Share Market esakal
अर्थविश्व

Share Market : आज कोणते 10 शेअर्स करतील परफॉर्म?

दुसरीकडे, फार्मा आणि आयटी शेअर्समध्ये तेजी कायम राहिली.

सकाळ डिजिटल टीम

कोरोनाच्या वाढत्या चिंतेमुळे बुधवारी सेन्सेक्स-निफ्टी 1 टक्क्यांहून अधिक घसरणीसह बंद झाले. बुधवारी बँकिंग, मेटल आणि रियल्टी शेअर्सवर सर्वाधिक दबाव दिसून आला. त्याचवेळी ऑटो, इन्फ्रा आणि हॉटेल शेअर्समध्येही विक्री दिसून आली. दुसरीकडे, फार्मा आणि आयटी शेअर्समध्ये तेजी कायम राहिली.

सेन्सेक्स 635 अंकांनी घसरला आणि 61067 च्या पातळीवर बंद झाला. त्याचवेळी निफ्टी 186 अंकांनी घसरून 18199 वर बंद झाला. निफ्टी बँक 54 अंकांनी घसरून 43360 वर बंद झाला. मिडकॅपही 70 अंकांनी घसरून 32117 वर बंद झाला. (pre analysis of share market update 22 December 2022 )

आज कशी असेल बाजाराची स्थिती ?

भारतीय बाजाराने इतर आशियाई भागांच्या तुलनेत कमी कामगिरी केल्याचे कोटक सिक्युरिटीजचे श्रीकांत चौहान म्हणाले. जगातील सर्व प्रमुख अर्थव्यवस्थांमधील मंदीची भीती आणि त्याचा इतर उदयोन्मुख बाजारांवर होणारा संभाव्य परिणाम यामुळे भारतीय बाजारांमध्ये मोठ्या प्रमाणात घसरण झाली.

तांत्रिक दृष्टिकोनातून पाहिल्यास निफ्टीने पुन्हा एकदा 18450 च्या जवळ सपोर्ट घेतला आणि त्यानंतर मोठी घसरण झाली. याशिवाय निफ्टीने डेली चार्टवर बियरिश कँडल तयार केली आहे जे नकारात्मक संकेत आहेत.

आता जोपर्यंत निफ्टी 18350 च्या खाली राहील, तोपर्यंत बाजारात कमजोरीची चिन्हे राहतील. पुढे जाऊन, निफ्टी 18100-18050 च्या दिशेने सरकताना दिसेल. दुसरीकडे, जर निफ्टीने 18350 ची पातळी ओलांडून ताकद दाखवली, तर एक नवीन पुलबॅक रॅली पाहू शकतो जी निफ्टीला 18450-18475 पातळीकडे नेऊ शकते.

आजचे टॉप 10 शेअर्स कोणते ?

अदानी एन्टरप्रायझेस (ADANIENT)
अदानी पोर्ट्स (ADANIPORTS)
अल्ट्राटेक सिमेंट (ULTRACEMCO)
इंडसइंड बँक (INDUSINDBK)
बजाज फिनसर्व्ह (BAJAJFINSV)
इंडियन हॉटेल (INDHOTEL)
आयडीएफसी फर्स्ट बँक (IDFCFIRSTB)
हिंदुस्थान पेट्रोलियम (HINDPETRO)
ट्रेंट (TRENT)
एबीबी इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (ABB)

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MK Stalin Reaction : ठाकरे बंधूंच्या मेळाव्यावर आता CM स्टॅलिन यांचीही आली प्रतिक्रिया; केलंय मोठं विधान!

IND vs ENG 2nd Test: भारताची ऐतिहासिक विजयाच्या दिशेने कूच! Akash Deep चा भेदक मारा, इंग्लंडची उडवली झोप

Mumbai Airport Wildlife Smuggling : खळबळजनक! मुंबई विमानतळावर प्रवाशाच्या बॅगेत तब्बल ४५ प्राणी सापडले

Central Railway: मध्य रेल्वेची ज्येष्ठांसाठी मोठी घोषणा

Rabri Devi Statement : तेजप्रताप यादव प्रकरणावर पहिल्यांदाच राबडी देवींनी सोडलं मौन अन् जाहीर कार्यक्रमात, म्हणाल्या...

SCROLL FOR NEXT