sensex google
अर्थविश्व

बाजार सुरू होण्याआधी जाणून घ्या आज कोणते 10 शेअर्स करतील परफॉर्म?

निफ्टीला 17250 वर सपोर्ट आहे, जर निफ्टी खाली घसरला तर 17150-17100 ची पातळी पाहू शकतो. दुसरीकडे, जर निफ्टी 17450 च्या वर गेला तर त्यात नवीन ब्रेक आऊट दिसेल आणि मग ते 17560-17600 च्या दिशेने जाताना दिसेल.

शिल्पा गुजर

सलग 6 दिवसांच्या वाढीनंतर गुरुवारी बाजार लाल चिन्हात बंद झाला. आजच्या चलनविषयक धोरणापूर्वी बाजार सुस्त दिसला. व्यवहाराच्या शेवटी सेन्सेक्स 51.73 अंकांनी म्हणजेच 0.09 टक्क्यांनी घसरून 58,298.80 वर बंद झाला. दुसरीकडे, निफ्टी 6.15 अंक म्हणजेच 0.04 टक्क्यांनी घसरून 17,382.00 वर बंद झाला.

अमेरिकेच्या मजबूत आर्थिक आकडेवारीमुळे बाजार तेजीसह उघडला, मात्र अमेरिका आणि चीनमध्ये सुरू असलेल्या तणावामुळे गुरुवारी बाजारात प्रचंड अस्थिरता होती असे जिओजित फायनान्शिअल सर्व्हिसेसचे विनोद नायर म्हणाले.

मात्र, भारतीय शेअर बाजारात विदेशी गुंतवणूकदारांनी केलेल्या खरेदीमुळे गुंतवणूकदारांनीही शेअर्स खरेदी केली. त्यामुळे शेवटच्या व्यवहाराच्या तासात बाजारात थोडी रिकव्हरी झाली.

आज कशी असेल शेअर बाजाराची स्थिती ?

गुरुवारी बाजार फ्लॅट बंद होण्यापूर्वी निफ्टी खूपच अस्थिर होता असे एलकेपी सिक्युरिटीजचे रुपक डे म्हणाले. वरच्या बाजूला, निफ्टीला 17500 चा रझिस्टंस म्हणून काम करावे लागले आणि इथून पुन्हा खाली घसरले. पण, मोमेंटम इंडिकेटर RSI बुलिश क्रॉसओव्हरमध्ये आहे. जोपर्यंत निफ्टी 17500 च्या खाली राहील, तोपर्यंत बाजारात फक्त नकारात्मक किंवा साइडवेज ट्रेंड दिसेल. निफ्टीच्या डाउनसाइडवर, 17100-17000 च्या दिशेने सपोर्ट दिसत आहे.

तांत्रिक दृष्टिकोनातून विचार केल्यास निफ्टीमध्ये 17400 -17450 दरम्यान नफा-वसुली दिसून आली. निफ्टीने बियरिश कँडल तयार केली आहे. जे बुल्स आणि बियर्स यांच्यातील अनिश्चितता दाखवत आहे. निफ्टीला 17250 वर सपोर्ट आहे, जर निफ्टी खाली घसरला तर 17150-17100 ची पातळी पाहू शकतो. दुसरीकडे, जर निफ्टी 17450 च्या वर गेला तर त्यात नवीन ब्रेक आऊट दिसेल आणि मग ते 17560-17600 च्या दिशेने जाताना दिसेल.

आजचे टॉप 10 शेअर्स कोणते ?

सिप्ला (CIPLA)
नेसले इंडिया (NESTLEIND)
सनफार्मा (SUNPHARMA)
इन्फोसिस (INFY)
अपोलो हॉस्पिटल (APOLLOHOSP)
ए यू बँक (AUBANK)
ऍस्ट्रल (ASTRAL)
लॉरस लॅब (LAURUSLABS)
ऑरो फार्मा (AUROPHARMA)
पेड इंडिया (PAGEIND)


नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shaha : शिवरायांनी स्वराज्याचे संस्कार रुजविले... पेशव्यांनी स्वराज्य पुढे नेले; अमित शाहांचे पुण्यात गौरवोद्गार

ENG vs IND, 2nd Test: रवींद्र जडेजानं मोडला BCCI चा 'हा' नियम; आता काय होणार कारवाई नेमक काय घडलं, वाचा!

Latest Maharashtra News Updates : पेशवे बाजीरावांच्या स्मारकासाठी सर्वात योग्य जागा म्हणजे NDA - गृहमंत्री अमित शाह

'ज्याने हे केलय त्याच्यावर आता...' मुलाबद्दल फेक न्यूज पसरवणाऱ्यावर रेशम टिपणीस भडकली, म्हणाली, 'तो ठणठणीत आहे.'

शरद उपाध्ये स्वतःची चूक स्वीकारायला तयारच नाहीत; उलट नेटकऱ्यांनाच दिलं ज्ञान, मग नेटकरीही भडकले, म्हणाले-

SCROLL FOR NEXT