Share Market pre analysis esakal
अर्थविश्व

Share Market : आज कोणते 10 शेअर्स करतील परफॉर्म ?

चीनच्या लॉकडाऊनच्या बातम्यांचा बाजारावर परिणाम झाला. तांत्रिक दृष्टिकोनातून, निफ्टीने रिव्हर्सलनंतर एक लहान बियरीश कँडल तयार केली आहे, जे अनिश्चिततेचे संकेत देत आहेत.

सकाळ डिजिटल टीम

नोव्हेंबरच्या एक्सपायरीपूर्वी बुधवारी बाजार एका श्रेणीत व्यवहार करताना दिसला. सेन्सेक्स 92 अंकांनी वधारून 61511 वर बंद झाला तर निफ्टी 23 अंकांनी वाढून 18267 वर बंद झाला. निफ्टी बँक विक्रमी पातळीवर बंद झाली. रेल्वे, फर्टिलायझर्सच्या शेअर्समध्ये जोरदार वाढ झाली. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या शेअर्सनीही चांगली कामगिरी केली.

ऑटो आणि रियल्टी शेअर्समध्येही खरेदी झाली. मात्र, मेटल आणि आयटी शेअर्सवर दबाव दिसून आला. सेन्सेक्स 92 अंकांनी वाढून 61511 वर बंद झाला. त्याच वेळी, निफ्टी 23 अंकांनी वाढून 18267 वर बंद झाला. निफ्टी बँक 272 अंकांनी वाढून 42729 वर बंद झाला. मिडकॅप्स 81 अंकांनी वाढून 31151 वर बंद झाला. (Pre analysis of share market update 24 November 2022 )

आज कशी असेल बाजाराची स्थिती ?

बाजार वाढीसह खुला झाला पण ही वाढ पुढच्या लेव्हलपर्यंत जाऊ शकली नसल्याचे शेअरखानचे गौरव रत्नपारखी म्हणाले. वरच्या बाजूला आवर्ली बोलिंजर बँडने स्पीड ब्रेकर म्हणून काम केले आणि बाजारातील तेजी थांबवली. आता निफ्टीमध्ये आपण 18100-18000 ची पातळी पाहू शकतो. पण हे करेक्शन एक शॉर्ट टर्म कंसोलिडेशनचा एक भाग असेल. हे कंसोलिडेशन 18000-18450 दरम्यान होऊ शकते. निफ्टीला 18300-18325 या झोनमध्ये रझिस्टंसचा सामना करावा लागत आहे.

दिवसभरातील चढ-उतारांदरम्यान बाजार एका छोट्या श्रेणीत फिरताना दिसल्याचे कोटक सिक्युरिटीजचे श्रीकांत चौहान म्हणाले. चीनच्या लॉकडाऊनच्या बातम्यांचा बाजारावर परिणाम झाला. तांत्रिक दृष्टिकोनातून, निफ्टीने रिव्हर्सलनंतर एक लहान बियरीश कँडल  तयार केली आहे, जे अनिश्चिततेचे संकेत देत आहेत.

आजचे टॉप 10 शेअर्स कोणते ?

अपोलो हॉस्पिटल (APOLLOHOSP)
एचडीएफसी लाईफ (HDFCLIFE)
जेएसडब्ल्यू स्टील (JSWSTEEL)
बजाज फायनान्स (BAJFINANCE)
स्टेट बँक ऑफ इंडिया (SBIN)
भारतीय कंटनेर निगम (CONCOR)
एबीबी इंडिया लिमिटेड (ABB)
ए यू बँक (AUBANK)
अशोक लेलँड (ASHOKLEY)
टीव्हीएस मोटर्स (TVSMOTOR)


नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT