Share Market Update esakal
अर्थविश्व

बाजार सुरू होण्याआधी जाणून घ्या आज कोणते 10 शेअर्स करतील परफॉर्म?

कमकुवत जागतिक संकेतांमुळे बाजाराने आठवड्याची सुरुवात कमजोर झाल्याचे रेलिगेअर ब्रोकिंगचे अजित मिश्रा म्हणाले.

सकाळ डिजिटल टीम

सोमवारी कमकुवत जागतिक ट्रेंड आणि फार्मा वगळता सर्व क्षेत्रातील विक्रीमुळे निफ्टी 16,900 च्या खाली गेल्याने बाजार नकारात्मक नोटवर बंद झाला. सेन्सेक्स 638.11 अंकांनी अर्थात 1.11% घसरून 56,788.81 वर बंद झाला. निफ्टी 207 अंकांनी अर्थात 1.21% घसरून 16,887.30 वर बंद झाला.

आज कशी असेल बाजाराची स्थिती?

कमकुवत जागतिक संकेतांमुळे बाजाराने आठवड्याची सुरुवात कमजोर झाल्याचे रेलिगेअर ब्रोकिंगचे अजित मिश्रा म्हणाले.
निफ्टीवर विक्रीचा मोठा दबाव होता. फार्मा वगळता सर्व क्षेत्रीय निर्देशांक घसरणीसह बंद झाले. यामध्ये मेटल आणि पीएसयू बँकिंगला सर्वाधिक फटका बसला. निफ्टी 16,800 च्या खाली गेल्यास निफ्टीमधील मोठी विक्री होऊ शकते. त्यामुळे गुंतवणूकदारांनी बाजारात हलकी पोझिशन घ्यावी असा सल्ला त्यांनी दिला.

बेंचमार्क निफ्टीने डेली चार्टवर डार्क क्लाउड कवर फॉर्मेशन तयार केले आहे, जे बियरीश रिव्हर्सलचे संकेत देत असल्याचे एलकेपी सिक्युरीटीजचे रुपक डे म्हणाले. शिवाय निर्देशांक 200DMA च्या खाली घसरला आहे जो पुन्हा एकदा मंदीचा सेट अप दाखवत आहे. त्याचा RSI मंदीच्या क्रॉसओव्हरमध्ये आहे. तो आता ओव्हरसोल्ड झोनच्या दिशेने सरकत आहे.

16,800 वर इंडेक्सला सपोर्ट आहे. याचा अर्थ 16,800 च्या खाली निर्णायक घसरण निफ्टीला आणखी खाली नेऊ शकते. अशा स्थितीत निफ्टी 16,600/16,300 पर्यंत घसरू शकतो. दुसरीकडे, निफ्टी वरच्या बाजूने 17,000/17,200 वर रझिस्टंस दिसत आहे.

आजचे टॉप 10 शेअर्स कोणते ?

अदानी एन्टरप्रायझेस (ADANIENT)
आयशर मोटर्स (EICHERMOTORS)
अदानी पोर्ट्स (ADANIPORTS)
टाटा कंझ्युमर्स (TATACONSUMER)
मारुती (MARUTI)
ए यू बँक (AUBANK)
टीव्हीएस मोटर्स (TVSMOTORS)
एल अँड टी टेक्नॉलॉजी सर्व्हिसेस लिमिटेड (LTTS)
एबीबी इंडिया लिमिटेड (ABB)
श्रीराम ट्रान्सपोर्ट फायनान्स लिमिटेड (SRTRANSIN)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

शेगावजवळ ओव्हरहेड केबल तुटल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत; अमरावती–पुणे एक्स्प्रेससह अनेक गाड्या खोळंबल्या

२०४७ पर्यंत एसटी बसेस १०० टक्के ईव्ही करणार, चार्जिग स्टेशन उभारण्याच्या कामाला गती देण्याचे मुख्यमंत्री फडणवीसांचे निर्देश

Pune News : सुप्रिया सुळेंच्या आरोपांना पोलिस आयुक्तांचे उत्तर! आकडेवारीसह मांडले पुण्याच्या सुरक्षेचे वास्तव

Mumbai T20 League: शाश्वत जगतापचे खणखणीत शतक अन् ईगल ठाणे स्ट्रायकर्सचा बांद्रा ब्लास्टर्सवर दणदणीत विजय

Thane: महावितरणविरोधात आंदोलन अन्‌ राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यावर गुन्हा; प्रशासनावर नेत्याचा गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT