share market esakal
अर्थविश्व

बाजार सुरू होण्याआधी जाणून घ्या आज कोणते 10 शेअर्स करतील परफॉर्म?

शॉर्ट टर्ममध्ये बाजारात तेजीचा कल कायम राहण्याची शक्यता आहे.

सकाळ डिजिटल टीम

सोमवारी अस्थिरतेतही शेवटच्या तासात रिकव्हरी दिसून आली. सेन्सेक्स 235 अंकांनी वाढत 61185 वर तर निफ्टी 86 अंकांनी वाढून 18203 वर बंद झाला. मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्समध्ये खरेदी झाली. बँकिंग आणि मेटल शेअर्समध्ये चांगली तेजी दिसून आली.

पीएसयू बँक इंडेक्स सुमारे 4.5 वर्षांच्या उच्चांकावर बंद झाला आहे. रियल्टी, एफएमसीजी निर्देशांकातही खरेदी दिसली. दुसरीकडे फार्मा, कंझ्युमर ड्युरेबल्स शेअर्सवर दबाव दिसून आला. 17 जानेवारी 2022 नंतर निफ्टी 18200 च्या वर बंद झाला आहे.

निफ्टी बँक 428 अंकांनी वाढून 41687 वर बंद झाला. मिडकॅप 256 अंकांनी वाढून 31964 वर बंद झाला आहे. सेन्सेक्समधील 30 पैकी 19 शेअर्समध्ये खरेदी दिसली. त्याच वेळी, निफ्टीचे 50 पैकी 33 शेअर्स वधारले. निफ्टी बँकेच्या 12 पैकी 8 शेअर्स वाढले.

आज कशी असेल बाजाराची स्थिती ?

इंट्राडेमध्ये बाजारात मोठी अस्थिरता दिसल्याचे कोटक सिक्युरिटीज लिमिटेडचे श्रीकांत चौहान म्हणाले. मजबूत जागतिक संकेतांमुळे सेन्सेक्स-निफ्टीमध्ये तेजी दिसली. हा ट्रेंड असाच सुरू राहिल्यास भारतीय इक्विटी मार्केटमध्ये FII कडून खरेदीमध्ये आणखी वाढ होऊ शकते.

तांत्रिक दृष्टिकोनातून विचार केल्यास निफ्टीने हायर बॉटम फॉर्मेशन राखण्यात सक्षम आहे असे दिसते. पण त्याच वेळी त्याला 18260 च्या आसपास मोठ्या रझिस्टंसचा सामना करावा लागत आहे. याशिवाय निफ्टीने डेली चार्टवर डोजी कॅंडलस्टिक फॉर्मेशन तयार केले आहे.

ट्रेंड-फॉलोइंग ट्रेडर्ससाठी, 18050 आणि 18000 वर सपोर्ट दिसत आहे. जर निफ्टी 18000 च्या वर राहिला तर तो 18300-18350 च्या पातळीपर्यंत पोहोचू शकतो. दुसरीकडे, जर तो 18050 च्या खाली घसरला तर तो 17950-17900 च्या दिशेने जाऊ शकतो.

सेन्सेक्स-निफ्टीने इंट्राडेमध्ये हिरव्या चिन्हावर बंद होण्यापूर्वी प्रचंड अस्थिरता पाहिल्याचे एलकेपी सिक्युरिटीजचे रुपक डे म्हणाले. डेली चार्टवर, निफ्टी मागील हाय स्विंगच्या वर राहण्यास सक्षम असल्याचे दिसते. याशिवाय मोमेंटम इंडिकेटर आरएसआयही पॉझिटीव्ह क्रॉसओवर देत आहे.  

शॉर्ट टर्ममध्ये बाजारात तेजीचा कल कायम राहण्याची शक्यता आहे. निफ्टी 18300/18600 च्या दिशेने पुढे जाताना आपण पाहू शकतो. खाली 18000 वर सपोर्ट दिसत आहे.

आजचे टॉप 10 शेअर्स कोणते ?

ब्रिटानिया (BRITANNIA)
स्टेट बँक ऑफ इंडिया (SBIN)
अदानी एन्टरप्रायझेस (ADANIENT)
बीपीसीएल (BPCL)
आयशर मोटर्स (EICHERMOT)
एमआरएफ (MRF)
झिंदाल स्टील (JINDALSTEL)
हिंदुस्थान पेट्रोलियम (HINDPETRO)
इंडियन हॉटेल्स (INDHOTEL)
भारत फोर्ज (BHARATFORG)

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune court verdict : पत्नीशी दोनदा घटस्फोट, तिसऱ्यांदा लग्नाचं वचन देत केला बलात्कार? ; पुणे कोर्टाने पतीला सोडलं निर्दोष, कारण...

Viral Video: महिला पोलिसाचं धाडस! महाकाय १६ फूट लांब किंग कोब्रा पकडला, पाहा थरारक व्हायरल व्हिडिओ

Latest Maharashtra News Updates : दिलीप काळभोर यांचा सभापतीपदाचा राजीनामा

Navi Mumbai: रिल्स बनवण्यासाठी रेल्वेवर चढला, इतक्यात ओव्हरहेड वायरला चिटकला अन्...; क्षणात आयुष्य उद्ध्वस्त

SA vs ZIM: कसोटी क्रिकेटला मिळावा नवा 'त्रिशतकवीर'! द. आफ्रिकेच्या कर्णधाराने गोलंदाजांना झोडपत नोंदवले वर्ल्ड रेकॉर्ड

SCROLL FOR NEXT