R. K. Krishna Kumar Passes Away Sakal
अर्थविश्व

R. K. Krishna Kumar Passes Away : रतन टाटांचे मित्र आर. के. कृष्णकुमार यांचे निधन; रतन टाटा भावूक

टाटा समूहात महत्त्वाची भूमिका बजावणारे आणि अनेक महत्त्वाची पदे भूषवणारे आर. कृष्णकुमार यांचे रविवारी सायंकाळी निधन झाले.

सकाळ डिजिटल टीम

Ratan Tata News: टाटा समूहात महत्त्वाची भूमिका बजावणारे आणि अनेक महत्त्वाची पदे भूषवणारे आर. कृष्णकुमार यांचे रविवारी सायंकाळी निधन झाले. टाटा समूहाच्या अधिकाऱ्यांनी याबाबत माहिती दिली आहे. केरळमध्ये जन्मलेल्या कृष्णकुमार यांनी 'इंडियन हॉटेल्स' या हॉस्पिटॅलिटी शाखेच्या प्रमुखपदासह ग्रुपमध्ये विविध पदे भूषवली होती.

वयाच्या ८४ व्या वर्षी झाले निधन :

रतन टाटा यांच्या जवळच्या मित्राचे वयाच्या ८४ व्या वर्षी निधन झाले आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, 'पद्मश्री' पुरस्काराने सन्मानित कृष्ण कुमार यांना रविवारी देशाची राजधानी मुंबईतील त्यांच्या घरी हृदयविकाराचा झटका आला.

रतन टाटा यांनी शोक व्यक्त केला :

आपल्या सहकाऱ्याची आठवण करून देताना रतन टाटा म्हणाले की, माझे मित्र आणि सहकारी आर के कृष्णकुमार यांच्या निधनाने मला जे दुःख झाले त्याचे वर्णन शब्दात करता येणार नाही. टाटा समूहात आणि वैयक्तिकरित्या काम करताना आमच्यात सौहार्दपूर्ण संबंध होते ते मी नेहमीच जपले.

रतन टाटा पुढे म्हणाले की, ते टाटा समूहाचे खरे सैनिक होते. टाटा समूह आणि टाटा ट्रस्ट्सच्या विश्वासूंची नेहमीच उणीव भासते.

हेही वाचा : Inside Online Dating : हुक अप्स, ओपन रिलेशनशिप्स की...; महाराष्ट्रातील तरुणाई नक्की काय शोधते?

केरळच्या मुख्यमंत्र्यांनी ट्विट करून शोक व्यक्त केला :

टाटा सन्सचे विद्यमान चेअरमन एन चंद्रशेखरन यांनी देखील कृष्णकुमार यांच्या टाटा समूहातील योगदानाची आठवण करून शोक व्यक्त केला. केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी ट्विट केले. थलासेरीमध्ये जन्मलेल्या कृष्णकुमार यांनी दक्षिणेकडील राज्यांशी टाटा समूहाचे संबंध मजबूत करण्यात मदत केली, असं म्हणत पिनराई विजयन यांनी आर. के. कृष्णकुमार यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

Samarth Movie Review: मनाचे श्लोक, अध्यात्म अन् बाप-लेकाचा संघर्ष; विचार करायला लावणारा 'समर्थ'; कसा आहे चित्रपट?

SCROLL FOR NEXT