अर्थविश्व

मोदींना टॅग करत रतन टाटांकडून भारतीय हवाई दलाचे कौतुक

वृत्तसंस्था

मुंबई: टाटा उद्योग समुहाचे सर्वेसर्वा रतन टाटा यांनी पाकिस्तानवर हवाई हल्ला करुन तेथील दहशतवादी तळ उद्धवस्त करणाऱ्या भारतीय हवाई दलाचे कौतुक केले आहे. त्याचबरोबर त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे ट्विट करत कौतुक केले आहे. मंगळवारी पहाटेच्या सुमारास बालाकोट येथे हवाई हल्ले करुन जैश-ए-महम्मदचे तळ उद्धवस्त केल्याबद्दल भारतीय हवाई दलाचा मला अभिमान आहे अशा शब्दात रतन टाटा यांनी देशाच्या हवाई दलाच्या जवानांचे अभिनंदन केले आहे. 

भारतीय हवाई दलाने केलेल्या कारवाईवर संपूर्ण भारतभरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. रतन टाटांनी देखील पहाटेच्या सुमारस ट्विट केले असून त्यामध्ये त्यांनी ट्विटच्या शेवटी  पंतप्रधान नरेंद्र मोदींचे ट्विटर हॅण्डलही टॅग केले आहे. 

ते  ट्विटमध्ये म्हणाले की ‘पाकिस्तानमध्ये असलेल्या दहशतवाद्यांच्या तळावर हवाई हल्ला करून आपण ती उद्ध्वस्त केली याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय वायुदलाचे अभिनंदन. आपल्या देशात दहशतवादी नाही असे पाकिस्तानकडून वारंवार सांगितले जात होते. काही दिवसांपूर्वी (पुलवामा येथे) आपल्या जवानांवर झालेल्या हल्ल्याचे चोख प्रत्युत्तर देणाऱ्या भारतीय हवाई दलाचा संपूर्ण देशाला अभिमान आहे.’ या ट्विटच्या शेवटी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे ट्विटर हॅण्डलही टॅग केले आहे.


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange : मनोज जरांगे अन् पंकजा मुंडे एकाच व्यासपीठावर; कार्यकर्त्यांनी घातला गोंधळ; नेमकं काय घडलं?

IPL 2024, GT vs RCB Live Score: गुजरातला पहिल्याच ओव्हरमध्ये मोठा धक्का! सलामीवीर स्वस्तात बाद

Nashik News : 10 वर्षानंतर धुळ झटकली; म्हाडा प्रकरणातील प्रस्ताव तपासण्याच्या सूचना

Latest Marathi News Live Update : माढा येथे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते पाटीलांचा भाजपा उमेदवाराला पाठिंबा

Ulhasnagar Crime : मटका किंगच्या मुलावर जीवघेणा हल्ला करणारा आरोपी जेरबंद ; इन्स्टाग्राम पोस्टमुळे अडकला जाळ्यात

SCROLL FOR NEXT