Share Market
Share Market sakal
अर्थविश्व

Share Market : आज कोणते 10 शेअर्स करतील परफॉर्म?

सकाळ डिजिटल टीम

Share Market : सोमवारी बाजार चढ-उतारानंतर बाजार घसरणीवर बंद झाला. सेन्सेक्स 168 अंकांनी घसरून 60,093 वर बंद झाला. दुसरीकडे, निफ्टी 62 अंकांनी घसरून 17895 च्या पातळीवर बंद झाला. मिडकॅप आणि स्मॉलकॅप इंडेक्स घसरले.

मेटल, ऑटो, इन्फ्रा शेअर्समध्ये विक्री झाली, तर रिअल्टी, फार्मा शेअर्सवर सर्वाधिक दबाव दिसून आला. सरकारी बँकांशी संबंधित शेअर्समध्ये खरेदी झाली, तर आयटी, एनर्जी इंडेक्स वाढीसह बंद झाले. (pre analysis of share market update 17 January 2023 )

आज कशी असेल बाजाराची स्थिती ?

गेल्या काही आठवड्यांपासून निफ्टीमध्ये शॉर्ट टर्म कॉन्सोलिडेशन दिसत असल्याचे शेअर खानचे गौरव रत्नपारखी यांनी सांगितले.  निफ्टीने डेली चार्टवर त्रिकोण तयार केला आहे. गेल्या आठवड्याच्या शेवटी, निफ्टीने या पॅटर्नच्या खालच्या टोकाजवळ आपला पाया तयार केला.

यानंतर सोमवारी इथून निफ्टीमध्ये वाढीसह ओपनिंग दिसली. पण निफ्टी पुन्हा पॅटर्नच्या वरच्या टोकापर्यंत पोहोचेपर्यंत घसरला. आत्तापर्यंत निफ्टी क्लोजिंग बेसिसवर 17800 च्या वर राहील. तोपर्यंत निफ्टी वर जाण्याची शक्यता कायम राहील. जर निफ्टीने 18050 चा नजीकचा टर्म बॅरियर तोडला तर त्याला आणखी तेजी येईल.

बाजारात प्रत्येक तेजीवर विक्रीचा दबाव दिसत असल्याचे रेलिगेअर ब्रोकिंगचे अजित मिश्रा म्हणाले. जे बाजाराला स्पष्ट दिशा नसल्याचं लक्षण आहे. म्हणून आपण पोझिशन्स मर्यादित ठेवली पाहिजे आणि निफ्टीमध्ये 17800-18000 झोनमधून निर्णायक ब्रेक आऊट होण्याची वाट पहावी असा सल्ला त्यांनी दिला.

आजचे टॉप 10 शेअर्स कोणते ?

अदानी एन्टरप्रायझेस (ADANIENT)
ऍक्सिस बँक (AXISBANK)
हिन्दाल्को (HINDALCO)
जेएसडब्ल्यू स्टील (JSWSTEEL)
मारुती (MARUTI)
ऍस्ट्रल (ASTRAL)
झिंदाल स्टील (JINDALSTEL)
डिक्सन (DIXON)
हिंदुस्थान पेट्रोलियम (HINDPETRO)
भारत फोर्ज (BHARATFORG)

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai local: मुंबईत लोकलच्या गर्दीमुळे झालेला मृत्यू अपघातच! जबाबदारी रेल्वे प्रशासनाची, भरपाई देण्याचे कोर्टाचे आदेश, नाहीतर...

Singham Again: श्रीनगरमध्ये सुरुये 'सिंघम अगेन'चं शूटिंग; अजय देवगण आणि जॅकी श्रॉफ यांच्या अॅक्शन सीनचा व्हिडीओ व्हायरल

Dinesh Karthik RCB vs CSK : धोनीच्या षटकार ठरला आरसीबीसाठी टर्निंग पॉईंट... दिनेश कार्तिक असं का म्हणाला?

गोफण | 'बिनशर्त'ची सुपारी दणक्यात वाजली!

RR vs KKR : राजस्थान अपयशाची मालिका खंडित करणार? अव्वल स्थानावर असलेल्या कोलकताविरुद्ध आज सामना

SCROLL FOR NEXT