Gold
Gold  
अर्थविश्व

Gold and Silver Price : सोने आणि चांदीच्या भावात घसरण

शरयू काकडे

Gold and Silver Price : गेल्या आठवड्याची सुरवात सोन्याच्या दरवाढीने झाली पण अमेरिकेच्या फेडरल रिजर्व बैठकीनंतर आर्थिक धोरण नियंत्रित करण्याच्या निर्णयामुळे सोने आणि चांदीचे भाव घसरले आहेत. यंदा अमेरिकन बाँडचे उत्पन्न देखील सातत्याने वाढले आहे. फेडशिवाय इतर काही देशांमध्ये अर्थव्यवस्थांमध्ये आर्थिक धोरण निंयत्रित करण्याची बाबत मौल्यवान धातूंवर दबाव निर्माण झाला आहे. देशांतर्गत बाजाराता पितृपंधरवड्याच्या पार्श्वभूमीवर सोने-चांदीच्या मागणीत घट झाली आहे. सणवार जवळ आल्यामुळे दर कमी राहण्याची शक्यता आहे.

MCX futures मध्ये सोन्याचा भावात साप्ताहिक प्रति 10 ग्रॅम 300 रुपयांची वाढ झाली आणि मागील आठवड्याच्या शेवटी हा दर 46100 प्रति 10 ग्रामच्या जवळपास होता. अमेरिकेच्या फेडरल रिजर्व निर्णयाचा परिणाम चांदीच्या भावात घट झाली आणि देशांर्तगत futures चांदीच्या भावात साप्ताहिक 700 रुपये प्रति किलोची वाढ झाली. अमेरिकेच्या बेरोजगारी आणि सर्व्हिस पीएमआयच्या कमकुवत आकडेवारीमुळे चांदीच्या भावासाठी फायदेशीर ठरत आहे. डॉलर दे सोन्याच्या विरुध्द दिशेने चालतो, या आठवड्यात खालच्या पातळीवर आहे. स्वस्तिक इन्व्हेस्टमार्टचे विश्लेषक नृपेंद्र यादव यांच्या मते, या आठवड्यातील प्रमुख अर्थव्यवस्थांच्या केंद्रीय बँकेच्या सदस्यांच्या विधानांमुळे नवीन आठवड्यात मौल्यवान धातू वाढण्याची शक्यता आहे. पण तांत्रिक चार्टवर खालच्या पातळीवरून किंमती वाढण्याची शक्यता आहे.

Futures सोन्यामध्ये सोन्याच्या45,600 रुपयांवर समर्थन आणि 46,500 रुपयांवर प्रतिकार आहे. डिसेंबर Futures चांदीमध्ये 58,000 रुपयांच्या समर्थनावर आहेत आणि 61,800 रुपयांच्या विरोधात आहे. शुक्रवारी Overseas Bullion Futures Market मध्ये 20 डॉलर घसरून 1,751 डॉलर प्रती औंसवरुन 1757 खाली आले आणि चांदी 8 सेंटने घसरून 22.46 डॉलर प्रति औंसवरुन 22.79 खाली आले. त्यामुळे देशांतर्गत बाजारात सोने 350 रुपयांनी घसरून 47,600 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदी 200 रुपयांनी कमी झाली

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Constitution : '...तर मोदी सरकारने केव्हाच देशाचे संविधान बदलले असते'

Pratik Gandhi : प्रतीक साकारतोय गांधी ; हॅरी पॉटर फेम 'या' अभिनेत्याची सिनेमात वर्णी

Reels Addiction : इन्स्टाग्राम अन् यूट्यूबचं कशामुळे लागतंय व्यसन? जाणून घ्या कसं काम करतं अल्गोरिदम..

Rishabh Pant: "ऋषभ पंतसोबत लग्न कर, तो तुला खुश ठेवेल..."; नेटकऱ्याची कमेंट, उर्वशीनं अवघ्या दोन शब्दात दिलं उत्तर

'संजय राऊत माझा छळ करत आहेत'; निलम गोऱ्हेंनी वाचून दाखवलं स्वप्ना पाटकरांचं निवेदन

SCROLL FOR NEXT