Share Market Update sakal
अर्थविश्व

Share market: आज कोणते 10 शेअर्स करतील परफॉर्म? जाणून घ्या

आता कच्च्या तेलाच्या किमती आणि चलनाबाबत कोणतीही नकारात्मक बातमी आली तर आणखी प्रॉफीट बुकिंग पाहायला मिळू शकते.

सकाळ डिजिटल टीम

सोमवारी सेन्सेक्स-निफ्टी लाल रंगात अर्थात घसरणीसह बंद झाले. सेन्सेक्स 170.89 अंकांनी म्हणजेच 0.28 टक्क्यांनी घसरून 61624.15 वर बंद झाला. त्याच वेळी, निफ्टी 20.50 अंकांच्या म्हणजेच 0.11 टक्क्यांच्या घसरणीसह 18329.20 च्या पातळीवर बंद झाला.(pre analysis of share market update 15 November 2022)

आज कशी असेल बाजाराची स्थिती ?

आठवडय़ाच्या पहिल्या दिवशी बाजारात कमी प्रमाणात व्यवहार झाले. स्मॉलकॅप शेअर्समध्ये खरेदी, तर मिडकॅप शेअर्स फ्लॅट बंद झाले. मेटल रियल्टी, आयटी शेअर्समध्ये खरेदी झाली. त्याचप्रमाणे एफएमसीजी आणि कंझ्युमर गुड्सच्या शेअर्समध्येही विक्री झाली.

निफ्टी बँक 60 अंकांनी घसरून 42077 वर बंद झाला. मिडकॅप 17 अंकांनी वाढून 31399 वर बंद झाला. सेन्सेक्समधील 30 पैकी 14 शेअर्स विकले गेले. निफ्टी बँकेच्या 12 पैकी 7 शेअर्समध्ये खरेदी झाली.

सोमवारी मंदीच्या वातावरणात मार्केट साइडवेज व्यवसाय करताना दिसला आणि शेवटी लाल चिन्हाने बंद झाल्याचे कोटक सिक्युरिटीजचे श्रीकांत चौहान म्हणाले. गेल्या आठवड्यातील जोरदार तेजीनंतर व्यापारी प्रॉफीट बुक करताना दिसले.

आता कच्च्या तेलाच्या किमती आणि चलनाबाबत कोणतीही नकारात्मक बातमी आली तर आणखी प्रॉफीट बुकिंग पाहायला मिळू शकते. निफ्टीने डेली चार्टवर एक छोटी बियरीश कँडल तयार केली आहे.

निफ्टीला आता 18250 आणि 18200 वर मजबूत सपोर्ट दिसत आहे. निफ्टी या सपोर्टच्या वर टिकून राहिल्यास त्यात 18390 ची पातळी दिसू शकते. यानंतर निफ्टीही 18500 च्या पातळीला स्पर्श करू शकतो.

आजचे टॉप 10 शेअर्स कोणते ?

डॉ. रेड्डी (DRREDDY)
कोल इंडिया (COALINDIA)
आयटीसी (ITC)
हिंदुस्थान युनिलिव्हर (HINDUNILVR)
स्टेट बँक ऑफ इंडिया (SBIN)
एबीबी इंडिया लिमिटेड (ABB)
भारत फोर्ज (BHARATFORG)
ऍस्ट्रल (ASTRAL)
झी एन्टरटेन्मेंट लिमिटेड (ZEEL)
पेज इंडिया (PAGEIND)

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tahawwur Rana : 26/11 दहशतवादी हल्ला प्रकरणी महत्त्वाची अपडेट; तहव्वूर राणानं दिली हल्ल्याची कबुली, नेमकं काय केला खुलासा?

Accident News: देव तारी त्याला...! पाच मजली इमारत कोसळूनही तीन महिन्यांची चिमकुली सुखरुप बचावली, 27 जणांचा मृत्यू

Latest Maharashtra News Updates : लोकांच्या घरी होळ्या पेटवून पोळ्या भाजण्याचा भाजपाचा धंदा - उद्धव ठाकरे

Mutual Fund: 3,000 रुपयांची SIP की 3 लाख रुपयांची Lumpsum: 30 वर्षांनंतर कोण देणार जास्त परतावा?

Nagpur Crime: नागपूर हादरलं! प्रियकराच्‍या मदतीने पतीचा खून; उत्तरीय चाचणीच्या अहवालातून खुलासा

SCROLL FOR NEXT