 1,000 रुपये ते 9,250 रुपये प्रति महिना पेन्शन मिळते.

पॉलिसी मागेही घेता येते-

पॉलिसी घेतल्याच्या काही दिवसांत तुम्हाला त्यात गुंतवणूक चालू ठेवायची नाही असे वाटत असल्यास, तुम्ही ती काढू शकता. जर तुम्ही ही पॉलिसी ऑनलाइन खरेदी केली असेल तर 30 दिवसांच्या आत आणि जर तुम्ही ऑफलाइन पॉलिसी खरेदी केली असेल तर तुम्ही ती 15 दिवसांच्या आत परत घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video: TMC नेता BJP मध्ये सामील व्हायला आला; पण भाजप कार्यकर्ता संतापला, चेहऱ्याला हिरवा रंग फासून बाहेर काढलं

Gold Rate Today: सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! 2 दिवसांतच भावात मोठा बदल; मुंबई-पुणेसह महाराष्ट्रात आजचा दर किती?

वंदे भारत एक्सप्रेसमध्ये चोरी; पुण्यातील महिलेचे २० लाखांचे दागिने अन् रोकड लंपास

'लग्न पंचमी नाटकातून अमृता खानविलकरची एक्झिट; ही गोष्ट ठरली कारण; आता स्वप्नीलसोबत दिसणार 'जीव झाला वेडापिसा' फेम अभिनेत्री

ENG W vs SL W : रेकॉर्ड ब्रेकिंग मॅच! इंग्लंडचा दणदणीत विजय अन् श्रीलंकेविरुद्ध विक्रमांचा पाऊस; टीम इंडियाचाही विक्रम मोडला

SCROLL FOR NEXT