Share Market esakal
अर्थविश्व

बाजार सुरू होण्याआधी जाणून घ्या आज कोणते 10 शेअर्स करतील परफॉर्म?

यूकेमध्ये 40 वर्षांच्या हाय सीपीआयनंतर युरोपियन बाजारातील तेजीला बाधा आल्याचे जिओजित फायनान्शिअल सर्व्हिसेसचे विनोद नायर म्हणाले.

सकाळ डिजिटल टीम

बुधवारी शेअर बाजार सलग चौथ्या दिवशी वाढीसह बंद झाला. सेन्सेक्स 146.59 अंकांनी अर्थात 0.25 टक्क्यांनी वाढून 59,107.19 वर बंद झाला. निफ्टी 25.30 अंकांनी म्हणजेच 0.14 टक्क्यांनी वाढून 17,512.30 वर बंद झाला.
यूकेमध्ये 40 वर्षांच्या हाय सीपीआयनंतर युरोपियन बाजारातील तेजीला बाधा आल्याचे जिओजित फायनान्शिअल सर्व्हिसेसचे विनोद नायर म्हणाले.  पण अमेरिकेतील चांगल्या कॉर्पोरेट निकालांच्या घोषणेच्या पार्श्वभूमीवर देशांतर्गत बाजारात सकारात्मक वातावरण दिसले.

आज कशी असेल बाजाराची स्थिती ?

जागतिक बाजार सावध होताच भारतीय निर्देशांक स्थिर वाढीसह बंद झाल्याचे कोटक सिक्युरिटीजचे श्रीकांत चौहान म्हणाले. गुंतवणूकदार निवडक खरेदीमध्ये गुंतलेले आहेत. निफ्टीने डेली चार्टवर एक बियरिश कँडल तयार केली आहे. पण बाजाराचा शार्ट टर्म टेक्स्चर अजूनही सकारात्मक दिसत आहे.

निफ्टीसाठी 17,400 वर महत्त्वाचा सपोर्ट झोन असेल असे श्रीकांत चौहान म्हणाले. जर निर्देशांक याच्या वर व्यवहार करत असेल तर येत्या काळात तो 17,600-17,700 च्या पातळीवर जाऊ शकतो. दुसरीकडे, 17,400 च्या खाली गेल्याने त्याचा अपट्रेंड कमकुवत होईल.
अस्थिर सत्रात बाजार किरकोळ वाढीने बंद झाल्याचे रेलिगेअर ब्रोकींगचे अजित मिश्रा म्हणाले. सुरुवातीच्या तेजीनंतर निफ्टीमध्ये हळूहळू घसरण दिसून आली. याचे कारण गुंतवणूकदारांनी प्रॉफिट बूक करायला प्राधान्य दिले. यामुळे बाजार बंद होताना निफ्टी 17,512 च्या पातळीवर आला. निफ्टीमध्ये काही प्रमाणात स्थिरता येण्याची चिन्हे आहेत, जी त्यासाठी फायदेशीर ठरेल असेही ते म्हणाले.

आजचे टॉप 10 शेअर्स कोणते ?

नेसले इंडिया (NESTLEIND)
आयटीसी (ITC)
एचडीएफसी (HDFC)
रिलायन्स (RELIANCE)
ऍक्सिस बँक (AXISBANK)
भारतीय कंटेनर निगम (CONCOR)
टीव्हीएस मोटर्स (TVSMOTOR)
लॉरस लॅब (LAURUSLABS)
आयडीएफसी फर्स्ट बँक (IDFCFIRSTB)
पेज इंडिया (PAGEIND)

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran Ship Toll Plan: होर्मुज स्ट्रेटमध्ये नवा ट्रॅफिक सिस्टम लागू करणार! इराणचा मोठा निर्णय; संपूर्ण प्लॅनच सांगितला

PBKS vs RCB, Playing XI: बंगळुरूने पंजाबविरुद्धच्या सामन्यासाठी अचानक कर्णधार बदलला, खरं कारण काय?

वयाच्या ४६व्या वर्षीही मुक्ता बर्वे अविवाहित का आहे? 'या' व्यक्तीवर होता क्रश, म्हणाली, 'एखाद्याच्या आयुष्यात...

LPG ग्राहकांना मोठा दिलासा! २० हजार टन एलपीजी घेऊन जहाज भारतात दाखल, गॅस पुरवठ्याचं टेन्शन कमी होणार

'तुला मुलीच होतात, मुलगा नाही...'; म्हणत पतीनं पत्नीच्या गुप्तांगावर ॲसिड टाकलं; पुण्यातील धक्कादायक घटना

SCROLL FOR NEXT