PayU Billdesk
PayU Billdesk 
अर्थविश्व

Prosusनं रद्द केली BillDesk खरेदीची 'बिग डील'; ४.७ बिलियन डॉलरचा होता व्यवहार

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : Prosus (पूर्वीची Nspers) या कंपनीनं BillDesk या ऑनलाईन पेमेंट प्रोसेसर कंपनीचा ४.७ बिलियन डॉलरची खरेदीचा व्यवहार रद्द केला आहे. या व्यवहारातील अटींची ३० सप्टेंबरपर्यंत पूर्तता झाली नसल्यानं हा करार संपुष्टात आल्याचं सांगितलं जात आहे. (Prosus terminates PayU 4.7 billion acquisition of BillDesk)

आपल्या अधिकृत निवेदनात Prosus नं सांगितलं की, PayU कडून BillDesk 4.7 अब्ज डॉलर्सला विकत घेण्याची बहुप्रतिक्षित डील संपुष्टात आली आहे. जर ही डील यशस्वी झाली असतील तर ती भारतातील इंटरनेट क्षेत्रातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी खरेदी ठरली असती. Prosus भारतातील दीर्घकालीन गुंतवणूकदार आणि ऑपरेटर कंपनी आहे. सन 2005 पासून ही कंपनी भारतीय तंत्रज्ञान कंपन्यांमध्ये सुमारे 6 अब्ज डॉलरची गुंतवणूक करत आहे. Prosus भारतीय बाजारपेठेत आपला व्यवसाय वाढवत आहे.

प्रोससनं आपल्या निवेदनात म्हटलं की, Payments Private Limited (PayU) ही Prosus ची उपकंपनी असून भारतीय डिजिटल पेमेंट प्रोसेसर कंपनी BillDesk च्या भागधारकांमध्ये 4.7 बिलियन डॉलरमध्ये खरेदीचा करार झाला आहे. पण आता हा व्यवहार रद्द करणे हे भारतीय स्पर्धा आयोगाच्या (CCI) मान्यतेसह विविध अटींच्या पूर्ततेच्या अधीन होते. PayU नं 5 सप्टेंबर 2022 रोजी CCI मंजूरी मिळवली. पण, 30 सप्टेंबर 2022 लाँग स्टॉप तारखेपर्यंत काही अटी पूर्ण केल्या नाहीत त्यामुळं हा करार त्याच्या अटींनुसार आपोआप संपुष्टात आला आहे. त्यामुळं आता या करारानुसार प्रस्तावित व्यवहाराची अंमलबजावणी केली जाणार नाही.

डीलमध्ये सुरुवातीपासून येत होते अडथळे

ऑनलाइन पेमेंट गेटवे क्षेत्रात मक्तेदारी निर्माण झाली आहे. याबद्दल भारतीय स्पर्धा आयोगानं चिंताही व्यक्त केली होती. त्यामुळं PayU आणि BillDesk या कंपन्यांमध्ये कराराला सुरुवातीपासूनच अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागला. एम.एन. श्रीनिवासू, अजय कौशल आणि कार्तिक गणपती यांनी सन 2000 मध्ये BillDesk ही पेमेंट गेटवे कंपनी स्थापन केली. या कंपनीनं सन २०२१ मध्ये 2,124 कोटी रुपयांचा महसूल नोंदवला. जो मागील वर्षातील 1,804.69 कोटींवर पोहोचला तर नफा 211.22 कोटी रुपयांवरुन 245.55 कोटी झाला आहे.

PayU-BillDeskची डील जर पार पडली असती तर सन 2018 मध्ये वॉलमार्टनं Flipkartच्या 16 अब्ज डॉलरच्या डीलनंतर भारतातील इंटरनेट क्षेत्रातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी खरेदी ठरली असती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: डोंबिवलीत ईव्हीएम मशीन पडले बंद

IPL 2024 Playoffs : प्लेऑफसाठी नाही कोणत्या राखीव दिवस; पावसामुळे खेळखंडोबा झाला तर कसा लागणार निकाल?

आठवेळा मतदान करणारा अल्पवयीन तरुण ताब्यात, पुन्हा होणार मतदान; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई

Shantigiri Maharaj Nashik Lok Sabha: शांतिगिरी महाराजांच्या अडचणी वाढणार? EVM मशीनला घातला हार 

Hapus Season : कोकण हापूसचा हंगाम अंतिम टप्प्यात;उष्ण हवामानामुळे आवक घटली, हंगाम १५ दिवस आधीच संपणार

SCROLL FOR NEXT