फक्त आठ दिवस बाकी! त्वरित उरका ईपीएफ, आयटीआरसह ही चार महत्त्वाची कामे Sakal
अर्थविश्व

ITR भरलात का? फाईल करायला उरले केवळ चार दिवस

फक्त आठ दिवस बाकी! त्वरित उरका ईपीएफ, आयटीआरसह ही चार महत्त्वाची कामे

सकाळ वृत्तसेवा

तुम्ही तुमचे आयकर रिटर्न अजून भरले नसेल, तर ते लवकर सबमिट करा.

तुम्ही तुमचे आयकर रिटर्न (Income Tax Return) अजून भरले नसेल, तर ते लवकर सबमिट करा. त्याची अंतिम तारीख 31 डिसेंबर आहे. त्यानंतर तुम्हाला दंड भरावा लागू शकतो. आयटी रिटर्नसह इतरही चार महत्त्वाची कामे जसे पीएफ (EPF) खाते आधारशी लिंक करणे, पेन्शनसाठी (Pension) जीवन प्रमाणपत्र (Life Certificate)) सादर करणे व डीमॅट-ट्रेडिंग खात्यासाठी (Demat-Trading Account) केवायसी (KYC) अपडेट करणे आदी, ज्यांची अंतिम तारीख 31 डिसेंबर आहे. ही महत्त्वाची कामे करण्यासाठी तुमच्याकडे अवघे आठच दिवस उरले आहेत. (Quickly complete these four important tasks including EPF and ITR)

आयटी रिटर्न्स

नवीन आयकर पोर्टलवरील तांत्रिक अडचणींमुळे आणि कोरोना विषाणूमुळे 2020-21 या आर्थिक वर्षासाठी आयकर विवरणपत्र भरण्याची अंतिम तारीख आधीच दोनदा वाढवण्यात आली आहे. आयकर विभागाने तिसऱ्यांदा 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. शेवटच्या तारखेपर्यंत थांबू नका आणि लवकरात लवकर विवरणपत्र सादर करा, असा सल्ला आयकर विभागाने दिला आहे. त्यानंतर आयटी सबमिशन केल्यास दंड आकारला जाईल.

पीएफ खाते आधारशी लिंक करा

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (Employees Provident Fund - EPF) खाते आधार कार्डशी (Aadhaar Card) लिंक करण्याची आणि नॉमिनीचे नाव नोंदणी करण्याची अंतिम तारीख 31 डिसेंबर आहे. ईपीएफ खाते (UAN) आधारशी लिंक करणे अनिवार्य आहे. खातेदारांनी तसे न केल्यास त्यांना अडचणींना सामोरे जावे लागू शकते.

पेन्शनसाठी जीवन प्रमाणपत्र सादर करा

सरकारी सेवेतून निवृत्त झालेल्या पेन्शनधारकांना वर्षातून एकदा 30 नोव्हेंबरपूर्वी जीवन प्रमाणपत्र सादर करावे लागते. यंदा त्याची अंतिम तारीख 31 डिसेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. शेवटच्या तारखेपर्यंत प्रमाणपत्र सादर न केल्यास पेन्शन थांबविली जाऊ शकते.

डीमॅट-ट्रेडिंग खात्यासाठी केवायसी करा

SEBI ने डीमॅट आणि ट्रेडिंग खात्यांचे KYC करण्याची अंतिम तारीख 30 सप्टेंबर दिली होती, मात्र आता मुदत 31 डिसेंबर 2021 पर्यंत वाढवली आहे. केवायसी अंतर्गत नाव, पत्ता, पॅन कार्ड क्रमांक, मोबाईल क्रमांक, वय, ई-मेल आयडी यांसारखी माहिती अपडेट करावी लागेल. KYC करण्यात अयशस्वी झाल्यास खाते बंद केले जाऊ शकते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shaha : शिवरायांनी स्वराज्याचे संस्कार रुजविले... पेशव्यांनी स्वराज्य पुढे नेले; अमित शाहांचे पुण्यात गौरवोद्गार

Latest Maharashtra News Updates : उद्या ठाकरेंचा विजयी मेळावा- वरळी डोममध्ये तयारी सुरु

ST Pass : एकाच महिन्यात 5 लाख विद्यार्थ्यांना शाळेत मिळाले एसटी पास; कोणाला मिळतो सवलतीचा पास? वाचा...

Indian Women Cricket Team: भारतीय महिला संघ आज रचणार इतिहास; T20 मालिका जिंकण्याची संधी

"निलेश तू कसा आहेस माहितीये..." साबळेंच्या व्हायरल व्हिडिओनंतर मराठी अभिनेता झाला व्यक्त ; म्हणाला..

SCROLL FOR NEXT