Share Market Today Esakal
अर्थविश्व

Share Market : आज कोणते 10 शेअर्स करतील परफॉर्म?

सोमवारची रिकव्हरी असूनही, बाजारात आणखी अस्थिरता दिसू शकते असे कोटक सिक्युरिटीजचे श्रीकांत चौहान म्हणाले.

सकाळ डिजिटल टीम

Share Market : सोमवारी दमदार जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात खरेदीचे वातावरण होते. कंझ्युमर ड्यूरेबल वगळता बीएसईचे सर्व सेक्टरल इंडेक्स हिरव्या रंगात बंद झाले. आयटी आणि मेटल सेक्टरमध्ये तर मजबूत तेजी दिसून आली. आयटी इंडेक्सने 2 महिन्यांतील सर्वात मोठी इंट्रा-डे वाढ पाहिली.

इन्फ्रा, ऑटो, एनर्जी, बँकिंग शेअर्समध्येही खरेदी झाली. फार्मा, एफएमसीजी, रियल्टी शेअर्समध्येही वाढ झाली. (pre analysis of share market update 10 January 2023 )

व्यवहाराअंती सेन्सेक्स 847 अंकांनी वाढून 60747 वर बंद झाला. त्याच वेळी निफ्टी 242 अंकांनी वर चढून 18101 च्या पातळीवर बंद झाला. तर निफ्टी बँक 394 अंकांनी वाढून 42583 वर बंद झाला. तर मिडकॅप 296 अंकांनी वाढून 31717 वर बंद झाला.

निफ्टीचे 50 पैकी 43 शेअर्स वाढले. त्याचवेळी सेन्सेक्समधील 30 पैकी 27 शेअर्समध्ये खरेदी दिसून आली. निफ्टी बँकेचे सर्व 12 शेअर्स वाढले.

आज कशी असेल बाजाराची स्थिती ?

सोमवारी बाजारात चांगली तेजी दिसून आल्याचे शेअरखानचे गौरव रत्नपारखी म्हणाले.  पुढे जाऊन निफ्टी 18200-18260 च्या दिशेने जाताना दिसतो. आता निफ्टीला पहिला सपोर्ट 18000 वर दिसत आहे.

सोमवारची रिकव्हरी असूनही, बाजारात आणखी अस्थिरता दिसू शकते असे कोटक सिक्युरिटीजचे श्रीकांत चौहान म्हणाले. कारण बाजारापुढील सर्व आव्हाने अजूनही कायम आहेत. तांत्रिक दृष्टीकोनातून विचार केल्यास एक बुलिश कँडल आणि डेली चार्टवर चांगले रिव्हर्सल फॉर्मेशन सध्याच्या पातळीपासून आणखी चढ-उतार सूचित करत आहेत.

आता निफ्टीला 18000 वर सपोर्ट दिसत आहे. जर निफ्टी या सपोर्टच्या वर राहिल्यास यात 1800-18270 च्या दिशेने वाटचाल पाहू शकतो. ज्यामध्ये निफ्टी 18000 च्या खाली गेल्यास ही घसरण 17900 पर्यंत जाऊ शकते असेही ते म्हणाले.

आजचे टॉप 10 शेअर्स कोणते ?

महिन्द्रा अँड महिन्द्रा (M&M)
एसबीआय लाईफ (SBILIFE)
इंडसइंड बँक (INDUSINDBK)
टीसीएस (TCS)
एचसीएल टेक (HCLTECH)
पर्सिस्टंट (PERSISTENT)
अशोक लेलँड (ASHOKLEY)
श्रीराम ट्रान्सपोर्ट फायनान्स लिमिटेड (SHRIRAMFIN)
भारतफोर्ज (BHARATFORG)
गोदरेज प्रॉपर्टीज (GODREJPROP)

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime News : चोरीच्या पैशातून चंगळ, ६ तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, १० वर्ष जंगलात लपून बसला; सराईत बाईकचोराला अशी झाली अटक

Latest Marathi Breaking News : शिवसेनेला मोठा धक्का; अजून काही नगरसेवक करणार भाजपमध्ये प्रवेश

Hotstar सब्स्क्रिप्शन पूर्णपणे फ्री! सोबत मिळणार 15GB डेटा, काय आहे हा धमाकेदार प्लॅन? जाणून घ्या

Mumbai CNG crisis: कसं होणार मुंबईचं? सीएनजी तुटवड्याने थबकली... ऑटोचं भाडं किती वाढलं? विमानतळावर जाण्यासाठी कॅबसुद्धा नाही

Gadhinglaj News: गडहिंग्लजमध्ये चार पक्षांची महाआघाडी एकत्र; राष्ट्रवादीविरोधात रंगणार थरारक लढत!

SCROLL FOR NEXT